कर संकलन

मिळकतीच्या हस्तांतरणाकरीता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
१. मालकी  हक्काची कागदपत्रे (सातबारा/प्रॉपर्टी कार्ड /खरेदीखत /इंडेक्स 2)
२. सोसायटी असल्यास सोसायटीचा ना हरकत दाखला
३. चालू आर्थिक वर्षाअखेर संपूर्ण कर भरलेली पावती. (ना देय प्रमाणपत्र)
४. ओनर अॅmक्युपायर नावातील बदलासह अन्य मिळकत हस्तांतरण फी करयोग्य मूल्य १ ते ५०० पर्यंत रू.१००० व  त्यापुढील प्रत्येक शेकडयास अगर त्याच्या भागास रू.३०
५. पूरग्रस्त वसाहतीमधील नावात बदल करणेसाठी मा. जिल्हा अधिकारी कडील ‘फिल्ड रजीस्टर’ चा उतारा. असा उतारा नसल्यास मा. स्थायी समितीने मान्यता दिल्यानुसार मुळ मालकाचे नाव कायम ठेवून वसुल देणार म्हणून नवीन नावाचे नोंद घेतली जाते.

वारसा हक्काने हस्तांतरण करण्याकरिता खालील कागदपत्रे आवश्यक आहेतः
१ मिळकतधारकाचा मृत्यू दाखला.
२. वारसाहक्काबाबत प्रतिज्ञापत्र/ कोर्ट प्रमाणपत्र,हेअरशिप/सक्सेशन सर्टिफिकेट वारसाहक्काबाबत असल्यास त्याची सत्यप्रत/इच्छापत्राची सत्यप्रत
३. सोसायटी असल्यास सोसायटीचा ना हरकत दाखला/भाग हस्तांतरण केल्याच्या दाखल्याची प्रत.
४. चालू आर्थिक वर्षाअखेर संपूर्ण कर भरलेली पावती(ना देय प्रमाणपत्र)
५. निवासी मिळकतीस हस्तांतरण फी करयोग्य मूल्य १ ते ५०० पर्यंत रू.२० व  पुढील प्रत्येक शंभरास रू.१५
६. बिगर निवासी मिळकत व मोकळी जागा वारस हक्काने बदलासाठी हस्तांतरण फी करयोग्य मूल्य १ ते ५०० पर्यंत रू.५०० व पुढील प्रत्येक शंभरास रू.३०.
7. खरेदी खत न करता केवळ कंपनीच्या नावातील दुरूस्ती / बदलाबाबत वरील अ.क्र  ६ मध्ये दर्शविण्यात आलेली फी स्विकारण्यात येते.

मिळकतीच्या हस्तांतरणाकरीता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
१. मालकी  हक्काची कागदपत्रे (सातबारा/प्रॉपर्टी कार्ड /खरेदीखत /इंडेक्स 2)
२. सोसायटी असल्यास सोसायटीचा ना हरकत दाखला
३. चालू आर्थिक वर्षाअखेर संपूर्ण कर भरलेली पावती. (ना देय प्रमाणपत्र)
४. ओनर ऍक्युपायर नावातील बदलासह अन्य मिळकत हस्तांतरण फी करयोग्य मूल्य १ ते ५०० पर्यंत रू.१००० व  त्यापुढील प्रत्येक शेकडयास अगर त्याच्या भागास रू.३०
५. पूरग्रस्त वसाहतीमधील नावात बदल करणेसाठी मा. जिल्हा अधिकारी कडील ‘फिल्ड रजीस्टर’  चा उतारा. असा उतारा नसल्यास मा. स्थायी समितीने मान्यता दिल्यानुसार मुळ मालकाचे नाव कायम ठेवून वसुल देणार म्हणून नवीन नावाचे नोंद घेतली जाते.

इमारतीची कर आकारणी करताना मिळकतीचे कारपेट क्षेत्रफळ विचारात घेतले जाते.

मिळकतींवर खालील बाबी विचारात घेऊन आकारणी केली जाते
१. मिळकतीचे चटईक्षेत्र (कारपेट) क्षेत्रफळ
२. मिळकतीचे प्रकार -  निवासी/बिगरनिवासी /मोकळ्या जागा /मिश्र
३. मिळकत ज्या विभागात आहे त्या विभागातील वार्षिक करयोग्य मुल्याचा प्रति चौरस फूट दर. (पुणे मनपाचे स्वतंत्र रेडी रेकनर आहे.)
४. बांधकामाचा प्रकार - आर.सी.सी बांधकाम / लोड बेअरींग/पत्रा शेड

कर आकारणीबाबत हरकत न आल्यास २१ दिवसांत व हरकत आल्यास ६० दिवसात सुनावणी घेवून मिळकतीवर कर आकारणीची कार्यवाही पुर्ण केली जाते.

पुणे मनपा मुख्य इमारत व मिळकत ज्या क्षेत्रिय / संपर्क कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येते त्या कार्यालयामध्ये तक्रारीच्या निराकरणासंदर्भात संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन तक्रार complaint.punecorporation.org  या संकेतस्थळावर करता येईल.

 

१. मिळकतकराची रक्कम रोख/चेक/डी डी ऑनलाईन स्वरूपात स्वीकारली जाते.
२. करसंकलन विभागाच्या १५ विभागीय व ७ संपर्क कार्यालयांत किंवा महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये रक्कम रोख/चेकने या मिळकतकराची रक्कम स्वीकारली जाते.
३. महानगरपालिकेने विविध क्षेत्रीय/ संपर्क कार्यालयात तसेच विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कीऑक्स मशीनद्वारे चेक रक्कम स्विकारली जाते.
४. एचडीएफसी, कॉसमॉस, आयसीआयसीआय या बँकेच्या शाखेमध्ये मिळकत कर स्विकारला जातो.
५. तसेच ऑनलाईन पेमेंटसाठी propertytax.punecorporation.org महापालिकेच्या या संकेतस्थळावर मिळकतकराची रक्कम ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.


1) आमच्या वेब पोर्टल propertytax.punecorporation.org भेट द्या
2) माझ्या मालमत्ता तपशील क्लिक करा
3) आपले मालमत्ता id प्रविष्ट करा.
4) नंतर मालमत्ता दिले तपशील क्लिक करा.
5) चलन संख्या वर क्लिक करा.
6) मग पावती प्रिंट वर क्लिक करा क्लिक करा.

१. सर्व मिळकतधारकांना मिळकतकराच्या बिलाचे वाटप केंद्र सरकारच्या पोस्ट विभागा मार्फत केले जाते.

२. मिळकत ज्या विभागीय करसंकलन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येते त्या विभागीय कार्यालयात किंवा महापालिकेच्या   propertytax.punecorporation.org  या संकेतस्थळावरही मिळकतीचे बिल मिळकत संगणक क्रंमांक टाकून मिळते.

पहिली सहामाही (दिनांक १ एप्रिल ते ३० सप्टेंबर) या कालावधीची संपुर्ण मिळकतकराची रक्कम भरण्यास दिनांक ३० जून अखेर अशी मुदत असून, दुसरी सहामाही ( दिनांक १ आक्टोंबर ३१ मार्च) या कालावधीची संपुर्ण मिळकतकराची रक्कम्भ रण्यास दिनांक ३१ डिसेंबर अखेर अशी मुदत देण्यात आली आहे.

१. पहिल्या सहामाहीची रक्कम ३० जून अखेर न भरल्यास दिनांक  १ जूलै पासून प्रति महा २ % व दुस-या सहामाहीची रक्कम ३१ डिसेंबर अखेर न भरल्यास दिनांक १ जानेवारीपासुन प्रति महा २% दराने मनपा दंडाची आकारणी करते.
२. थकबाकी रक्कमेवर प्रति महा २ % दराने शास्तीची आकारणी केली जाते.
३. विहित मुदतीत मिळकतकराची रक्कम भरणा न केल्यास शिक्षणकर, रोजगार हमी कर या शासनकरावर  वार्षिक १०% दराने शिक्षणकर नोटीस फी व रोजगार हमी कर नोटीस फी ची आकारणी केली जाते.


धनादेश / पे ऑर्डर ‘कर आकारणी व कर संकलन प्रमुख पुणे मनपा’  यांचे नावे काढावेत. इंग्रजीमध्ये (Assessor & Collector of Taxes PMC) यांचे नावे काढावेत.

1. महापालिकेच्या www. punecorporation.org     or    propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर मध्ये  pay tax online  या  link वर click करा.
2. त्यानंतर property id नंबर(संगणक क्रं  O/P/F ने सुरूवात होते )  भरा व submit वर click करा.
3. आपल्या मिळकतीचा तपशील तपासून pay online  वर click करा.

१. मिळकत ज्या विभागीय /क्षेत्रीय कार्यालये तसेच संपर्क कार्यालये व मनपा मुख्य भवन येथील करसंकलन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येते, त्या कार्यालयामध्ये रूपये २५/- दाखला फी व मिळकतकराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर थकबाकी नसल्याचा दाखला मिळेल.
२. ऑनलाईन एनओसी/ ना हरकत propertytax.punecoporation.org या संकेतस्थळावर जावून GET NOC वर click करा.
३. नंतर मोबाईल नंबर  व ईमेल आयडी भरा. OTP क्रमांक आपल्या मोबाईल नंबर वर आल्या नंतर तो टाकून submit करा.
४. मिळकतीचा संगणक क्रमांक भरून submit करा. व save बटन वर click करून online NOC साठी apply  होईल व कार्यालयीन 3 दिवसात आपल्या ईमेल आयडी वर सदर मिळकतीची  NOC उपलब्ध होईल.

नाही. वाढीव बांधकाम ज्या वर्षात पूर्ण झालेले असेल त्या सरकारी वर्षाच्या प्रचलित दरानेच केली जाते.

१.संपुर्ण मिळकतकराचा भरणा थकबाकीसह ३० जून पर्यंत केल्यास चालू वर्षाच्या संपुर्ण  सामान्य करात खालीलप्रमाणे सवलत दिली जाते. मिळकतकरा अंतर्गत येणारी एकूण मागणी विचारात घेवून  त्यामधील सर्वसाधारण कराच्या चालू  मागणीची रक्कम रू.२५०००पेक्षा  कमी आहे  त्यांना सर्वसाधारण कराच्या चालू मागणी रकमेत १० टक्के सूट व ज्यांची सर्वसाधारण कराची चालू मागणीची रक्कम  रू.२५००१ पेक्षा अधिक आहे त्यांना सर्वसाधारण कराच्या चालू मागणी रकमेत ५ टक्के सवलत दिली जाते.
२.स्वातंत्र्य सैनिकः स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत यांच्या एका निवासी मिळकतीस सामान्यकरात १००% सवलत.
३. ज्या निवासी मिळकतीमध्ये सौरउर्जा,गांडूळखत प्रकल्प,रेनवॉटर हार्वेस्टिंग केले असेलः
१) पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या निवासी मिळकतींमध्ये (१) सौरऊर्जा वापर, (२) पावसाच्या पाण्याची साठवणूक करुन ते पुन्हा रिसायकलिंग करुन वापरात आणणे, (३) ओला व सुका कचरा वेगळा करुन गांडूळखत प्रकल्प राबविणे. या तीन पैकी दोन बाबींची अंमलबजावणी करणारे निवासी मिळकतदाराच्या मिळकतीस लागू असणाऱ्या चालू  करांच्या एकूण रकमेच्या १०% सूट( पाणीपटटी व शासनाचे कराव्यतिरिक्त)
२) पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या निवासी मिळकतींमध्ये (१) सौरऊर्जा वापर, (२) पावसाच्या पाण्याची साठवणूक करुन ते पुन्हा रिसायकलिंग करुन वापरात आणणे, (३) ओला व सुका कचरा वेगळा करुन गांडूळखत प्रकल्प राबविणे. या तीन पैकी एका बाबींची अंमलबजावणी करणारे निवासी मिळकतदाराच्या मिळकतीस लागू असणाऱ्या चालू  करांच्या एकूण रकमेच्या ५ % सूट (पाणीपटटी व शासनाचे कराव्यतिरिक्त)