वाहतूक

पुणे महानगरपालिका परिसरातील बस वाहतुकीसंदर्भात चौकशी अथवा तक्रार पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. या कार्यालयाकडे करावी . त्यांचा पत्ता खालीलप्रमाणे आहे :

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.स्वारगेट , पुणे – ३७ फोन नंबर – २४५०३३५५ / ९८८१४९५५८९ या क्रमांकावर एस.एम.एस.करून आपली तक्रार नोंदवू शकता . कृपया तक्रारीमध्ये बस क्रमांक आणि बसचा मार्गही नोंदवावा.

 

अधिक्षक अभियंता ( प्रकल्प ) कार्यालय , पुणे महानगरपालिका ०२०-२५५०६६२४/२३

मुख्य अभियंता ( पथ ) कार्यालय ०२० – २५५०१०८३ यांचेकडे करावी तसेच complaint.punecorporation.org  संकेतस्थळ, complaint@punecorporation.org या ई-मेल द्वारे, www.facebook.com/PMCFMC फेसबूक पेज, ९६८९९००००२ या मोबाईल वर whatsapp, sms द्वारे, ट्वीटर - @pmcpune, गुगल प्लस – pmc fmc वर तक्रार नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

(१) पोलीस ठाणे खडकमाळ (०२०-२४४७६४२२)

(२) पोलीस ठाणे शिवाजीनगर झोन १ (०२०-२५५३६२६३)

(३) पोलीस ठाणे कोथरूड (०२०-२५३९१५१५)

(४) पोलीस ठाणे लष्कर (०२०-२६३६१२५०)

(५) पोलीस ठाणे सहकारनगर (०२०-२४२२८११३)

(६) पोलीस ठाणे कोरेगाव पार्क (०२०-२६१५२२२२)

(७) पोलीस ठाणे बिबवेवाडी (०२०-२४२८२००३) तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी , पुणे यांचेकडे ०२० -२६०५८२८२ वर तक्रार करावी .    

पुणे महानगरपालिका हद्दीत रस्त्यांवर अपघात झाल्यास –

(१) पोलीस ठाणे खडकमाळ (०२०-२४४७६४२२)

(२) पोलीस ठाणे शिवाजीनगर झोन १ (०२०-२५५३६२६३)

(३) पोलीस ठाणे कोथरूड (०२०-२५३९१५१५)

(४) पोलीस ठाणे लष्कर (०२०-२६३६१२५०)

(५) पोलीस ठाणे सहकारनगर (०२०-२४२२८११३)

(६) पोलीस ठाणे कोरेगाव पार्क (०२०-२६१५२२२२)

(७) पोलीस ठाणे बिबवेवाडी (०२०-२४२८२००३)    

शहरातील रस्त्यावर स्पीडब्रेकर करणेकरिता पोलीस उप आयुक्त , वाहतूक शाखा , पुणे शहर यांची मान्यता आवश्यक असते. त्यांचे मान्यतेनंतर पुणे महानगरपालिका हद्दीतील १२ मीटर पर्यंत रुंदीच्या रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसविणेसाठी संबधित क्षेत्रीय कार्यालयाकडील महापालिका सहायक आयुक्त यांचेकडे तसेच १२ मीटर पुढील रुंदीच्या रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसविणेसाठी मुख्य अभियंता ( पथ ) यांचेकडे चौकशी करावी. त्यांची माहिती खालीलप्रमाणे –

१२ मीटर रुंदीपर्यंत रस्त्यांसाठी

१) महापालिका सहायक आयुक्त (औंध) – २५८९७९८२/८३ २) महापालिका सहायक आयुक्त (घोले रोड ) –२५५०१५०१ ३) महापालिका सहायक आयुक्त (कोथरूड ) –२५५०१६०० ४) महापालिका सहायक आयुक्त (वारजे कर्वेनगर ) –२५४३२१९२/९३

५) महापालिका सहायक आयुक्त (ढोले पाटील ) –२६१६१४७०/७२

६) महापालिका सहायक आयुक्त (नगर रोड ) –२५५०९००१

७) महापालिका सहायक आयुक्त (येरवडा ) –२५५०९१०१

८) महापालिका सहायक आयुक्त (भवानी पेठ ) –२६४३७०४०

९) महापालिका सहायक आयुक्त (सहकारनगर ) –२५५०८८११

१० ) महापालिका सहायक आयुक्त (विश्रामबागवाडा) –२४४३१४६१/६२

११) महापालिका सहायक आयुक्त (टिळक रोड ) –२५५०८००१

१२) महापालिका सहायक आयुक्त (हडपसर ) – २६८२१०९२

१३) महापालिका सहायक आयुक्त (बिबवेवाडी ) –२५५०८७०१

१४) महापालिका सहायक आयुक्त (कोंढवा- वानवडी ) –२५५०६२५०

१५) महापालिका सहायक आयुक्त (धनकवडी ) – २४३१९१४७

१२ मीटर पुढील रुंदीच्या रस्त्यांसाठी

 

मुख्य अभियंता (पथ)  कार्यालय - ०२० – २५५०१०८३

पुणे महानगरपालिका हद्दीतील १२ मीटर पर्यंत रुंदीच्या रस्त्यांवर रस्ता दुभाजक दुरुस्त करणे, नवीन बसविणे हि कामे संबधित क्षेत्रीय कार्यालयाकडील महापालिका सहायक आयुक्त यांचेकडे तसेच १२ मीटर पुढील रुंदीच्या रस्त्यांवर रस्ता दुभाजक करणे , दुरुस्त करणे हि कामे  मुख्य अभियंता ( पथ ) यांचेकडून करणेत येतात.  नवीन रस्ता दुभाजक करणे, वाहन वळविणेकरिता रस्ता दुभाजक तोडून तेथे रस्ता खुला करण्याची मागणी असल्यास त्यासाठी पोलीस उप आयुक्त , वाहतूक शाखा यांचा अभिप्राय घेतल्यानंतर मुख्य खाते /क्षेत्रीय कार्यालयाकडून पुढील कार्यवाही करणेत येते.

 

झेब्रा क्रॉसिंग ,लेन मार्किंग इत्यादी थर्मोप्लास्टिक पेंटने रंगवणे यासाठी  १२ मीटर पर्यंत रुंदीच्या रस्त्यांवर संबधित क्षेत्रीय कार्यालयाकडील महापालिका सहायक आयुक्त यांचेकडे तसेच १२ मीटर पुढील रुंदीच्या रस्त्यांसाठी मुख्य अभियंता ( पथ ) यांचेकडे मागणी करावी . तसेच वाहतूक नियमांचे फलक बसविणेसाठी संबधित क्षेत्रीय कार्यालयाकडील महापालिका सहायक आयुक्त यांचेकडे मागणी करावी.

पुणे महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर रस्ता वाहतुकीस अडथळा ठरणारी टपरी /हातगाडी उठवीणेची तक्रार अतिक्रमण विभागाकडे २५५०११९७ या दूरध्वनीवर तसेच complaint.punecorporation.org  संकेतस्थळ, complaint@punecorporation.org या -मेल द्वारे, www.facebook.com/PMCFMC फेसबूक पेज, ९६८९९००००२ या मोबाईल वर whatsapp, sms द्वारे, ट्वीटर - @pmcpune, गुगल प्लस – pmc fmc वर तक्रार नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. वाहनांसाठी सबंधित वाहतूक पोलीस निरीक्षक यांचेशी संपर्क साधावा.

पुणे महानगरपालिका हद्दीतील रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अथवा रस्त्यावर पडलेली झाडे / फांद्या तातडीने काढणेबाबतची तक्रार मुख्य उद्यान अधीक्षक यांच्या कार्यालयात करावी. त्यांचा पत्ता खालीलप्रमाणे – वृक्ष अधिकारी ,संभाजी उद्यान ,जंगली महाराज रोड पुणे . फोन नंबर – २५५३२५१४ /२५५३८५५३

पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साठून वाहतूक खोळंबल्यास तक्रार महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन कक्ष (०२०-२५५०१२६९ /२५५०६८०० ) – मनपा मुख्य इमारत येथे संपर्क साधावा.

पुणे महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर नवीन सिग्नल बसविणेसाठी पोलीस उप आयुक्त , वाहतूक शाखा यांचेकडे अर्ज सादर केल्यानंतर पोलीस विभागामार्फत जागा पाहणी करून सिग्नल बसविणेबाबत महानगरपालिकेस कळविणेत येते. त्यानंतर अंदाजपत्रकातील उपलब्ध तरतुदीनुसार अधीक्षक अभियंता ( विद्युत ) कार्यालयाकडून पुढील कार्यवाही केली जाते . त्यासाठी  अधीक्षक अभियंता (विद्युत) कार्यालय ०२०-२५५०१३७५/६५ या क्रमांकावर संपर्क करावा .

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अवैध पार्किंगबाबतची तक्रार सबंधित वाहतूक पोलीस निरीक्षक यांचेकडे करावी . वाहतूक पोलीस कार्यालये खालीलप्रमाणे-

१) वाहतूक पोलीस निरीक्षक - खडक (०२०-२६२०८२१६)

२) वाहतूक पोलीस निरीक्षक – विश्रामबाग /फरासखाना ( ०२०-२६२०८३८१)

३) वाहतूक पोलीस निरीक्षक – कोथरूड

४) वाहतूक पोलीस निरीक्षक –शिवाजीनगर /डेक्कन (०२०-२६२०८४५६)

५) वाहतूक पोलीस निरीक्षक – दत्तवाडी

६) वाहतूक पोलीस निरीक्षक – सहकारनगर /भारती विद्यापीठ

७) वाहतूक पोलीस निरीक्षक – वारजे

८) वाहतूक पोलीस निरीक्षक – वानवडी

९) वाहतूक पोलीस निरीक्षक – कोंढवा

१०) वाहतूक पोलीस निरीक्षक – बंडगार्डन /कोरेगाव पार्क  (०२०-२६२०८२५४ )

११) वाहतूक पोलीस निरीक्षक – चतु:श्रृंगी

१२) वाहतूक पोलीस निरीक्षक – विश्रांतवाडी (०२०-२६२०८२५५)

१३) वाहतूक पोलीस निरीक्षक – खडकी

१४) वाहतूक पोलीस निरीक्षक – हडपसर

१५) वाहतूक पोलीस निरीक्षक – लष्कर (०२०-२६२०८३१६)

१६) वाहतूक पोलीस निरीक्षक – समर्थ   (०२०-२६२०८२८२)

१७) वाहतूक पोलीस निरीक्षक – स्वारगेट  (०२०-२६२०८३७८)

१८) वाहतूक पोलीस निरीक्षक – येरवडा  (०२०-२६२०८३०६)

पुणे शहरातील रस्त्यावरील चारचाकी वाहन पार्किंगबाबत (  pay and park ) तक्रार अधीक्षक अभियंता ( वाहतूक नियोजन ), पुणे महानगरपालिका यांचेकडे ०२०-२५५०६६२४/२३ या क्रमांकावर करावी .

पुणे शहरातील वाहनतळातील पार्किंगबाबत पार्किंगबाबत (  pay and park ) तक्रार, मालमत्ता व व्यवस्थापन विभाग, पुणे महानगरपालिका यांचेकडे ०२०-२५५०११९५ या क्रमांकावर तक्रार करावी.