परवाना व आकाशचिन्ह

अनधिकृत जाहिरात फलकाची तक्रार टोल फ्री क्र. 18002336679, एस.एम.एस.क्र. 9689931546, skysign@punecorporation.org या ईमेलवर आणि https://pmc.gov.in/en

 या वेबसाईटवर register complaint या सदराखाली Grievence Redressal System या सदराखाली नागरीकांना तक्रार नोंदविता येणार आहे.

अर्जाची किंमत रू.10/- आहे.

अर्जामध्ये नमुद कागदपत्रांची पूर्तता करून परवाना व आकाशचिन्ह विभाग, सावरकर भवन, शिवाजीनगर येथे 10.00 ते 5.45 या वेळेमध्ये जमा करावा.

1. विहीत नमुन्यातील मागणी अर्ज (प्रत्येक जाहिरात फलकासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक) 

2. जाहिरात फलक उभारण्यास प्रस्तावित केलेले ठिकाण दर्शविणा-या जागेच्या नकाशाच्या 3 प्रती (साक्षांकीत)

3. ज्या ठिकाणी जाहिरात फलक उभारावयाचा आहे त्या जागेच्या मालकाचे चालू वर्षातील मिळकत कर भरल्याची पावती/कर संकलन व कर आकारणी विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र

4.  ज्या ठिकाणी जाहिरात फलक उभारावयाचा आहे त्या जागेच्या मालकाचे संमतीपत्र (रू.100/- चे स्टॅम्प पेपरवर, नोटराईज्ड)

5. अर्जदाराचे हमीपत्र (रू.100/- चे स्टॅम्प पेपरवर, नोटराईज्ड)

6. मा.पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र

जाहिरात परवान्यासाठी रू.222/- प्रति चौ.फूट प्रति वर्षाप्रमाणे आकारणी करण्यात येते.

1. विहीत नमुन्यातील मागणी अर्ज (प्रत्येक जाहिरात फलकासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक) 

2. जाहिरात फलक उभारण्यास प्रस्तावित केलेले ठिकाण दर्शविणा-या जागेच्या नकाशाच्या 3 प्रती (साक्षांकीत) 

3. ज्या ठिकाणी जाहिरात फलक उभारावयाचा आहे त्या जागेच्या मालकाचे चालू वर्षातील मिळकत कर भरल्याची पावती/कर संकलन व कर आकारणी विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र 

4. व्यवसायाची जागा गलीच्छ वस्ती निर्मूलन (गवनि) अंतर्गत येत असेल तर गवनि खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र/बिगरनिवासी सेवाशुल्क भरल्याची पावती.

5. व्यवसायाची जागा भाडयाने घेतली असल्यास भाडेपावती / भाडेकरार 

6. ज्या ठिकाणी जाहिरात फलक उभारावयाचा आहे त्या जागेच्या मालकाचे संमतीपत्र (रू.100/- चे स्टॅम्प पेपरवर, नोटराईज्ड) 

7. अर्जदाराचे हमीपत्र (रू.100/- चे स्टॅम्प पेपरवर, नोटराईज्ड)

8. मा.पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र

9. उद्यान अधिक्षक यांचे ना हरकत प्रमाणपत्र

10. जाहिरात फलकाचे स्ट्रक्चरल रिपोर्ट नकाशासह

11. वास्तुविशारद (महानगरपालिकेने नेमलेले) यांचे ना हरकत प्रमाणपत्र

12. जाहिरात फलक इमारतीवर/बंदीस्त भिंतीवर उभारावयाचा असल्यास त्या इमारतीचे भोगवटा पत्र /इमारत भक्कम असल्याचा दाखला

13. प्रस्तावित जाहिरात फलक त्या ठिकाणी उभारावयाचा आहे त्या जागेचे छायाचित्र (नामफलक, दिशादर्शक, बॅनर इ. साठी अर्जदारांनी वरीलप्रमाणेच कागदपत्रे जोडावीत.)

1. विहीत नमुन्यातील मागणी अर्ज (प्रत्येक जाहिरात फलकासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक)

2. मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या स्टॅबिलिटी बाबतच्या दाखल्याची मूळ प्रत

3. सी फॉर्म

4. ज्या ठिकाणी जाहिरात फलक उभारावयाचा आहे त्या जागेच्या मालकाचे संमतीपत्र (रू.100/- चे स्टॅम्प पेपरवर, नोटराईज्ड)

5. मा.पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र

6. मागील कालावधीचे भरलेल्या चलनाची प्रत वरील कागदपत्रां व्यतिरिक्त विशिष्ट कागदपत्रांची मागणी केल्यास ती देणे आवश्यक आहे. सादर केलेल्या मूळ कागदपत्रां व्यतिरिक्त अन्य छायाप्रती कागदपत्रे स्वसाक्षांकीत करणे आवश्यक.

लांब मुदतीच्या जाहिरात फलक परवाना मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत दिले जाते. 

नविन जाहिरात फलक (होर्डींग) परवाना एका वेळी 2 वर्षासाठी दिला जातो.

1. विहीत नमुन्यातील मागणी अर्ज (प्रत्येक जाहिरात फलकासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक)

2. जाहिरात फलक उभारण्यास प्रस्तावित केलेले ठिकाण दर्शविणा-या जागेच्या नकाशाच्या 3 प्रती (साक्षांकीत)

3. ज्या ठिकाणी जाहिरात फलक उभारावयाचा आहे त्या जागेच्या मालकाचे चालू वर्षातील मिळकत कर भरल्याची पावती/कर संकलन व कर आकारणी विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र

4. ज्या ठिकाणी जाहिरात फलक उभारावयाचा आहे त्या जागेच्या मालकाचे संमतीपत्र (रू.100/- चे स्टॅम्प पेपरवर, नोटराईज्ड)

5. अर्जदाराचे हमीपत्र (रू.100/- चे स्टॅम्प पेपरवर, नोटराईज्ड)

6. मा.पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र

चालू परवान्याची मुदत संपण्यापूर्वी एक महिना आधी परवाना नुतनीकरण अर्ज सादर करावा लागतो.

जाहिरात फलक उभारण्यासाठीचा अर्ज (एस.पी.7) परवाना व आकाशचिन्ह विभाग, सावरकर भवन, शिवाजीनगर पुणे येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत मिळेल.

अधिकृत जाहिरात फलकांची यादी महानगरपालिकेच्या या https://pmc.gov.in/en संकेतस्थळावर या departments सदराखाली पहावयास मिळेल.