पर्यावरण कक्ष

१. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम.

 

२. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६.

१. पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करणे

२. पर्यावरण- संवर्धन व जनजागृती- विषयक कामे करणे.

ध्वनिक्षेपक यंत्राने ध्वनिपातळी मोजून ध्वनिपातळी नियमानुसार नसल्यास याबाबत शहरी भागासाठी पोलीस विभागामार्फत संबंधितावर कार्यवाही केली जाते.

शासनाच्या ध्वनि प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० मधील कलम ३ (१) व ४ (१) नुसार शहरातील न्यायालये, दवाखाने व शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर पर्यतच्या परिसरात शांतता क्षेत्र (Silence Zone) जाहीर करणारे फलक लावण्यात आले असून त्याची अंमलबजावणी पोलीस खात्यामार्फत करण्यात येते.

 

आवाजाच्या संबधातील सभोवतालाच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खालील तक्त्याप्रमाणे मोजण्यात येतो.

 

क्षेत्र संकेतांक

क्षेत्र/ झोन प्रवर्ग

डेसिबलमधील मर्यादा

दिवसा

रात्री

(सकाळी ६.०० ते रात्री १०.००)

(रात्री १०.०० ते सकाळी ६.००)

औद्योगिक क्षेत्र

७५

७०

वाणिज्यिक क्षेत्र

६५

५५

निवासी क्षेत्र

५५

४५

शांतता क्षेत्र

५०

४०

 

टिप- शांतता क्षेत्र म्हणजे रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक ठिकाणे किंवा सक्षम प्राधिकारणाने अशी क्षेत्रे म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही क्षेत्रे यांच्या सभोवतालच्या १०० मीटर पर्यतचे क्षेत्र.

१. पुणे मनपाच्या इदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड येथे मनपाची प्रयोगशाळा कार्यरत आहे. सदर कार्यशाळेमध्ये शहरातील नैसर्गिक स्त्रोतांमध्ये उदा. हवा, पाणी व ध्वनी इ. होणाऱ्या प्रदूषणाची वर्षभर चाचणी केली जाते. चाचणीतून प्राप्त झालेली माहीती दरवर्षी तयार होणाऱ्या पर्यावरण अहवालामध्ये सादर करण्यात येते.

२. पर्यावरण कक्षाच्या अंतर्गत इंद्रधनुष्य हि स्वतंत्र इमारत बांधण्यात आलेली आहे. ‘इंद्रधनुष्य’ हि पर्यावरण संबंधीच्या कार्यक्रमासाठी एक सार्वजनिक सुविधा आहे. या सुविधेची स्थापना शाश्वत विकासासाठी आवश्यक असून लोकशिक्षण नागरी व पर्यावरण मूल्ये अशांचा प्रसार करण्यासाठी होणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती करण्यासाठी इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व शिक्षण केंद्र सुरु केले आहे. येथे असलेल्या पर्यावरणविषयक पोस्टर्स, 3 D मॅाड्यूल्स, छायाचित्रे, इ. च्या माध्यमातून वर्षभर पर्यावरण जनजागृतीचे कार्यक्रम येथे होत असतात. विविध शाळा, महाविद्यालये, विशेष विद्यार्थ्यांच्या शाळा इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रास नियमितपणे भेटी देत असतात. येथे भेट देणाऱ्या विध्यार्थ्यास पुणे शहराचे भूतकाळातील, वर्तमानातील आणि भविष्यातील पर्यावरण विषयक माहिती, विविध विषयांवर माहितीपट इ. दाखविण्यात येतात.

३. इंद्रधनु इको क्लब: शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी व जनजागृतीचा संदेश जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा या उद्देशाने इंद्रधनु इको क्लबची सुरुवात करण्यात आली आहे. या इको क्लब अंतर्गत विविध शाळांमध्ये पर्यावरणविषयक व्याख्याने, कार्यशाळा, पर्यावरणपूरक गणपती आरास कार्यशाळा, टाकाऊतून टीकाऊ वस्तू बनविणे कार्यशाळा, विविध स्पर्धा, माहितीपट इ. उपक्रम राबविण्यात येतात.

४. पुणे मनपामार्फत सी एन जी कीट बसविलेल्या रिक्षांसाठी अनुदान- हवेतील वाढते प्रदुषण कमी करण्यासाठी पुणे मनपाच्या वतीने तीन चाकी रिक्षांना प्रदुषण रोखण्यासाठी आणि सी एन जी  इंधन वापराला प्रोत्साहन देण्यासाठी १२०००/- रुपये अनुदान देण्यात येते.

 

हवा प्रदूषण मोजण्यासाठी पाषाण, शिवाजीनगर, पुणे विमानतळ, आळंदी, कात्रज, हडपसर, भोसरी, निगडी, मांजरी आणि गिरीनगर या दहा ठिकाणी IITM (Indian Institute of Tropical Meteorology) यांच्या मार्फत पुणे मनपाच्या सहकार्याने उपकरणे बसविण्यात आली आहेत. तसेच पाषाण, शिवाजीनगर, पुणे विमानतळ, आळंदी, कात्रज, कॅम्प, पुणे मनपा मुख्य इमारत, स्वारगेट, अलका टॅाकीज चौक आणि मंडई इत्यादी ठिकाणी हवेच्या गुणवत्तेची पातळी दर्शविणारे LED DISPLAY (Light Emitting Diode) लावण्यात आलेले आहेत.

हवा प्रदूषणाकरिता निकष

Sr. No.

Pollutants

Time Weighted

National Ambient Air Quality Standards

Industrial, Residential, Rural and Other Area

Ecological Sensitive Area (Notified by Central Govt.)

1

SO2

24 hours

80

80

2

NO2

24 hours

80

80

3

RSPM (PM10)

24 hours

100

100

SO2 – Sulphur dioxide

NO2 – Nitrogen Dioxide

RSPM (PM10) – Respirable Suspended Particulate Matter Below 10 micron