उद्यान

अस्तित्वात असलेल्या उद्यानाची देखभाल, संरक्षण व विकास करणे, नवीन उद्यानाचे नियोजन व विकास करणे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५, महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण व संवर्धन नियम ,२००९ व मे.उच्च न्यायालय , मुंबई यांचे दि.२०/९/२०१३ रोजीचे आदेश याप्रमाणे कामकाज करणे.

वृक्ष तोडी बाबतच्या परवानगीसाठी अर्जाचा नमुना छ.संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे ४ येथील वृक्ष प्राधिकरण कार्यालयात उपलब्ध आहे.

पुणे महापालिका क्षेत्रात एकूण १६७ उद्याने आहेत व तसेच प्रवेश शुल्क असणाऱ्या उद्यानाच्या वेळ व प्रवेश शुल्क बाबतची माहिती http://www.punecorporation.org/informpdf/PUNEPARK/PMC_Gardens_Timetable.pdf या संकेत स्थळावर उपलब्ध होईल.

होय, महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण व संवर्धन नियम, २००९ या नियमातील अनुसूची १, कलम ७  (एच) प्रमाणे वृक्ष लागवडीची प्रमाणके निश्चित केलेली आहे, त्याबाबत सविस्तर माहिती पुणे महानगरपालिकेच्या http://www.punecorporation.org/informpdf/Garden/Rajpatra%2014-12-2009.pdf  या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

वृक्ष लागवडीकरिता छ.संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे ४ येथे अल्प दरात रोपे विक्री केली जाते. तसेच भाड्याने कुंड्या दिल्या जातात यासाठी प्रत्येक कुंडीस प्रतिदिन र.रु.१/- भाडे व र.रु.१०/- अनामत रक्कम स्वीकारली जाते.

पुणे महानगरपालिकेच्या http://www.punecorporation.org/informpdf/Garden/Garden_Staff.pdf या संकेत स्थळावर संबंधित अधिकारी याचे संपर्क क्रमांक दिलेले आहे. किंवा एस. एम. एस. अलर्ट क्र. ९२२३०५०६०७ यावर संपर्क करणे. तसेच  सायंकाळी ६.०० ते सकाळी ८.०० या कालावधीत आग्निशमन दलाशी १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पुणे महानगरपालिकेच्या http://www.punecorporation.org/informpdf/Garden/Garden_Staff.pdf या संकेत स्थळावर संबंधित अधिकारी याचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील, कलम २१ (१) मध्ये, अपराधसिद्धीनंतर प्रत्येक अपराधाकरीत १००० रुपयापेक्षा कमी नसेल व ५००० रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्य दंडाची आणि एक आठवड्यापेक्षा कमी नसेल व एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची शिक्षेची तरतूद केलेली आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ च्या अंमलबजावणीसाठी नागरी स्थानिक प्राधिकरणाने स्थापन केलेले असे प्राधिकरण कि, अध्यक्ष व इतर यांच्यासह, कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ व्यक्तीचे मिळून बनलेले एक वृक्ष प्राधिकरण नागरी क्षेत्रात कार्यरत असेल. पुणे महानगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष, महापालिका आयुक्त आहेत.

वृक्ष प्राधिकरणाकडे विविध अर्ज करताना कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही. परंतु, वृक्ष पूर्ण काढणे / पुर्नरोपण करणे यासाठी, १:३ प्रमाणात नवीन वृक्ष लागवड व संवर्धनासाठी, एका वृक्षास र. रु.१००००/- अनामत रक्कम स्वीकारली जाते. तसेच, जाहिरात फलक ना हरकत पत्र देतेवेळी, जाहिरात फलकाच्या २५ मी. परीघ अंतरात येणाऱ्या प्रत्येक वृक्षासाठी र. रु.२५००/- अनामत रक्कम आकारली जाते.

 

अ.क्र.

वृक्ष प्राधिकरणाकडे करावयाचे अर्ज

अर्जासोबत आवश्यक असणारे कागदपत्रे

परवानगीचा कालावधी

 

वृक्षांच्या फांद्या छाटणीबाबत परवानगीपत्र

१) अर्ज

२)प्रत्येक वृक्षांच्या धोकादायक असणार्‍या फांद्याचे स्वतंत्र व सुस्पष्ट रंगीत फोटो

३)वृक्षांच्या फक्त धोकादायक फांद्या परवानगी पत्राप्रमाणे काढणार असल्याबाबतचे हमीपत्र२० दिवस

 

मिळकतीमधील बांधकाम नकाशा मान्य करणेसाठी,बांधकाम पुर्व ना हरकत दाखला घेणे

१) अर्ज

२) संबंधित वास्तू विशारदाची स्वाक्षरी असलेल्या मान्य होण्या पुर्वीच्या नकाशावर, मिळकतीवर अस्तित्वात असणारे वृक्षांचे हिरव्या रंगाने ट्रेसिंग करून लोकेशन दाखविणे.

३) संबंधित वास्तू विशारदाची स्वाक्षरी असलेल्या मान्य होण्या पुर्वीच्या नकाशावर, भविष्यात लावणेत येणार्‍या वृक्षांचे निळ्या रंगाने ट्रेसिंग करून लोकेशन दाखविणे

४) मिळकतीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वृक्षांचा स्वतंत्र व सुस्पष्ट रंगीत फोटो संबंधित जागेच्या मालकी      हक्काबाबतची कागदपत्रांच्या प्रती.

२६ दिवस

 

प्रत्यक्ष बांधकामास अडथळा करणारे वृक्ष काढणे/ वृक्षांचे पुनर्रोपण करणे/ बांधकामास अडथळा करणार्‍या वृक्षांच्या फांद्या छाटणे.

१) विहित नमून्यातील अर्ज - प्रपत्र -सी (८ - २)

२) विहित नमून्यातील हमीपत्र - प्रपत्र -डी (११ - २)

३) बांधकाम पुर्व ना हरकत दाखल्याची प्रत.

४) बांधकाम चालू करणेचा दाखला (कमिन्समेंट सर्टीफिकेट)

५) मनपा मान्य नकाशा (ब्ल्यु प्रिंट) व त्यावर ट्रेसिंग करून तोडावयाचे वृक्ष लाल रंगाने दाखविणे व उर्वरित वृक्ष हिरव्या रंगाने दाखविणे.

६) तोडावयाच्या वृक्षांच्या बदल्यात (१:३ प्रमाणात) करावयाच्या नविन वृक्ष लागवड व पुनर्रोपण करणारे वृक्षांचे ठिकाण निळ्या रंगाने दाखविणे.

७) तोडावयाचे प्रत्येक वृक्षांचे स्वतंत्र व सुस्पष्ट वृक्ष क्रमांकासह रंगीत फोटो

संबंधित जागेच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे.

८) मे.उच्च न्यायालय,मुंबई यांचे दिनांक २० सप्टेंबर २०१३ रोजीच्या आदेशामधील ANNEXURE-II प्रमाणे हमीपत्र.

९) सदर ठिकाणच्या मिळकतीवरील वृक्ष न काढता बांधकाम करणे अडचणीचे असल्याबाबतचे संबंधित वास्तुविशारदाचे प्रमाणपत्र.

६० दिवस

 

बांधकामासाठी अडथळा करणारे वृक्ष काढणे/पुनर्रोपण करणेच्या बदल्यात करावयाच्या नविन वृक्ष लागवड व संवर्धनापोटी भरलेली अनामत     रकमेची मागणी करणे

१) अर्ज

२) अनामत भरलेल्या रकमेची मुळ चलन पावती

३) मनपा मान्य नकाशावर (ब्ल्यु प्रिंट) संवर्धन करण्यात आलेल्या वृक्षांचे हिरव्या रंगाने लोकेशन दाखविणे

४) अनामत रक्कम ज्या कारणास्तव भरलेली आहे,त्याचा दाखला किंवा परवानगीपत्राची प्रत.

५) नवीन वृक्ष लागवडीचे / परवानगी पत्र प्रमाणे वृक्ष पुर्नरोपण केलेल्या प्रत्येक वृक्षांचे सुस्पष्ट फोटो

२६ दिवस

 

बांधकामासाठी पुर्णत्वाचा दाखला मिळणेबाबत.

१) अर्ज

२) बांधकाम पुर्व ना हरकत दाखलाची प्रत (नसल्यास हमीपत्र)

३) बांधकाम चालू करणेचा दाखला (कमिन्समेंट सर्टीफिकेट)

४) मनपा मान्य नकाशावर (ब्ल्यु प्रिंट) वृक्षांचे हिरव्या रंगाने लोकेशन दाखविणे.

मिळकतीवरील प्रत्येक वृक्षांचे स्वतंत्र व सुस्पष्ट रंगीत फोटो

५) पुर्वी वृक्ष काढणे/पुनर्रोपण करणेस परवानगी घेतलेली असल्यास, परवानगीपत्राची प्रत

६) वृक्षतोडीच्या बदल्यात नविन वृक्ष लागवड (१:३ प्रमाणात) केलेली असणे आवश्यक आहे.

७) संबंधित मिळकतीच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे.

२६ दिवस

 

जाहिरात फलक उभारणेसाठी ना हरकत पत्र देणे.

१) अर्ज

२) संबंधित जागेचा सुस्पष्ट रंगीत फोटो

वृक्षाना इजा होणार नसल्याबाबतचे हमीपत्र तसेच जागामालकाचे ना हरकत पत्र

३) स्टॅबिलीटी प्रमाणपत्र

structure नकाशा  

४) जागेचा नकाशा

२६ दिवस

उद्यानाच्या क्षेत्रफळानुसार सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता अग्रघोषित करून, मुळ परवानगी अर्ज मा. उपायुक्त, मालमत्ता व व्यवस्थापन या विभागाकडे पाठविण्यात येते, तद्नंतर शुल्क आकारून, मालमत्ता व व्यवस्थापन विभाग सांस्कृतिक कार्यक्रम घेणे तसेच व्हिडीओ शुटिंग करणेसाठी परवानगी देतात.

उद्यानामध्ये शालेय विद्यार्थ्यासाठी सहली करिता शुल्क न आकारता परवानगी देणेत येते. तसेच उद्यानामध्ये फोटोग्राफी करिता ,नागरिकांच्या लेखी अर्जानुसार र.रु.५००/- शुल्क आकारून परवानगी देणेत येते.