निवडणूक

 

अ.क्र.

विधानसभा मतदार संघाचे नाव व क्रमांक

कार्यालयाचा पत्ता

२०८-वडगाव शेरी

येरवडा क्षेत्रीय कार्यालय, येरवडा, पुणे-०६

२०९-शिवाजीनगर

अन्नधान्य वितरण कार्यालय,मध्यवर्ती इमारत, ए बॅरेक पुणे -०१.

२१०-कोथरूड

कर्वे रोड क्षेत्रीय कार्यालय, रेल्वे बुकिंग शेजारी, कर्वे रोड, पुणे.

२११-खडकवासला

उप विभागीय अधिकारी, हवेली उप विभाग, पुणे, क्वीन्स गार्डन, अल्पबचत भवन, पुणे.

२१२-पर्वती

जिल्हा पुरवठा कार्यालय, जुनी जिल्हा परिषद इमारत, दुसरा मजला, पुणे -०१.

२१३-हडपसर

जिल्हा पुनर्वसन कार्यालय,जुनी जिल्हा परिषद इमारत, तिसरा मजला, पुणे -०१.

२१४-पुणे कन्टोन्मेट

उप जिल्हाधिकारी, भुसंपादन अधिकारी क्र.२६, नवीन प्रशासकीय इमारत,चौथा मजला,पुणे-०१.

२१५-कसबा

उपविभागीय अधिकारी,शिरूर, पुणे, जुनी जिल्हा परिषद इमारत, तिसरा मजला, पुणे -०१

त्यासाठी विधानसभा निहाय मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे फॉर्म नंबर 6अ भरणे आवश्यक आहे. फॉर्मसोबत पासपोर्टची छायांकितप्रत जोडणेही आवश्यक आहे.

  मतदार यादी ज्या वर्षी सुधारण्यात येत असेल, त्यावर्षीचा 01 जानेवारी हा अर्हता दिनांक समजण्यात येतो.

 

होय, सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन व सेक्रेटरी यांच्या संयुक्त सहीने प्रमाणपत्रासह सोसायटीतील सर्व पात्र रहिवाशी यांचे मतदार नोंदणीचे फॉर्म सादर करता येतात.

नाही, लोकप्रतिनिधीत्व अधिनयिम 1950 मधील कलम 17 व 18 मधील तरतूदीनुसार कोणतीही व्यक्ती एका मतदारसंघातील एका मतदान केंद्रापेक्षा जास्त किंवा एका मतदारसंघा पेक्षा जास्त मतदारसंघामध्ये मतदार म्हणून नाव नोंदवू शकत नाही.

तुम्ही स्थलांतरित झालेले ठिकाण हे तुमच्या जुन्या विधानसभा मतदारसंघामध्येच  असेल तर नमुना नंबर ८अ चा फॉर्म भरुन तुम्हाला नवीन ठिकाणचे मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळेल. जर तुम्ही स्थलांतरित झालेले ठिकाण नवीन विधानसभा मतदारसंघामध्ये असेल तर त्याठिकाणी फॉर्म नंबर ६ भरणे आवश्यक आहे.

मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात तुमचे चुकीचे मतदार छायाचित्र ओळखपत्र जमा करावे म्हणजे त्यांचेकडून दुरुस्त मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळेल किंवा विशेष पुनरिक्षण मोहिमेमध्ये मतदार सहाय्यता केंद्रामध्ये मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळेल. त्याचा नमुना 8 भरावा.

हो. त्याकरिता मतदारनोंदणी अधिकारी यांच्याकडे दुबार (Duplicate) ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो. तसेच त्यासाठी र.रु.२५/-असे शुल्क आकारले जाते.

 मतदारयादीत नवीन नाव समाविष्ट करायचे असल्यास विधानसभा निहाय मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे फॉर्म नंबर 6 भरणे आवश्यक आहे.

 

१.मा.भारत निवडणूक आयोगाकडून मतदारयादीमध्ये सुधारणा करण्यासाठीच्या कालावधीच्या तारखा जाहीर करण्यात येतात. त्या कालावधीमध्ये संबंधित मतदान केंद्रावर मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्याकडे फॉर्म भरता येतो.
२.जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय, मतदारनोंदणी अधिकारी कार्यालय व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे केव्हाही फॉर्म भरतायेतो.

कोणत्याही कारणासाठी मतदाराचे नाव मतदार-यादीतून वगळायचे असल्यास विधानसभा निहाय मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे फॉर्म नंबर 7 भरणे आवश्यक आहे.

 

अशा प्रकारची दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी विधानसभा निहाय मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे फॉर्म नंबर 8 भरणे आवश्यक आहे.

हे सर्व फॉर्मस खालील ठिकाणी उपलब्ध आहेत
१) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पुणे
२) मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय
३) मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.)
४) मा.भारत निवडणूक आयोगाच्या www.eci.in व www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.

छायाचित्र-मतदारयादीमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठीच्या फॉर्म नंबर 6 सोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात. ही सर्व कागदपत्रे साक्षांकित / प्रमाणित  केलेली असणे आवश्यक आहे.

१) अर्हता दिनांकास १८ वर्षे पूर्ण असल्याचा वयाचा पुरावा
२) सर्व साधारण रहिवासाचा पुरावा
३) आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी ओळखपत्र-पुरावा
४) दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठीचे फॉर्मस खालीलठिकाणी देता येतात.
१) पुनरिक्षण मोहीम-कालावधीमध्ये मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.)
२) मतदारनोंदणी अधिकारी यांचे कार्यालय
३) मा. भारत निवडणूक आयोगाचे www.eci.in या संकेतस्थळावर ऑनलाईन व्होटर रजिस्ट्रेशन या लिंकवर किंवा http://eci-citizenservices.nic.in या संकेतस्थळावर फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

नाही, तुम्ही पुणे शहरामध्ये नोकरी/व्यवसायानिमित्त कायमस्वरुपी राहत असल्याने, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मधील कलम 19(बी) मधील तरतूदीनुसार तुम्ही  फक्त पुणे शहरामध्ये मतदार म्हणून नाव नोंदवू शकता, तुमचे मूळ गावी नाही.

मतदार प्रतिनिधी यांनी तुमचेकडून माहिती घेऊन त्याची पोहोच तुम्हाला दिली असेल, तुम्ही मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्द झालेल्या प्रारुप छायाचित्र मतदार यादीमध्ये तुमचे नाव समाविष्ट झाले किंवा नाही हे शोधू शकता.

अर्हता दिनांकास १८ वर्षे पूर्ण असलेला भारतीय नागरिक मतदार होण्यास पात्र आहे. तथापि संबंधित व्यक्तिस न्यायालयाने किंवा निवडणूक आयोगाने अपात्र ठरवलेले नसावे.

www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Search Engine या लिंकवर छायाचित्र मतदारयादीमधील नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पुणे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयांमध्ये मतदार मदत केंद्रामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच मा.जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांचे कार्यालयातील 020-26122348 या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क करावा.

१. बँक / किसान / डाक कार्यालयाचे चालू पासबुक.
२. अर्जदाराची शिधापत्रिका / पारपत्र (पासपोर्ट) / वाहनचालक परवाना / आयकर विभागाचे पॅनकार्ड.
३.अर्जदाराच्या नावाचे किंवा त्याच्या / तिच्या पालक इत्यादी नातेवाईकांच्या नावावर असलेले अलीकडचे पाणी / दूरध्वनी / वीज / गॅसजोडणी याचे त्या पत्त्यावरील बिल.                                                                                             ४.दिलेल्या पत्त्यावर अर्जदाराच्या नावाने आलेले / पाठविलेले डाक विभागाचे टपाल.

१.महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीच्या सक्षम प्राधिका-याने दिलेले जन्म-प्रमाणपत्र किंवा जन्म-मृत्यु नोंद करणा-या जिल्हा निबंधक कार्यालयाने दिलेले जन्म-प्रमाणपत्र.
२.शाळा सोडल्याचा दाखला(त्यामध्ये जन्मदिनांक नमूद केलेला असणे आवश्यक आहे.)
३.इयत्ता १० वी किंवा त्यावरील वर्गात उत्तीर्ण असेल तर जन्मतारीख नमूद केलेले १० वीचे प्रमाणपत्र 
४.अर्जदाराचे शिक्षण झाले नसेल तर त्याच्या पालकाचे विहित नमुन्यातील घोषणापत्र
५.अर्जदाराचे शिक्षण झाले नसेल व पालक जीवित नसल्यास संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचाने किंवा संबंधित महानगरपालिका / नगरपालिका यांच्या सदस्याने दिलेले वयाचे प्रमाणपत्र.