समाज विकास

नागरी विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचे अर्ज कामकाजाच्या दिवशी  वस्ती पातळीवर समुहसंघटिका यांचेकडे व क्षेत्रीय कार्यालयातील महिला सबलीकरण केंद्रामध्ये स. ११.०० ते दु. ०२.०० या वेळेत विनामूल्य उपलब्ध होतील. तसेच सदर योजनांचे अर्ज पुणे महानगरपालिकेच्या http://sdd.punecorporation.org/या संकेतस्थळावर तसेच www.punecorporation.orgया संकेतस्थळावरील samaj vikas vibhag यामध्ये उपलब्ध आहे.

 

अर्ज करण्यासाठी काही शुल्क आकारले जात नाही.

नागरी विकास विभागामार्फत दरवर्षी जाहीर प्रकटनाद्वारे निश्र्चित करण्यात आलेल्या कालावधीमध्ये विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह वस्तीपातळीवरील समुहसंघटिकांमार्फत कामकाजाच्या वेळेत स्वीकारण्यात येतात. तसेच कै. एस. एम. जोशी हॉल, दारूवाला पूल, ५८२ रास्ता पेठ, पुणे ११ या ठिकाणी स्वीकारण्यात येतात.

दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींसाठी राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत स्वयंरोजगारासाठी वैयक्तिक व गटाला बॅंकेमार्फत अर्थसहाय्य, महिला बचत गटांना फिरता निधी देणेत येतो. तसेच सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी (Social Mobilization & Institute Development) (SMID), क्षमता बांधणी व प्रशिक्षण (Capacity Building & Training), कौशल्य प्रशिक्षणाद्वारे स्वयंरोजगार व नोक-यांची उपलब्धता (Employment Through Skill Training & Placement), स्वयंरोजगार कार्यक्रम (Self Employment Programme), फेरीवाल्यांना सहाय्य (Support to Urban Street Vendors), शहरी बेघरांना निवारा (Scheme of Shelter for Urban Homeless) इ. योजना दारिद्रय षेखालील कुटुंबातील व्यक्तींसाठी \  राबविल्या जातात.

दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांची यादी अंतिम असल्याने त्यात फेर बदल करता येत नाही. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्वेक्षण केले जार्इल. त्यावेळी नाव समाविष्ट करण्याचा विचार करण्यात येर्इल.

नि:समर्थ (अपंग) व्यक्तींनी ससून सर्वोपचार रूग्णालय किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र घ्यावे.

 

नि:समर्थ (अपंग) व्यक्‍तींसाठी मोफत बस पास योजना, अपंगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य,  व्यवसाय प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य, अंध, अपंग, विकलांग व्यक्तिंना कृत्रिम अवयव घेणेसाठी योजना इ. योजना राबविणेत येतात.

शहर पातळीवर सुमारे १२००० बचत गट कार्यरत असून बचत गट स्थापनेसाठी महिलांना प्रशिक्षण,फिरता निधी, व्यवसाय प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य, इन्क्युबेशन सेंटर, बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी प्रदर्शन व विक्री करीता अर्थसहाय्य, कायमस्वरूपी विक्री व आधार केंद्र, शेजार समुह गटातील स्वयंसेवकांना प्रशिक्षण, स्वस्त धान्याची दुकाने देणेसाठी शिफारस, तसेच मनपाच्या प्राथमिक शाळेतील सुमारे ७०००० विद्यार्थ्यांना शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन व बालवाडीतील १२००० मुलांना बचत गटांच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो. पुणे महानगरपालिकेला आवश्यक १८ वस्तू महिला बचत गटांकडून खरेदी केल्या जातात. सदरची खरेदी रक्कम     रू. ३ लाखापर्यंत विना निविदा केली जाते.

नागरी विकास विभागाकडे या विषयीची माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. तसेच   १५ क्षेत्रिय कार्यालयातील महिला सबलीकरण केंद्र व वस्ती पातळीवरील समुहसंघटीका यांच्याकडे नागरी  विकास विभागाकडील योजनांची माहिती मिळेल. तसेच सदर योजनांची ती पुणे महानगरपालिकेच्या http://sdd.punecorporation.org/  या संकेतस्थळावर तसेच www.punecorporation.org या संकेतस्थळावरील NAGARI VIKAS VIBHAGयामध्ये उपलब्ध आहे.

महानगरपालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी मनपा हद्दीतील रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक नाही.

नि:समर्थ (अपंग) कल्याणकारी योजने अंतर्गत पी.एम.पी.एम.एल.चे मोफत बसप्रवास पास ४०% अपंगत्व असलेल्या नि:समर्थ (अपंग), अस्थिव्यंग, कर्णबधिर (मूकबधिर), अंध, मतिमंद व्यक्तींना दिले जातात.

 

एम.एस.सी.आय.टी., टॅली, डी.टी.पी., वेब डिझानिंग, सी सी++, संगणक बेसिक इ. प्रशिक्षण दिले जाते.

इ. १० वी व इ. १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता वाढीसाठी खाजगी क्लास फी, सीईटी क्लास फी, उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल वाटप, कमवा व शिका योजना, इ. १० वी व इ. १२ वी मध्ये ८०% अथवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य, स्पोकन इंग्लिश वर्ग, अभ्यासिका, ग्रंथालय, घाणभत्ता मिळणा-या मनपा सेवकांच्या मुलांना अर्थसहाय्य, स्पर्धा परिक्षा केंद्र, मनपाच्या माध्यमिक प्रशालेतील मुलांना शैक्षणिक साहित्य इ. उपक्रम राबविले जातात. तसेच सदर योजनांचे अर्ज पुणे महानगरपालिकेच्या http://sdd.punecorporation.org/या संकेतस्थळावर तसेच www.punecorporation.orgया संकेतस्थळावरील samaj vikas vibhag यामध्ये उपलब्ध आहे.