स्थानिक संस्था कर

अशा व्यापार्‍याने नोंदणीसाठी एकच अर्ज करावा. परंतू, त्यामध्ये व्यवसायाच्या अन्य ठिकाणाच्या नोंदी नमूद कराव्यात व अशा प्रत्येक व्यावसायाच्या ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती स्थानिक संस्था कर कार्यालयाकडून उपलब्ध करुन घेवून त्या व्यवसायाच्या प्रत्येक ठिकाणी ठळक जागी लावाव्यात.

स्थानिक संस्था कर नियम १४ (३) अन्वये धंद्यामध्ये /व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करावयाचा झाल्यास किंवा बदल झाला असल्यास त्याबाबतची लेखी माहिती महापालिका आयुक्त यांना देणे बंधनकारक असून, त्याबाबत महापालिका आयुक्त आवश्यक त्या सुधारणा करुन नव्याने प्रमाणपत्र देतील. उदा. आयात करावयाच्या वस्तूमध्ये बदल, भागीदारीमध्ये बदल इ.

नोंदणी प्रमाणपत्र हस्तांरित करता येणार नाही.

स्थानिक संस्था कर नियम १७ अन्वये ज्या व्यवसायिकांना व्यवसाय बंद करावयाचा आहे किंवा ज्या व्यवसायिकानी आपला व्यवसाय बंद केला आहे, अथवा हस्तांतरित केला आहे याबाबत लेखी नमुन्यामध्ये अर्ज करणे बंधनकारक आहे.

स्थानिक संस्था कर नोंदणीकरीता असणार्‍या उलाढालीमध्ये मे. राज्य शासनाने दि. ०१/०८/२०१५ रोजीच्या अधिसूचनेनुसार सुधारणा केलेली असून, महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) (सुधारणा) नियम, २०१५ नुसार दि. १/०८/२०१५ पासून ज्या व्यापार्‍याची पुणे महानगरपालिका परिक्षेत्रात रुपये ५० कोटी व त्यापेक्षा जास्त वार्षिक खरेदी अथवा विक्रीची उलाढाल असेल अशा व्यापार्‍यांना स्थानिक संस्था कराची नोंदणी करणे बंधनकारक आहे.

नाही. केवळ झालेल्या बदलाबाबतची सविस्तर माहिती व्यापार्‍याने/नोंदणीधारकाने स्थानिक संस्था कर विभागास लेखी स्वरुपात कळविणे आवश्यक असून, त्यानंतर अशा बदलाबाबत खातरजमा करुन नोंदणी प्रमाणपत्रामध्ये त्याप्रमाणे बदल करण्यात येतील.

स्थानिक संस्था कर नोंदणीधारकाने स्थानिक संस्था कर नियम १८ नुसार १ महिन्याच्या आत व्यवस्थापकाचे नाव “नमुना च’’ प्रतिज्ञापत्रानुसार महापालिका आयुक्त यांना कळविणे आवश्यक आहे.

स्थानिक संस्था कर नियम ४८ (क) नुसार ज्या व्यापार्‍याने नोंदणी न करता व्यवसाय सुरु ठेवला असल्यास त्याने आयात केलेल्या मालावर जेवढा स्थानिक संस्था कर होईल, त्याच्या पाच पट रक्कम त्याच्याकडून वसुल करण्यात येईल.

स्थानिक संस्था कर नियम २९ नुसार प्रत्येक नोंदणीकृत व्यवसायिकाने “नमुना च’’ मध्ये नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीने यथोचितरित्या स्वाक्षरी केलेले संबंधित वर्षातील वार्षिक विवरणपत्र वर्ष समाप्तीनंतर ९० दिवसांच्या आत आयुक्तास सादर करावे.

अशाबाबत स्थानिक संस्था कराच्या दोन पट दंड वसूल करण्याची तरतूद आहे.

स्थानिक संस्था कर नियम २१ व २२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे शहरातील ज्या व्यापार्‍याकडून करयोग्य माल खरेदी केलेला आहे, त्या व्यापार्‍याकडून माल खरेदी करणार्‍या व्यापार्‍याने त्या मालाचे बिजक व प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

स्थानिक संस्था कर नियम २२ नुसार अशा विक्री करणार्‍या व्यापार्‍याने बिजके व प्रमाणपत्रे माल खरेदी करणार्‍यास देणे बंधनकारक आहे. तसेच खरेदी करणार्‍या व्यावसायिकाची नोंद त्याच्याकडील खरेदी विक्री रजिस्टरमध्ये ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये त्याचा संपुर्ण पत्ता, त्याच्या धंद्याचे स्वरुप व त्याच्याकडील व्यवसायाचा स्थानिक संस्था कराचा नोंदणी क्रमांक याचा समावेश असेल.

होय. स्थानिक संस्था कर नियम २५ अन्वये ज्यावेळी रास्त बाजारमूल्य निर्धारित करणे आवश्यक वाटेल अशावेळी माल आयात करणार्‍या व्यापार्‍याचे म्हणणे ऐकून घेऊन रास्त बाजारमूल्य निश्चित करण्याचे अधिकार आयुक्त यांना आहेत.

१. स्थानिक संस्था कराची नोंदणी करणे. (ऑनलाईन व ऑफलाईन)

२. स्थानिक संस्था कराची रक्कम भरणे. (ऑनलाईन व ऑफलाईन)

३. वार्षिक विवरणपत्र दाखल करणे. (ऑनलाईन व ऑफलाईन)

४. स्थानिक संस्था कर परतावा करणे.

१. स्थानिक संस्था कर हा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने भरता येतो.

२. हा कर (i) HDFC BANK, (एच.डी.एफ.सी. बॅंक)

           (ii) ICICI BANK, (आय.सी.आय.सी.आय बॅंक)

          (iii) INDUSIND BANK, (इंडसंड बॅंक)

          (iv) YES BANK, (येस बॅंक)

          (v) BANK OF MAHARASHTRA, (बॅंक ऑफ महाराष्ट्)

         (vi) COSMOS BANK (कॉसमॉस बॅंक)

या बँकाच्या पुणे मनपा हद्‌दीतील कोणत्याही शाखेमध्ये जाऊन भरता येतो. तसेच या व्यतिरिक्त ज्या बँका महापालिका आयुक्त वेळोवेळी पदनिर्देशित करतील त्या बँकांमध्ये देखील कराचा भरणा करता येईल.

३. स्थानिक संस्था कराचा ऑनलाईन भरणा करावयाचा झाल्यास संबंधित व्यावसायिकास स्थानिक संस्था कर कार्यालयाकडून युजर आयडी व पासवर्ड घेऊन त्याप्रमाणे चलन जनरेट करुन बँकेत भरणा करता येईल.

स्थानिक संस्था कराची रक्कम महापालिका आयुक्त चलनाद्वारे रोख स्वरुपात, डिमांड ड्राफ्ट, धनादेश, नेट बँकिंग, आरटीजीएस व एनएफटीएस द्वारे पुणे महानगरपालिकेने नेमणूक केलेल्या बँकामध्ये भरता येईल. स्थानिक संस्था कराचा भरणा डी.डी./चेकने करावयाचा असल्यास डी.डी./चेक ‘‘ पुणे महानगरपालिका, स्थानिक संस्था कर ’’ किंवा ‘‘ Pune Municipal Corporation, LBT ’’ या नावाने काढावा.

स्थानिक संस्था कर नियम ४० (क) नुसार स्थानिक संस्था कराची रक्कम तो महिना संपल्यानंतर पुढील महिन्याच्या २० तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे.

स्थानिक संस्था कर नियम ४८ (३) (एक) अन्वये असा कर भरण्याच्या शेवटच्या दिनांकानंतर दरमहा २% प्रमाणे व्याज वसुल करण्याची तरतूद आहे.