झोपडपट्टी

जेएनएनयुआरएम/बीएसयुपी/वॅम्बे योजने अंतर्गत पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहेत/आले आहेत. पुणे मनपा हद्दीतील विविध झोपडपट्टयांमधील रस्ता रूंदी व इतर प्रकल्प बाधितांचे पुनर्वसनासाठी

 

अ.क्र.

योजनेचे नाव व ठिकाण

एकूण घरे

1

वॅम्बे योजना (वाल्मीकी आंबेडकर आवास योजना)

1) स.नं. 88 हडपसर हिंगणेमळा

2) स.नं. 89 हडपसर हिंगणेमळा.

618

95

एकूण - 713

2

बीएसयूपी

  1. हडपसर

  2. वारजे


2408  
1344

एकूण - 3752

1) दि. 22 जून 2014 व 16 मे 2015 चे शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे पुरावे आवश्यक आहेत.
2) दि.1/1/2000 पूर्वीच्या मतदार यादीत नाव असले पाहिजे. किंवा
3) दि. 1/1/2000 पूर्वी सदर झोपडीधारक राहत असलेले पुरावे.
4) लाईट बिल
5) टेलिफोन बिल
6) विक्री कर भ्ररल्याचा पुरावा
7) व्यवसाय कर भ्ररल्याचा पुरावा
8) आयकर अथवा इतर कर भरलेचे पुरावे.
9) दि. 1/1/2000 पूर्वीचे रेशनिंग कार्ड.
10) शाळा सोडल्याचा दाखला.
11) जन्म- मृत्यूचा दाखला.
12) वाहन चालवण्याचा परवाना.
13) पासपोर्ट
14) सन 2000 पूर्वीचे बँकेचे पासबुक
15) अधिवास प्रमाणपत्र
16) मतदार ओळखपत्र.
17) निवासी झोपडीधारकाकडून दि. 1/1/2003 पासूनची थकबाकी भरली पाहिजे.
18) शासनाच्या उपक्रमाच्या जमिनीवरील खेळाची मैदाने, रिक्रीऐशन ग्राउंड, उद्यान इ. तसेच नॉन बिल्डेबल जमिनीवरील दि. 1/1/2000 पूर्वीपासून राहत असलेले  झोपडीधारक पात्र राहतील.
19) शासकीय/निमशासकीय संस्थांनी दिलेला व्यवसायिक परवाना, लायसेन्स, गुमास्ता लायसेन्स, खानावळ किंवा उपहारगृह लायसेन्स, औद्योगिक परवाना.
20) दि. 1/1/2000 पूर्वीचे इतर कायदेशीर पुरावे.

 

1) दुबार ओळखपत्र मागणी अर्ज.
2) मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत.
3) चालू आर्थिक वर्षाचे सेवाशुल्क भरणा पावतीची छाया प्रत.
4) मूळ ओळखपत्र हरवल्याबाबत पोलीसांकडील F.I.R.  दाखला.
5) पती-पत्नीचे एकत्रित दोन पासपोर्ट फोटो.

झोपडीच्या ओळखपत्रासाठी (फोटोपास) फी खालीलप्रमाणे आहे.

जागेचा वापर

ओळखपत्र  फी र.रू.

निवासी

200/-

संयुक्त

600/-

बिगर निवासी

800/-

 

पुणे शहरातील घोषित/ अघोषित झोपडपट्‌टयांचे पुर्नवसनासाठी पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रासाठी झोपडपट्‌टी पुर्नवसन प्राधिकरण (एस.आर.ए) कार्यरत आहे.
कार्यालयाचा पत्ता- II मुथ्था चेंबर्स (विस्तार इमारत), सेनापती बापट मार्ग, पुणे-16
दुरध्वनी क्र.-020-25630234/36 फॅक्स-020-25630235
ई- मेल- srapune@yahoo.in  वेबसाईट- www.srapune.gov.in
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्‌टयांचे विकसनासाठी प्रस्ताव दाखल करून घेणे, झोपडीधारकांची पात्रता तपासणे, पुर्नवसन प्रकल्पाला मंजूरी देणे, पुर्नवसन प्रकल्पाचे नकाशे मंजूर करून घेणे व बांधकाम करून घेऊन लाभार्थी झोपडीधारकांना सदनिकांचे ताबे देणे, अपात्र झोपडीधारकांवर कारवाई करणे, पुर्नवसन प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात सर्व कार्यवाही  एस. आर. ए. मार्फत केली जाते.

यापूर्वी महापालिकेमार्फत राबविण्यात आलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प खालीलप्रमाणे

 

अ.क्र.

पुनर्वसन प्रकल्पाचे नाव

पुनर्वसनासाठी उपलब्ध  झालेल्या सदनिका

लाभार्थी

संख्या

1

सि.स.नं. 207 पर्वती

36

36

2

स.नं. 82/ 2ब/1/1अ पर्वती

26

20

3

स.नं. 129, फा.प्लॉट. नं. 578 दत्तवाडी

77

66

4

स.नं. 135 कोथरूड रोड

120

94

5

स.नं. 42अ/1अ/2अ/1 42 अ/1अ/2/2 एरंडवणा

91

50

6

फा.प्लॉट. 61 कवडेवस्ती

40

40

7

स.नं. 106 हिस्सा नं. 9 हडपसर

37

16

8

पर्वती स.नं. 133/1पै. फा.प्लॉट. क्र. 587/3 निलायम टॉकिज पाठीमागे.

121

8

9

सि.स.नं. 343 घोरपडी पेठ

90

90

10

एरंडवणा स.नं. 42 हिस्सा क्र. 1 अ/2 य  

101

78

11

सि.स.नं. 2160 फा.प्लॉट. क्र. 2 सदाशिव पेठ

60

36

12

कोथरूड स.नं. 135+136 शेलारवस्ती

112

112

13

पर्वती स.नं. 234 पै. फा.प्लॉट. क्र. 505 + 506 पर्वती गांव.

63

60

14

घोरपडी पेठ सि.स.नं. 232

24

21

15

पर्वती स.नं. 117 अ पै. फा.प्लॉट. क्र. 538 अ पै.

57

57

16

शिवाजीनगर फा.प्लॉट. क्र. 314 पै. सि.स.नं. 930

49

41

17

कोथरूड स.नं. 167 पै. 168 पै. गोसावी वस्ती

63

63

18

सि.स.नं. 2470 ते 2497 बोपोडी सुगंधी चाळ

53

27

19

सि.स.नं. 113+114 नानापेठ

 

191

20

स.नं. 123 कोथरूड रामबाग कॉलनी

307

210

21

सि.स.नं. 1046 ते 1054 नानापेठ

 

608

22

स.नं. 46 पैकी फेज - 1  धानोरी

169

127

1) एकूण झोपडपट्टया - 564
2) घोषित झोपडपट्टया - 353
3) अघोषित झोपडपट्टया - 211

1) केद्र सरकार, राज्य सरकार व महापालिकेच्या जागेवरील घोषित झोपडपट्टया - 60
2) केद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका व इतर मालकीच्या जागेवरील अघोषित झोपडपट्टया - 70
3) खाजगी मालकीच्या जागेवरील झोपडपट्टया – 434
4) एकूण 564 झोपडपट्टयांपैकी एस.आर. ए.कडे दाखल प्रस्ताव असलेल्या झोपडपट्टया - 201

असे करता येणार नाही. झोपडीची उंची 14 फूटापेक्षा जास्त असता कामा नये असे केल्यास महाराष्ट्र झोपडपट्टी निर्मुलन, सुधारणा कायदा 1971 मधील सुधारित कलम 3 झेड (1) च्या तरतुदीनुसार अनाधिकृत बांधकाम समजून ते हटवण्याची कारवाई करण्यात येईल.

1) झोपडीधारकांचा मूळ फोटोपास किंवा गणना पत्रकाची पोहच.
2) प्रचलित शासन निर्णयानुसार हस्तांतरणाची फी  भरणे व प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
3) विहित नमुन्यातील हमीपत्र.
                    a) दि. 1/1/2000 पूर्वीचे मतदार यादीतील नाव किंवा
                    b) दि. 1/1/2000 पूर्वीचे निवडणूक  ओळखपत्र किंवा

4) दि. 1/1/2000 पूर्वीचे सदर ठिकाणावरील शासकीय/निमशासकीय परवाने किंवा पुरावे-जन्म- मृत्यू दाखले/गुमास्ता परवाना/वीज बिल/टेलिफोन बिल/विक्रीकर, व्यवसायकर, आयकर अथवा इतर कर भरणा केल्याचे पुरावे यापैकी एक पुरावा .
5) दि. 1/1/2000 पूर्वीचे निवडणुक ओळखपत्र, दि. 1/1/2000 पूर्वीचे सदर ठिकाणावरील शासकीय व निमशासकीय परवाने किंवा पुरावे.

झोपडीचे हस्तांतरण फीचे दर खालीलप्रमाणे आहेत.

जागेचा वापर

हस्तांतरण फी रू.

निवासी

40000/-

संयुक्त

60000/-

बिगर निवासी

60000/-

 

मनपा हद्दीत अनाधिकृत झोपडी अथवा अनाधिकृत बांधकामाबाबतची तक्रार संबंधित क्षेत्राचे सक्षम प्राधिकारी (झोनिपु) (परिमंडळ वि.क्र. 1 ते 4) यांचेकडे दाखल करून त्याची एक प्रत संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडे पाठवावी.

 

1) झोपडीधारकांचा अर्ज
2) सुधारित शासन निर्णयानुसार झोपडी संरक्षित वा पात्रतेबाबतचा पुरावा.
3) चालू आर्थिक वर्षाचे सेवाशुल्क भरणा पावतीची छाया प्रत.

होय. बँकेची निवड करण्यासाठी  मनपाने नेमलेली एन जी ओ सहकार्य करेल तथापि लाभार्थ्यांनी बँकेचे निकष व मागणीप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव दाखल करणे लाभार्थ्यांवर बंधनकारक आहे.

बीएसयुपी योजनेत पहिल्या टप्प्यात वारजे येथे 1344 व हडपसर येथे 2408 अशी एकुण 3752 सदनिका बांधण्यात येत आहेत.

मागासवर्गीय लाभार्थ्यांना 10 टक्के व सर्वसाधारण लाभार्थ्यांना 12 टक्के स्वहिस्सा भरावा लागेल.

बेघरांसाठी घरे (HDH) व आर्थिकदृष्टया दुर्बल (EWS) आरक्षणांच्या जागेवर सदनिका बांधण्याबाबत विकास नियंत्रण नियमावली तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येते.

1) झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत लाभार्थी पात्रतेसाठी निकष खालीलप्रमाणे आहेत
2) मूळ झोपडीधारकाचा सन 1995 पुर्वीच्या पुराव्यानुसारचा फोटोपास किंवा गणनापत्रकाची पोहोच
           अ)दि 1/1/2000 पूर्वीचे मतदार यादीतील नाव किंवा
           ब) दि. 1/1/2000 पूर्वीचे निवडणूक  ओळखपत्र किंवा
           क) दि. 1/1/2000 पूर्वीचे सदर ठिकाणावरील शासकीय/निमशासकीय परवाने किंवा पुरावे-जन्म-मृत्यू दाखले/गुमास्ता परवाना/वीज बिल/टेलिफोन बिल/विक्रीकर, व्यवसायकर, आयकर अथवा इतर कर भरणा केल्याचे पुरावे यापैकी एक पुरावा.
4) सध्याचे पुरावे आधार ओळखपत्र /सध्याचे निवडणुक ओळखपत्र/मतदार यादीतील नाव
5) सर्व्हेक्षण यादीमध्ये नाव, कॅडस्ट्रीयल नकाशावर झोपडी व असेसमेंट रजिस्टरमध्ये झोपडीची नोंद.
6) सद्यस्थितीत सदर झोपडीमध्ये कुटूंबाचे वास्तव्य असले पाहिजे.
7) महापालिका हद्दीत अन्य कोठेही दुसरी सदनिका/गाळा असल्यास व असे कधीही आढळल्यास त्याची पात्रता रद्द होऊन पुनर्वसन योजनेचा लाभ घेता येणार नाही.

1) बीएसयुपी योजनेत पुनर्वसन करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी सक्षम प्राधिकारी (झोनिपु) तथा सह.महा. आयुक्त/उपआयुक्त परिमंडळ वि.क्र. 1 ते 4 कार्यालयात आणि संबधित क्षेत्रीय कार्यालयाकडे उपलब्ध आहे.
2) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाकडुन पुनर्वसन केलेल्या लाभार्थ्यांची यादी प्राधिकरणाच्या कार्यालयात व वेबसाईटवर उपलब्ध आहे.

1) झोपडीधारकाचा मूळ फोटोपास किंवा गणनापत्रकाची पोहोच
2) आई/वडिलाचां मृत्यू दाखला.
3) इतर वारसदार यांचे कायदेशीर संमतीपत्र.
   अ) दि. 1/1/2000 पूर्वीचे मतदार यादीतील नाव किंवा
   ब) दि. 1/1/2000 पूर्वीचे निवडणूक  ओळखपत्र किंवा
   क) दि. 1/1/2000 पूर्वीचे सदर ठिकाणावरील शासकीय/निमशासकीय परवाने किंवा पुरावे-जन्म-मृत्यू दाखले/गुमास्ता परवाना/वीज बिल/टेलिफोन बिल/विक्रीकर, व्यवसायकर, आयकर अथवा इतर कर  भरणा केल्याचे पुरावे यापैकी एक पुरावा .
4) वारसदार व्यक्तीचे पुरावे - आधार ओळखपत्र /सध्याचे निवडणुक ओळखपत्र/मतदार यादीतील नाव.
5) सदर झोपडीत सद्यस्थितीत कुटूंबाचे वास्तव्य आवश्यक.

 

झोपडी क्षेत्रफळानुसार वार्षिक सेवा आकार दर खालीलप्रमाणे आहेत.

जागा मालकी

जागेचा वापर

क्षेत्रफळ चौ. फू. पर्यंत

वार्षिक शुल्क रू.

225 चौ. फू. पेक्षा वाढीव क्षेत्रासाठी प्रति चौ.फू. दर महा र.रू.

शासकीय/निमशासकीय व  खाजगी जागा

निवासी

संयुक्त

बिगर निवासी

225

225

225

300

600

900

1.00

1.50

2.00

पुणे महानगरपालिका हद्‌दीतील झोपडपटटया संदर्भात महाराष्ट्र झोपडपट्‌टी (सुधारणा निर्मूलन आणि पुर्नविकास) अधिनियम 1971 मधील तरतूदीनुसार झोपडपट्‌टी धारकांना सुविधा पुरविणे, सेवाशुल्क बिले वाटप व वसूली करणे , झोपडी हस्तांतरण करणे, अनाधिकृत झोपडयांवरील कारवाई व झोपडपट्‌टीमधील व्यवसाय व स्वच्छता इ. साठी सक्षम प्राधिकारी  (झोनिपु) यापदावर खालील प्रमाणे नियुक्‍त्या  करण्यात आलेल्या आहेत.
1) सक्षम प्राधिकारी (झोनिपु) तथा उपआयुक्त (परिमंडळ वि.क्र.1) पुणे महानगरपालिका.
ई - मेल :- dmc1@punecorporation.org  दूरध्वनी :- 020-25501591
पत्ता :- घोलेरोड आर्ट गॅलेरी, शिवाजीनगर पुणे - 5.
कार्यक्षेत्र :- औंध, कोथरूड, वारजे कर्वेनगर, घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय

2) सक्षम प्राधिकारी (झोनिपु) तथा सह. महा. आयुक्त (परिमंडळ वि.क्र. 2)
ई - मेल :- dmc2@punecorporation.org दूरध्वनी :- 020-26161470
पत्ता :- कै.बा.स.ढोलेपाटील  रोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका.
कार्यक्षेत्र  :- येरवडा, नगररोड (वडगांव शेरी), ढोलेपाटील क्षेत्रिय कार्यालय.

3) सक्षम प्राधिकारी (झोनिपु) तथा उपआयुक्त (परिमंडळ वि.क्र. 3).
ई - मेल :- dmc3@punecorporation.org दूरध्वनी :- 020-25508121
पत्ता :- कै. शिवाजीराव  ढेरे उदयोग  भवन, टिळकरोड  पुणे 30.
कार्यक्षेत्र - टिळकरोड, सहकारनगर, कसबा-विश्रामबागवाडा,  भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय.

4) सक्षम प्राधिकारी (झोनिपु) तथा सह. महा. आयुक्त, (परिमंडळ वि. क्र. 4).
ई - मेल :- dmc4@punecorporation.org दूरध्वनी :- 020-25508091
पत्ता :- कै. शिवाजीराव  ढेरे उदयोग  भवन, टिळकरोड  पुणे 30.
कार्यक्षेत्र - हडपसर,  बिबवेवाडी,  धनकवडी, कोंढवा -वानवडी  क्षेत्रिय कार्यालये
समन्वयक श्री. नितिन रमेश उदास, प्र. उपआयुक्त (झोनिपु), पुणे महानगरपालिका
पत्ता :- रूम नं- डी 50, 2 रा मजला, मनपा भवन, शिवाजीनगर पुणे 5.
ई - मेल :- pmcslum@gmail.com   दूरध्वनी :- 020-25501261