माहितीचा अधिकार

कलम 4 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना, कार्य, कर्तव्ये, अधिकारी कर्मचारी यांची कार्यकक्षा, कामकाजाची मानके, अर्थसंकल्पीय तरतूद, खर्च विविध योजना, लाभाथी© , अनुदान इ. माहितीचा समावेश होतो.

पुणे महानगरपालिकेतील सर्व विभागांसाठी जन माहिती अधिकारी व  प्रथम अपिलीय अधिका-यांच्या नेमणुका  केल्या आहेत. सदरची यादी https://pmc.gov.in/en या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

जन माहिती अधिकाऱ्याने माहिती न दिल्यास अथवा दिलेली माहिती असमाधानकारक असल्यास व्यथित अर्जदाराने माहिती मिळविण्यासाठी अर्ज करण्याकरिता व निर्णय घेऊन माहिती उपलब्ध करून देणेसाठी  स्थानिक स्वराज्य संस्थेने पदनिर्देशित केलेला खातेप्रमुख प्रथम अपिलीय अधिकारी असतो. अपिल अर्जास रू.20/- चा कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे.

 

नाही . प्रथम अपिलीय  अधिका-यास दंड आकारण्याचे अधिकार नाहीत.

अपिल मिळाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत किंवा अर्ज दाखल केलेल्या दिनांकापासून 45 दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे.

प्रथम अपिलाची सुनावणी अपिल प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांमध्ये सुनावणी घेऊन नंतर १५ दिवसाच्या आत निर्णय देणे बंधनकारक आहे.

फी रोख रकमेच्या स्वरूपात तसेच धनाकर्ष, ध्रनादेश किंवा तेवढया रक्‍कमेची न्यायालय फी मुद्रांक यापैकी कोणत्याही प्रकारे भ्ररता येईल.

स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमणुक केलेल्या संबधित विभागाच्या माहिती अधिका-याकडे विहीत नमुन्यात रू.10/- चा कोर्ट फी स्टॅम्प लावून अर्ज करणे अपेक्षित आहे. तथापि, साध्या कागदावरही अर्ज करता येतो.

संबंधित विभागाची माहिती त्या विभागाच्या जनमाहिती अधिका-यांकडे मागणे आवश्यक आहे. तथापि दुस-या विभागाशी संबंधित असल्यास कलम (3)नुसार अर्ज वर्ग केला जातो.

अधिनियमाच्या कलम 6 अन्वये माहिती मिळविण्यासाठीचा लेखी विनंती अर्ज एकाच विषयाशी संबंधित असावा आणि त्यात सर्वसाधारणपणे दीडशेपेक्षा अधिक शब्द नसावेत. अर्जदाराला एकापेक्षा अधिक विषयांची माहिती हवी असेल तर त्याकरिता स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.

http://www.punecorporation.org/Rti_p/PIO_List_Feb_2016.pdf या लिंकवर जनमाहिती व सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्यांचा विभागवार तपशील पहावयास मिळेल.

माहिती अधिकाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर शक्‍य तितक्‍या लवकर तथापि तीस दिवसांच्या आत माहिती देण्याची मुदत असते.

प्रथम अपिलिय अधिकाऱ्याने अपिलावर दिलेल्या निर्णयाने समाधान न झाल्यास दुसरे अपील राज्य माहिती आयुक्‍त खंडपीठ, पुणे यांच्याकडे 90 दिवसांमध्ये करता येते. अपील अर्जांवर रू.20/- चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा लागतो.

राज्य माहिती आयुक्‍त खंडपीठ, पुणे यांचे कार्यालय प्रशासकीय इमारत, चौथा मजला , कौन्सिल हॉलसमोर, पुणे-411001 येथे आहे.

कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या द¥ष्टीने नागरिकांना माहिती मिळावी याकरिता केलेला अधिनियम म्हणजेच माहितीचा अधिकार कायदा होय.

माहितीचा अधिकार कायदा 2005 हा दि. 12.10.2005 पासून अंमलात आला आहे.

होय. पुणे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहे.

होय. जन माहिती अधिकारी, सहाæयक जन  माहिती अधिकारी यांनी माहिती  मागण्यासाठी आलेल्या नागरिकांस अर्ज भरण्यासंबंधी सर्व प्रकारे सहाæय , सहकार्य करणे अपेक्षित आहे.