विवाह नोंदणी

पारशी व ख्रिश्चन धर्मीयांची विवाह नोंदणी तसेच महाराष्ट्राबाहेर झालेल्या विवाहाची नोंदणी प्रभाग (क्षेत्रीय) अथवा महानगरपालीका कार्यालयात होत नाही. याबाबतचे अधिकार महाराष्ट्र शासनाच्या विवाहनोंदणी कार्यालयास म्हणजेच विवाह नोंदणी कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालय पुणे स्टेशन (ट्रेझरी समोर) यांना आहेत.

मुस्लिम विवाह कायद्यानुसार कॉलम क्र 7 मध्ये काझी यांची माहित व दिनांकासह स्वाक्षरी असावी लागते व निकाहनाम्याची अटेस्टेड प्रत जोडावी लागते. निकाहनामा उर्दू भाषेत असेल तर त्याचे मराठीत तसेच मराठी सोडून इतर भाषेत असेल तर   त्यांचे हिंदी व इंग्रजी किंवा मराठीत भाषांतर करुन त्यावर संबंधित काझी/ पुरोहित/ धर्मगुरु यांची स्वाक्षरी घेऊन ती प्रत सोबत जोडावी लागते.

हिंदू, बुध्द,शीख, आर्यसमाज इत्यादी समाजांस हिंदू विवाह कायदा, 1955 हा   कायदा लगू होतो, परंतू मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी किंवा ज्यू समाजास तो लागू नाही.

वर किंवा वधू या दोघांपैकी एकाने लग्नापूर्वी हिंदू धर्मामध्ये धर्मांतर केले असेल तर प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालयात विवाह नोंदणी केली जाते अन्यथा विवाहनोंदणी कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालय पुणे स्टेशन (ट्रेझरी समोर) केली जाते.

वर किंवा वधू या दोघांपैकी एकाने लग्नापूर्वी धर्मांतर केले असेल तर प्रभाग   (क्षेत्रीय) कार्यालयात विवाह नोंदणी केली जाते अन्यथा विवाहनोंदणी कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालय पुणे स्टेशन (ट्रेझरी समोर) केली जाते.

पुर्ण भरलेला व कागदपत्र जोडलेला अर्ज त्याच वेळी कागदपत्राची तपासणी करुन तीन दिवसांत किंवा नागरीकांच्या सोर्इप्रमाणे तारीख दिली जाते.

विवाह नोंदणीच्या तारखेस अनुपस्थित राहिल्यास नागरीकांच्या सार्इनुसार पुढील तारखा दिल्या जातात.

 

वधु किंवा वर यापैकी एकजण महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रहिवासी असले पाहिजे.

लग्नाच्या वेळी वधु चे वय 18 वर्षे पुर्ण व वराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे.

 

वधु-वराच्या लग्नाच्यावेळी साक्षिदार सज्ञान असावा.

विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र हे लग्न झाल्याचा अत्यंत महत्वाचा पुरावा आहे. सदर प्रमाणपत्र हे मुख्यत्वे विवाहित स्रीला सामाजिक संरक्षण व आत्मविश्वास देते.पत्नी/पती परदेशी जाण्याकरीता लागणारा व्हिासा मिळविण्यासाठी हे एक महत्वाचे   प्रमाणपत्र मानले जाते. जोडीदार विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याचे फायदे/ बॅंक ठेव यांचा हक्क मिळविण्याकरिता हे प्रमाणपत्र लागते. लग्ना बाबतीत होणारी फसवणूक टाळण्यासाठी हे प्रमाणपत्र असणे महत्वाचे आहे.

विशेष विवाह कायदा, 1954 हा कायदा सर्वांना म्हणजेच सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांना लागू आहे.

अ) वर-वधु यांच्या जन्म दाखल्याचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला / 10 वी प्रमाणपत्र / पासपोर्ट / जन्मदाखला  इ. पैकी एकाची साक्षांकीत / नोटरार्इज्ड  छाया प्रत.

ब) वर-वधु, साक्षिदार यांचे पत्त्याचे पुरावे म्हणून रेशनिंग कार्ड / पासपोर्ट /  निवडणूक ओळखपत्र संबंधीतांच्या नावाचा उल्लेख असणारे विजबिल / बी एस एन एल टेलीफोन बिल इ. पैकी एकाची साक्षांकीत / नोटरार्इज्ड छाया प्रत.

लग्नपत्रिका  व लग्नाचा फोटो.

विवाहनोंदणी साठी वधू-वर व साक्षिदारांचे प्रत्येकी एक फोटो लागतो.

विवाहनोंदणी अर्जाचे शुल्क रु.104/- आहे

विवाह नोंदणीसाठी अर्ज (नमुना ड)  वर रक्कम रु.100/- च्या किमतीचा कोर्ट फी स्टॅंप  लावावा लागतो.

1) विवाहाच्या तारखेपासून 90 दिवसाच्या आत विवाहनोंदणी केल्यास र.रु.50/

2) 90 दिवस ते एक वर्षाच्या आत विवाहनोंदणी केल्या शुल्क रु.50 + दंड/ शास्ती फी रु.100 असे एकूण रु. 150/-

3) एक वर्षाच्या पुढे कितीही कालावधी असेल तर नोंदणी शुल्क रु. रु.50 + दंड/ शास्ती फी रु.200 असे एकूण रु. 250/-

लग्नपत्रिका उपलब्ध नसल्यास विहित नमुन्यातील 100 रुपयाच्या स्टँम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच लग्न  प्रसंगीचा एक  फोटो.

अ) वर-वधु यांच्या जन्मदाखल्याचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला / 10 वी प्रमाणपत्र / पासपोर्ट / जन्मदाखला  इ. पैकी एकाची साक्षांकीत / नोटरार्इज्ड  छाया प्रत.

ब) वर-वधु, साक्षिदार यांचे पत्त्याचे पुरावे म्हणून रेशनिंग कार्ड / पासपोर्ट / निवडणूक ओळखपत्र संबंधीतांच्या नावाचा उल्लेख असणारे विजबिल / बी एस एन एल टेलीफोन बिल इ. पैकी एकाची साक्षांकीत / नोटरार्इज्ड छाया प्रत. विहीत मुन्यातील 100 रुपयाच्या स्टँम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच लग्न  प्रसंगीचा एक  फोटो.

 

वधू अथवा वर घटस्फोटित असल्यास कोर्टाच्या हुकूमनाम्याची साक्षांकित प्रत द्‌यावी लागते.

विवाह नोंदणी अर्जामधील कॉलम 7 मध्ये पुरोहित/ भटजी / काझी यांची माहिती तसेच दिनांकासह स्वाक्षरी असावी.

महानगरपालिकंच्या सर्व प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालयामध्ये विवाह नोंदणी करता येते. त्याचप्रमाणे http://rts.punecorporation.org/ या वेबपोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येते.

संपुर्ण माहिती भरलेला अर्ज (नमुना ड)  हा वर/वधु/साक्षिदार यांच्यापैकी एकाने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10. ते 2 या वेळेत संबंधीत प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालयाच्या विवाहनोंदणी कार्यालयात दाखल करावा.

महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालयांमध्ये असलेल्या विवाहनोंदणी विभागा मध्ये विवाहनोंदणीचे अर्ज उपलब्ध आहे.

विवाहनोंदणी साठी वधु आणि वर व विवाहाचे तीन साक्षीदार यांना प्रत्यक्ष कार्यालयात हजर रहाणे आवश्यक आहे.