बांधकाम

बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत 

१.विहित नमुन्यातील अर्ज.

२.लायसेन्स आर्किटेक्ट/इंजिनिअर रजिस्ट्रेशन दाखला.

३.मालकी हक्काची कागदपत्रे- सहा महिन्याचे आतील 7/12 उतारा/ सिटी सर्व्हे उतारा, बी फॉर्म (टी.पी.स्कीम मधील मिळकत असल्यास)

४.बांधकाम आराखडा नकाशा 5 प्रती.

५.मोजणी नकाशा (4 वर्षाचे आतील)

६.मंजूर रेखांकन नकाशा प्रत.

७.झोनिंग डिमार्केशन

८.भूसंपादन व व्यवस्थापन विभागाचा अभिप्राय

९.मिळकत कर थकबाकी नसल्याचा दाखला

१०.स्ट्रक्चरल इंजिनिअर नेमणूकीचे पत्र

११.वकिलाचा टायटल सर्च रिपोर्ट

१२.यु.एल.सी. आदेश प्रत (असल्यास)

१३.शपथपत्र व बंधपत्र

१४.पंजीकृत कुलमुखत्यारपत्र (असल्यास)

१५.पाणी पुरवठा ना हरकत दाखला (आवश्यकतेनुसार)

१६.अग्निशामक दलाचा ना हरकत दाखला (आवश्यकतेनुसार)

१७.धर्मादाय आयुक्त यांचे ना हरकत दाखला (सार्वजनिक धर्मदाय संस्था असल्यास)

१८.हवाई दलाचे ना हरकत दाखला (हवाई दलाचे परिसरातील मिळकतींना)

१९.रेल्वे, उदयोग संचलनालय, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ,केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, जिल्हा कार्यकारी दंडाधिकारी इ. ना हरकत दाखला (आवश्यकतेनुसार)

२०.कामगार आयुक्त ना हरकत दाखला (आवश्यकतेनुसार)

२१.उप निबंधक ना हरकत पत्र (सोसायटी पुनर्विकसन प्रस्तावांसाठी)

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१.विहित नमुन्यातील अर्ज

२.ला.आर्किटेक्ट यांचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला

३.स्ट्रक्चरल इंजिनिअर दाखला

४.मिळकत कर थकबाकी नसल्याचा दाखला

५.भोगवटयाबाबतचे हमीपत्र

६.उदयान विभागाचे ना हरकत दाखला.

७.अग्निशमन विभागाचे ना हरकत दाखला(आवश्यकता असल्यास)

८.लिफ्ट ना हरकत दाखला (आवश्यकता असल्यास)

९.प्रदुषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र (आवश्यकता असल्यास)

१०.पार्ट भोगवटापत्रासाठी हमीपत्र

११.सोलर सिस्टीम साठींचे दाखले.

१२.मैलापाणी शुध्दीकरण यंत्रणेबाबत (एस.टी.पी.) दाखला(आवश्यकता असल्यास)

 

१३.गांडूळ खत प्रकल्पाबाबतचा दाखला.

जोते तपासणी दाखला मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१.विहित नमुन्यातील अर्ज.

२.जोते लेव्हलचे बांधकामाचा ला.आर्किटेक्ट यांचे स्वाक्षरीचा नकाशा.

३.स्ट्रक्चरल इंजिनिअर दाखला

४.स्ट्रक्चरल डिझाइन्स नकाशे.

 

५.जागेवरील बांधकामाचे नकाशे.

पुणे मनपा क्षेत्रात भुखंडाच्या क्षेत्रानुसार व रस्त्याच्या रूंदीनुसार १०० मीटर उंच इमारतीस परवानगी मिळू शकेल. भुखंडाच्या क्षेत्रानुसार व रस्त्याच्या रूंदीनुसार मान्य होणा-या इमारतीच्या उंचीचा सविस्तर तक्ता मान्य विकास नियंत्रण नियमावली टेबल क्र.27 व कलम २१.६.६ मध्ये दिलेली आहे.त्याव्यतिरिक्त खालील शासन अधिसूचनेनुसार ३६ ते १०० मी. इमारतींच्या उंची बाबत निर्णय घेण्यात येतात.

अ.जुनी हद्द – शासन परिपत्रक निर्णय क्र. टीपीएस1807/252/प्र.क्र.630/07/ नवि-13 दि.15/11/2007.

ब. वाढीव हद्द - शासन परिपत्रक निर्णय क्र.   टीपीएस 1806 / 2125 / प्र.क्र.435(अ)/ 06/ नवि-13   दि.12/07/2010.

१) पुणे शहराच्या जुन्या हद्दीची विकास योजना दि. 5 जानेवारी 1987 रोजी मंजूर झाली

जुन्या पी.एम.सी. हद्दीसाठी हायराईज बिल्डींग तक्ता -

अ.क्र.

हायराईज इमारतीची अनुज्ञेय उंची

आवश्यक कमीत कमी प्लॉटचे क्षेत्र

आवश्यक पोहोच रस्त्याची कमीत कमी रूंदी ...मी.

इतर बाजूची आवश्यक सामसीक अंतरे ... मी.

समोरील सामासीक अंतर... मी.

३६ मी. पेक्षा जास्त व ४० मी. पर्यंत

२०००

१२

४० मी. पेक्षा जास्त व ५० मी. पर्यंत

४०००

१५

१२

५० मी. पेक्षा जास्त व ७० मी. पर्यंत

६०००

१८

१०

१२

७० मी. पेक्षा जास्त व १०० मी. पर्यंत

८०००

२४

१२

१२

 

२) मौजे सुतारवाडी (पाषाण) वाढीव हद्द विकास आराखडा सन 1992 मध्ये मंजूर झाली.

३) पुणे शहर नवीन हद्द (२३ गावे) क्षेत्राची विकास योजना दि. 17.5.2008, दि. 29.5.2009, दि.2.3.2012, दि. 4.4.2012, दि. 30.8.2013, दि. 13.2.2014, दि. 5.8.2015 याप्रमाणे टप्प्याटप्प्याने भागश: मंजूर झाली.

हायराईज इमारतीची उंची खाली दिलेल्या तक्त्यातील तरतूदी नुसार अनुज्ञेय होईल.

डी.सी.रूल नं.२१.६.६ –

 

अ.क्र.

हायराईज बिल्डींग आवश्यक उंची (मी. )

भूखंडाचे कमीत कमी अत्यावश्यक क्षेत्रफळ (चौ.मी.)

पोहोच रस्त्याची कमीत कमी रूंदी (मी.)

इतर बाजूची आवश्यक सामसीक अंतर ... (मी.)

समोरील सामासीक अंतर...( मी.)

३६ मी. पेक्षा जास्त आणि ५० मी. पर्यंत

२०००

१२

५० मी. पेक्षा जास्त व ७० मी. पर्यंत

६०००

१८

१०

१२

७० मी. पेक्षा जास्त व १०० मी. पर्यंत

८०००

२४

१२

१२

मान्य विकास नियंत्रण नियमावली 13.4 नुसार 20 चौ.मी. क्षेत्राचा भुखंड असणे आवश्यक आहे. 

मनपा क्षेत्रातील जुनी हद्द व नविन हद्द यांचे चटर्इ क्षेत्र निर्देशांक खालील प्रमाणे आहेत.

जुनी हद्द – पुणे महानगरपालिका जुन्या हद्दीतील मान्य विकास नियंत्रण नियमावलीनुसार दाट वस्तीमध्ये ९ मी. पर्यंत रस्तारुंदी असलेल्या मिळकतीस निवासी क्षेत्रासाठी १.५ चटर्इ क्षेत्र ,तसेच ९ मी. पेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावर निवासी क्षेत्रासाठी १.५ चटई क्षेत्र निर्देशांक व ०.५ व्यवसायिक वापरासाठी चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येतो. विरळ वस्तीमध्ये निवासी क्षेत्रासाठी १ चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येतो. तसेच मान्य विकास नियंत्रण नियमावली अट क्र.एन २.२.२ vते एन २.२.८ नुसार विविध वापराच्या अनुषंगाने चटर्इ निर्देशांक देण्यात येतो.

वाढीव हद्द - पुणे महानगरपालिका वाढीव हद्दीतील मान्य विकास नियंत्रण नियमावली क्र.एम - १६ नुसार विनापरवाना विभागणी करण्यात आलेल्या विरळ  वस्तीतील भूखंडाला ०.७५ चटर्इक्षेत्र व दाट वस्तीतील भूखंडाला १.०० चटर्इक्षेत्र निर्देशांक देण्यात येते.

होय. बांधकाम विभागाकडील टी.डी.आर. खर्ची विभागाकडून सदरबाबत कार्यवाही करण्यात येते. त्यानुसार बांधकाम नकाशांची मंजुरी बाबतची कार्यवाही संबंधीत बांधकाम परवानगी विभागाकडून करण्यात येते.

शासन परिपत्रक निर्णय क्र.टीपीएस/1813/3067/प्र.क्र.122/12/मनपा/ नवि-13 दि.28/1/2016 नुसार अनुद्येय तपशील खालील प्रमाणे आहे.

sr. No.

Plots Fronting on Road width

Maximum permissible TDR Loading

Plot area in sq.mt.

Upto 1000 sq.mt.

1000 to 4000 sq.mt

4000 sq.and above

1

2

3

4

5

1

9mt and above but less than 12

0.20

0.40

0.40

2

12mt and above but less than 18

0.30

0.50

0.65

3

18mt and above but less than 24

0.30

0.60

0.90

4

24mt and above but less than 30

0.30

0.80

1.15

5

Above than 30 mt.

0.30

1.00

1.40

टी.डी.आर. म्हणजे हस्तांतरणीय विकास हक्क. विकास योजनेतील सार्वजनिक प्रयोजनाची जागा महापालिकेस ताब्यात दिल्यानंतर रोख मोबदल्याऐवजी हस्तांतरणीय विकास हक्क प्रमाणपत्र (D.R.C.) अदा करण्यात येते. ज्यामध्ये देण्यात आलेला टी.डी.आर. (एफ.एस.आय. स्वरुपात) व टी.डी.आर. वापराचा तपशील नोंदविण्यात येतो. सदरचा एफ.एस.आय. D.R.C. धारक स्वत: वापरु शकतो किंवा दुस-यास विकू शकतो.

सदरची यादी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/en या संकेतस्थळावर ऑनलार्इन सर्व्हिसेस या शिर्षकाखाली उपलब्ध आहे.

टी.डी.आर.प्रस्तावासोबत दाखल करावयाची कागदपत्रे -

१. टी.डी. आर. पुस्तक  व  भूसंपादन व व्यवस्थापन  विभागाचा अभिप्राय

२. रू. २५०००/- भरले असल्याचे चलन

३. ७/१२ उतारे (मागील १९५० पासून अद्यावत) /प्रॉपर्टी कार्ड  

४. सर्व फेरफार व मालकी हक्‍काबाबत (वंशावेलीबाबतचा चार्ट)पुणे महानगरपालिकेकडे प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरु असताना जागा मालकाचा मृत्यू झाल्यास अर्जदाराने मनपास त्वरीत कळविणे बंधनकारक आहे.

५. चेोकशी रजिस्टर उतारा (प्रॉपर्टी कार्डवर नाव नसल्‍यास )

६. बी फॉर्म व टी.पी.स्‍कीमचा साईट प्लॅन (मिळकत  टी.पी.स्‍कीम मधील असल्यास)

७. नवीन किंवा मोजणी नकाशा  ४ वर्षाचे आतील  व भूमी जिंदगी विभागास मोजणी

 खात्याने दिलेले पत्र .

८. फाळणी नकाशा /फाळणी नसल्यास फाळणी उपलब्ध नसल्याबाबतचे  मोजणी अधिका-याचे पत्र .

९. गाव नकाशा

१०.प्रारुप विकास आराखडयाचा  साईट प्लॅन (मिळकत जुन्या हद्‌दी मधील असल्‍यास)

११ सन १९८७ विकास आराखडा साईट प्लॅन (जुन्या हद्दीकरीता)

१२. सूक्ष्मदर्शी नकाशा (ए to आर) साईट प्लॅन (जुन्या हद्दीकरीता)

१३. विकास आराखडा साईट प्लॅन (नवीन हद्दीकरीता) (सन २००८ )

१४. खात्‍याचे झोनिंग डिमार्केशन

१५. झोन दाखला

१६. अदययावत गुगल इमेज (रंगीत ,फोटो पेपरवर मिळकत लाल रंगाने दर्शवून )

१७. जागेवरील फोटो ( बोर्डासहीत / कपाऊंड वॉल  व गेट सह /कपाऊंड वॉल आरक्षणाकरीता फक्त)

१८. लायसेन्स आर्किटेक्ट यांचे Area Certificate & Triangulation Area statement  ज्या मध्ये मिळकत संपूर्ण क्षेत्र अतिक्रमण विरहित असल्‍याचे नमुद करणे आवश्यक आहे  व ला.आर्कि. यांचे लायसन्स्‌   

१९. टॅक्स भरल्याची पावती

२०. यु.एल.सी. ऑडर्र  (आवश्यकतेनुसार )

२१. टायटल सर्च रिपोर्ट  (अर्जदार यांचे वकिलांचे )मुळ पावतीसह

२२. सर्व खरेदी खते/ पॉवर ऑफ ऍटर्नी (मुळ/संबंधित खात्‍याकडील प्रमाणित प्रत)

२३. यु.एल.सी. चे शपथपत्र व बंधपत्र रू. ३००/- चे स्टॅम्प पेपरवर  जागा मालकांचेनावे

२४. Declaration cum Indeminity Bond रू३०० चे स्‍टॅम्‍प पेपरवर

२५. प्रस्तावाबाबतचे हमीपत्र रू २०० चे स्‍टॅम्‍प पेपरवर ( याबाबतचा मसुदा पुणे मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्‍ध आहे.)

२६. मोबदला घेतला नसलयाचे हमीपत्र रू २०० चे स्‍टॅम्‍प पेपरवर ( याबाबतचा मसुदा पुणे मनपाच्या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. )

२७. मूळ प्रस्तावातील व ४ ऍडव्हान्स कॉपीतील (झेरॉक्स प्रती मधील) कागदपत्रे सारखीच असल्याबाबतचे हमीपत्र रू २००/- चे स्टॅम्प पेपरवर  ( याबाबतचा मसुदा पुणे मनपाच्या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. )

२८. ओळख पत्र (पॅन कार्ड/आधार कार्ड/पासपोर्ट इ.)

२९. स्क्रुटिनी रिपोर्ट  (वेब साईट वर उपलब्‍ध )

३०. वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करावयाची नोटीस सॉफ्ट व हार्ड कॉपीमध्ये (यानोटीसीचे टायपिंग युनिकोड  लिपी व मंगल फॉंट)

टीपः- उपरोक्‍त नमुद सर्व कागदपत्रे मुळ प्रतीत अथवा संबंधित खात्याकडील प्रमाणित प्रती दाखल करणे अनिवार्य आहे.

टी.डी.आर. खर्ची टाकण्याच्या प्रस्तावासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

1. चलन पावती
2. एमआरटीपी फॉर्म
3. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टीफिकेट
4.सोसायटी एनओसी/ठराव
5. टी.डी.आर. खर्ची टाकावयाचे हमीपत्र
6. युएलसी ऑर्डर/शपथपत्र व बंधपत्र
7. टी.डी.आर. झोन दाखला
8. टॅक्स एनओसी
9. सार्इट प्लॅन
10. स्टॅंप ड्युटी इनव्हॉर्इस
11. डीड ऑफ डिक्लरेशन/टीडीआर सेलडीड
12. डी.आर.सी.प्रमाणे ७/१२ उतारा
13. लोकेशन प्लॅ
14. जागेवरील सद्यस्थितीचा फोटो
15. मालकी हक्काची कागदपत्रे (7/12 उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा) चालू तारखेचे मूळ प्रतीत
16. कुलमुखत्यारपत्र व विकसन करारनामा प्रमाणित प्रती (लागू असल्यास)
17 मंजूर बांधकाम परवानगी नकाशा सत्यप्रत (लायसन्स आर्किटेक्टची)
18. मूळ डी.आर.सी. झेरॉक्स
19. र.रु. २२०/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
20. र.रु. २२०/- स्टॅम्प पेपरवर हमीपत्र
21. Letter of consent for TDR utilization
22. नोंदणीकृत टी.डी.आर. हस्तांतरण करारनामा (मूळप्रत/प्रमाणितप्रत)

१) पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील टी.डी.आर. सेल येथे टी.डी.आर. पोटी जागा ताब्यात देण्याचा प्रस्ताव दाखल करावा.

२) पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील टी.डी.आर.(खर्ची विभाग) येथे टी.डी.आर. खर्ची टाकण्याचा प्रस्ताव दाखल करावा.

३)शासनाचे दि.२८/१/२०१६चे अधिसूचनेतील कलम ६.९ नुसार इन्फ्रास्ट—क्चरल इम्प्रुव्हमेंट चार्जेस रेडी रेकनरमधील बांधकाम दराचे ५% दराने भरावे लागतात. म्हणजेच सन २०१५-१६ मधील रेडी रेकनरमधील बांधकाम दर र.रु.२२,०००/- चे ५% रक्‍कम रु.रु.११००/-भरावे लागतात.

१) टी.डी.आर. खर्ची प्रस्तावासाठी प्रशासकीय शुल्क र.रु. १०००/- प्रति चौ.मी.

२) स्लम टिडीआर खर्ची प्रस्तावासाठी प्रशासकीय शुल्क र.रु. ३०/- प्रति चौ.मी. व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चार्जेस र.रु. 1000/- प्रति चौ.मी. एवढे आकारले जातात.

पुणे मनपाची वेबसार्इट https://pmc.gov.in/enयावर खालील उल्लेखीत ठिकाणी सदर नियमावली उपलब्ध आहे.

 

अ.पुणे महापालिकेची जुनी हद्‌द - Development  plan-DC rules old limit तसेच एम.आर.टी.पी सेक्शन 28(4) व 26(1) अंतर्गत शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रारूप आराखडयाची प्रत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 

ब. पुणे महानगरपलिका वाढीव हद्द – DP Plan 23 villages.

भुखंडावरील बांधकाम क्षेत्र 20,000 चौ.मी. पेक्षा जास्त असलेल्या प्रकल्पांना Environment Clearance दाखला आवश्यक आहे.

कर आकारणी पावती (प्रॉपर्टी टॅक्‍्स बील) व कर भरल्याची पावती असणे, म्हणजे बांधकाम परवानगी मिळालेली आहे अथवा बांधकाम नियमीत आहे, असे होत नाही.

लायसेन्स आर्किटेक्ट/ला.इंजिनिअर यांनी प्री-डीसीआर करणे.

  1. प्री-डीसीआर पूर्ण झाल्यावर ऑनलाईन पध्दतीने प्रकरण दाखल करणे.

  2. प्रकरण ऑनलाईन पध्दतीने दाखल केल्यावर स्क्रुटीनी चलन बांधकाम विकास विभाग पुणे महानगरपालिका येथून प्राप्त करून भरणा करणे.

  3. मूळ प्रकरण हार्डकॉपी स्वरूपात बांधकाम विकास विभाग येथे चलन सहित दाखल करणे.

  4. हार्डकॉपी फाईलची तपासणी संबंधित विभागाचे इमारत निरिक्षक यांचेमार्फत करणेत येते.

  5. तसेच प्रत्यक्ष जागा पाहणी करण्यात येते.

  6. प्रकरणात तांत्रिक, प्रशासकिय, कागदपत्रांची पूर्तता (असल्यास) पूर्ण झाल्यावर बांधकामांच्या बांधकाम प्रकरणानुसार संबंधित उप अभियंता/कार्यकारी अभियंता यांचेकडे मान्यतेसाठी सादरकरण्यात येते.

 

  1. विशिष्ट बांधकाम प्रस्ताव जसे पेट्रोल पंप, आर-7 अंतर्गत प्रस्ताव, झोन बदल इ. स्वरूपाची प्रकरणे मा.महापालिका आयुक्त स्तरावर मंजूर करण्यात येतात.

  2. प्रस्ताव मान्य झाल्यावर आवश्यक विकास व इतर शुल्क चे चलन महानगरपालिकेच्या कोषागरात भरण्यात येते.

  3. सदर शुल्क भरल्यावर बांधकाम परवानगी दाखला (कमेन्समेंट सर्टिफिकेट) व नकाशे संबंधित झोन मार्फत देण्यात येतात.

सदरची माहिती पुणे महानगरपालिकेच्या खालील दिलेल्या लिंकवर उपलब्ध् आहे.

https://pmc.gov.in/en – online service – building sanction/ registrations. तसेच पुणे महानगरपालिकेच्या विविध झोन क्र.१,४,५,६ कडील प्रकरणे  बांधकाम विकास विभाग, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत पहिला मजला,शिवाजी नगर, पुणे-०५ येथे उपलब्ध आहेत. झोन क्र.२, ३  कडील प्रकरणे बांधकाम विकास विभाग, सावरकर भवन, बालगंधर्व मंदिरा जवळ, तिसरा मजला, शिवाजी नगर, पुणे-०५ येथे उपलब्ध आहेत.  झोन क्र.७ कडील प्रकरणे बांधकाम विकास विभाग, सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय, हिराबाग चौक टिळक रोड, पुणे येथे उपलब्ध आहेत.

प्रचलित दराप्रमाणे हे दर खालीलप्रमाणे आहेत.

1- स्क्रुटीनी फी-

 अ)निवासी :- र.रू.50 प्रति 10 चौ.मी. परंतु कमीत कमी रू.300/- आणि जास्तीत जास्त रू.30,000/-

 ब)व्यापारी :- र.रू.100 प्रति 10 चौ.मी. परंतु कमीत कमी र.रू.2000/- आणि जास्तीत जास्त रू.50,000/-

 क)औदयोगिक :- र.रू.100 प्रति 10 चौ.मी. परंतु कमीत कमी र.रू.2000/- आणि जास्तीतजास्त रू.50,000/-

2- जमिन विकास शुल्क -

 अ) निवासी :- जमिन दराचे 0.5 % शीघ्रसिध्दगणक(रेडीरेकनर) पत्रकानुसार.

 ब) व्यापारी :- जमिन दराचे 1 % शीघ्रसिध्दगणक (रेडीरेकनर) पत्रकानुसार.

 क) औदयोगिक :- जमिन दराचे 0.75 % शीघ्रसिध्दगणक(रेडीरेकनर) पत्रकानुसार.

 3- बिल्डींग डेव्हलपमेंट चार्जेस

 अ) निवासी :- जमिन दराचे 2 % शीघ्रसिध्दगणक(रेडीरेकनर) पत्रकानुसार.

 ब) व्यापारी :- जमिन दराचे 4 % शीघ्रसिध्दगणक(रेडीरेकनर) पत्रकानुसार.

 क) औदयोगिक :- जमिन दराचे 3 % शीघ्रसिध्दगणक(रेडीरेकनर) पत्रकानुसार.

४-  प्रिमियम चार्जेस-

1.बाल्कनी झोन प्रमाणे-

झोन अे- र.रू.2500 प्रति चौ.मी.

झोन बी- र.रू.3000 प्रति चौ.मी.

झोन सी- र.रू.1750 प्रति चौ.मी.(निवासी) व र.रू.3000/- प्रति चौ.मी. (व्यापारी)

झोन डी- र.रू.1000 प्रति चौ.मी.(निवासी) व र.रू.1750/- प्रति चौ.मी. (व्यापारी)

2.जीना पॅसेज लिफ्ट शीघ्रसिध्दगणक(रेडीरेकनर) पत्रकानुसार जमिन दराचे 60% दराने अथवा झोन अे, बी, सी व डी साठी अनुक्रमे र.रू.4800/-, 5400/-, 3100/- व 2400/- प्रति चौ.मी. यापैकी जास्तीत जास्त दराने

3.टेरेस- शीघ्रसिध्दगणक(रेडीरेकनर) पत्रकानुसार जमिन दराचे 40% दराने व्यापारी व औदयोगिक वापरासाठी उपरोक्त दराचे दुप्पट दराने

4.उपकर-निवासीसाठी बांधकाम दराचे 1% दराने व व्यापारी औदयोगिकसाठी बांधकाम दराचे 1.5 % दरानेएकूण बांधकाम क्षेत्रावर

5.कॉलनी लाईन डेव्हलपमेंट -व्यापारी, निवासी, औदयोगिक वापराकरीता - प्लॉटच्या परिमितीच्या 1/4 लांबीला र.रू.3640/-प्रती र.मी. व ज्या प्लॉटचे क्षेत्रफळ 200 चौ.मी. पेक्षा कमी आहे अशा प्लॉट करीताएकवट रक्कम 10,550/-

6.स्थानिक संस्था कर (एल.बी.टी).- (लागू असल्यास)-

अ) इमारतीची उंची 4 मजल्यापर्यंत- प्रति मजला र.रू.100 प्रति चौ.मी.

ब) इमारतीची उंची 4 ते 6 मजल्यापर्यंत- प्रति मजला र.रू.150 प्रति चौ.मी.

क) इमारतीची उंची 6 मजल्यापेक्षा जास्त - प्रति मजला र.रू.200 प्रति  चौ.मी.  

आवश्यक कागदपत्रांच्या पुर्तते नंतर एमआरटीपी अॅक्ट ४५, मान्य विकास नियंत्रण नियमावली नुसार नकाशे सादर केल्यानंतर 60 दिवसाचे आत बांधकाम परवानगी देण्यात येते.

होय. पुणे महानगरपालिकेचा जुन्या हद्दीसाठी नविन विकास नियंत्रण नियमावली शासनाकडे मान्यतेसाठी सादर केलेली असून त्याची प्रत पुणे मनपाची वेबसार्इट https://pmc.gov.in/en यावर खालील उल्लेखीत ठिकाणी सदर नियमावली उपलब्ध आहे. पुणे महानगरपलिका जुनी हद्द – Draft plan for old pmc limt u/s 28 (4)- Development control & promotion regulations – 2015 (New). 

पुणे महानगरपालिके मार्फत विहित नमुन्यातील प्राप्त बांधकाम प्रस्ताव तत्काळ मंजुरीसाठी फास्ट्रॅकसिस्टीम व्दारा नविन बांधकाम प्रस्ताव 24 तासात मान्य करण्याचे धोरण आहे. याबद्दल सविस्तर तपशिल खालील दिलेल्या लिंकवर उपलब्ध् आहे. https://pmc.gov.in/en/informpdf/City%20Engineer%20office/FAST_TRACK_modalities.pdf

सदरची माहिती पुणे महानगरपालिकेच्या खालील दिलेल्या लिंकवर उपलब्ध् आहे.

http://203.153.37.242/bpams/PMC/subscriberlogin.aspx

http://www.punecorporation.org – online service – building sanction / registrations.

तसेच पुणे महानगरपालिकेच्याविविध झोन नुसार बांधकामविकासविभाग, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत पहिला मजला,शिवाजी नगर, पुणे-०५ येथे उपलब्ध आहे.

विकसकाने करारनामा नुसार दयावयाच्या बाबींची पुर्तता केली नसेल तर त्याची तक्रार ग्राहक मंच (consumer court) अथवा दिवाणी न्यायालय येथे करावी तसेच मंजूर बांधकाम नकाशा व परवानगी संदर्भात काही तक्रार असल्यास त्याची तक्रार बांधकाम विकास   विभाग, पुणे महानगरपालिका येथे करावी.

सदरची माहिती पुणे महानगरपालिकेच्या खालील दिलेल्या लिंकवर उपलब्ध् आहे.https://pmc.gov.in/en/informpdf/City%20Engineer%20office/Structural_Engg_list.pdf 

तसेच पुणे महानगरपालिकेच्याविविध झोन नुसार बांधकामविकास विभाग, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत पहिला मजला,शिवाजी नगर, पुणे-05 येथे उपलब्ध आहे.

होय. हरित पट्‌टयातील भूखंडावर मान्य विकास नियंत्रण नियमावलीनुसार  क्षेत्राच्या जास्तीत जास्त 4% बांधकामासाठी गोल्फ क्लब, नर्सरी, खतगोडाउन,  इलेक्ट्रिकल सबस्टेशन, जलनि:सारण व पाणी प्रकल्प तसेच त्यामधील कर्मचा-यांची या निवासस्थाने, स्पोर्ट व गेम हेल्थ क्लब, टेनिस कोर्ट व सर्विस रेस्टॉरंट,फार्म हाऊस इ. बाबत खालील नमूद केलेल्या तरतुदीनुसार परवानगी मिळू शकते.

1. जुनी हद्द – मान्य विकास नियंत्रण नियमावली अट क्र.एम 7 पान क्र.134, 135 व 205 नुसार उल्लेखित बाबीं.

2. वाढीव हद्द – वारील व्यतिरिक्त वाढीव हद्दितीसाठी मान्य विकास नियंत्रण  नियमावली मधील पान क्र.14 नुसार उल्लेखित बाबीं.