आर.टी.एस.

जनतेला दर्जेदार व तत्पर सेवा देण्याच्या उद्देशाने, जनतेशी संबंधित कामे अधिसूचित करून त्याचा निपटारा विहित कालावधीत करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा दिनांक 28 एप्रिल 2015 पासून लागू झाला आहे. पुणे महानगरपालिकेत दि.15 जुलै 2015 पासुन 15 सेवा अधिसुचित करुन  सदर कायद्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये पुणे महानगरपालिका मधील जन्म मृत्यू दाखले, विवाह नोंदणी दाखले, पाणी पुरवठा व जलनिसारणाशी संबंधित दोन सेवा, अग्निशमन विभागाशी संबंधित दोन सेवा, बांधकाम परवानगी विभागाशी संबंधित पाच सेवा व कर आकारणी व कर संकलन विभागाशी संबंधित तीन सेवा अशा एकूण 15 सेवा अधिसूचित केल्या आहेत. सदर सेवांचा संपूर्ण तपशील, सेवा देण्यासाठी निश्चित केलेला कालावधी, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, आवश्यक असलेली फी, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिल अधिकारी यांची माहिती पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/en  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सेवा हमी कायद्या अंतर्गत असलेल्या सेवांसाठी online अर्ज करण्याचे सुविधेसाठी https://pmc.gov.in/enहे संकेतस्थळ विकसीत करण्यात आले आहे. तूर्तास जन्म दाखला व मृत्यु दाखला ऑनलाईन देण्याची सुविधा तसेच अन्य 13 सुविधांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची व्यवस्था संकेतस्थळावर करण्यात आली आहे.