शिक्षण
 1. के.सी. ठाकरे विद्यानिकेतन, दारूवाला पुल, रास्तापेठ ,पुणे ०१  सन २००७ पासून
 2. आचार्य विनोबा भावे इंग्लिश मिडीयम सेकंडरी स्कूल, गंजपेठ, पुणे ४२ सन २०१३-१४
 3. बाबु जगजीवन राम इंग्लिश मिडीयम सेकंडरी स्कूल, गांधीनगर, येरवडा,  पुणे ०६  सन २०१५ पासून
 4. संत गाडगे महाराज इंग्लिश मिडीयम सेकंडरी स्कूल , कोंढवा खुर्द, पुणे  सन २०१५-१६
 5. पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर इंग्लिश मिडीयम सेकंडरी स्कूल, चव्हाणनगर, औंध, बाणेररोड सन २०१५-१६   

१. फेब्रुवारी  ते एप्रिल २०१४ अ‍ॅप्टीटयुड टेस्ट आणि समुपदेशन- १७ शाळा, १७६५ विद्यार्थी.

२. तिळगुळ समारंभ - दि. १७ जानेवारी २०१५ परिसरातील संस्था, कंपन्या, नगरसेवक, पालक इ. यांना सी.एस.आरची माहिती देण्यासाठी.

३. करिअर मित्र केंद्र - जून २०१५ पासून इ. ८वी ते १०वी साठी सुरू होणार आहे.

४. पुणे म.न.पा. ची वेबसाईट दि. १२ नोव्हेंबर २०१४ रोजी उद्घाटन 

१. २० माध्यमिक शाळांमध्ये पूर्णवेळ संगणक शिक्षक ३ वर्षांसाठी २०१४ ते २०१७ पर्यंत दिले आहेत. प्रथम इन्फोटेक कडून प्रशिक्षित शिक्षक व टेक महिंद्रा कडून त्यांचा पगार दिला जातो.

२. माध्यमिक शाळेतील २०० शिक्षकांचे संगणक प्रशिक्षण दैनंदिन कामकाजामध्ये संगणकाचा प्रभावी वापर करण्यासाठी घेतले.

३. प्रथम इन्फोटेक ने वेळोवेळी संगणक दुरूस्तीची कामे केली.

४. विद्यार्थ्यांसाठी IT Company ला भेट या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले. इ. ९वीच्या २६०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या मध्ये टेक महिंद्रा व परसिस्टंट या २ कंपन्यांना भेट देण्यात आली.

५. विद्यार्थ्यांना मोफत संगणक विषयाची पुस्तके दिली(इ. ८वी व ९वी )

६. MS-CIT परीक्षा इ. ९वी व इ. १०वी साठी नियोजित आहेत.

७. दोन्ही सत्रामध्ये संगणक विषयीचा आढावा घेण्यासाठी परीक्षा घेतल्या

 

डिसेंबर २०१४ मध्ये पालकांसाठी संगणक विषयावर प्रदर्शन शाळा पातळीवर आयोजित केले.

१. महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, हडपसर, पुणे या शाळेत १५ संगणक भेट.

२. र.रू. १५ लाखाचे अत्याधुनिक स्वच्छता गृह बांधून दिले- काम सुरू ११ फेब्रुवारी २०१५, पूर्ण मे २०१५

 

३. इ. ८वी ते १०वी च्या मुलींची वैद्यकीय तपासणी व व्याख्याने.

१. नॉर्मा स्कूल वॉश प्रकल्प.    

२. शाळांची श्रेणी वाढ करण्याकरीता ७ शाळांमध्ये भौतिक सुविधांविषयी कामे सुरू उदा. स्वच्छता गृह दुरूस्ती, नुतनीकरण, ड्रेनेज व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सोय इ.

३. शाळांची क्षमतावाढीसाठी १० शाळांची निवड केलेली आहे यामध्ये त्यांना जीवन कौशल्य, समुपदेशन, गुणवत्ता वाढीसाठी व्याख्याने इ. चे आयोजन केले आहे.

 

४. जागतिक जलदिन- चित्रकला स्पर्धा - बक्षिस समारंभ.

१. नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय, येथे र.रू. ५ लाख किमतीचे Water Purifier मोफत बसविण्यात आले.

२. उर्वरित २५ शाळांमध्ये CSR मधून र.रू. २.५ लाख रूपये देऊन हा उपक्रम प्रस्तावित आहे.

१. फेब्रुवारी ते मे २०१५ शैक्षणिक पुरक कार्यक्रम   

२. इ. १०वी परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन

 

३. इ. ८वी व ९वी- अभ्यासाचे नियोजन, व्यक्तिमत्व विकास शिबीर

१. डॉ. वसंतदादा पाटील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, येथे फेबु्रवारी २०१३ पासून प्रायोगिक तत्वावर अभ्यासक्रमासह प्रोजेक्टर देण्यात आले.

२. इतर शाळांसाठी CSR मधून प्रोजेक्टर देणे विषयी प्रस्तावित आहे.माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सुचना असल्यास pmc.gov.in या वेबसाईटवर secondary & technical education या लिंक वर संपर्क संपर्क साधावा.

३०/९/२०१४ नुसार

 

अ.क्र

माध्यम

शाळा

एकूण पटसंख्या

मराठी

२२५

६३४४१

उर्दू

३४

७४२१

कन्नड

६१८

इंग्रजी

५१

१५७९१

बालवाडी

 

१७४४५

एकूण

३१२

१०५२६२

 1. इमारत

 2. मुख्याध्यापक कार्यालय/भांडार खोली

 3. प्रत्येक शिक्षकास वर्गखोली

 4. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

 5. मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

 6. पिण्याच्या पाण्याची सुविधा

 7. खेळाचे मैदान

 8. रॅम्प

      ९. किचन शेड

 

      १० . सीमा भिंत

बालकांच्या जन्म नोंदणीचा दाखला किंवा पालकांचे साध्या कागदावर जन्म नोंदणी बाबतचे प्रमाणपत्र आणि शाळा प्रवेशाचा अर्ज.

रिक्त जागांसाठी आलेल्या अर्जांची संख्या जास्त असल्यास लॉटरी पद्धतीने नावे निश्चित केली जातात.

मान्यताप्राप्त विना अनुदानित (अल्पसंख्यांक शाळा वगळता) शाळांमधून नर्सरी इ. १ ली च्या वर्गाच्या प्रवेश क्षमतेच्या किमान २५%  जागांवर मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे.

rte25admission.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यावर विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरता येतो.

१. सर्व बालकांसाठी जन्माचा पुरावा, रहिवासाचा पुरावा, बालकांचे अलीकडच्या काळातील फोटो

२. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या बालकांसाठी वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र

३.  दिव्यांग/अपंग बालकांकरिता ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असल्याबाबतचे प्रमाणपत्र

 

४. १ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या कुटुंबातील बालकांसाठी कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला

पाठ्यपुस्तके, गणवेश, बुट, मोजे, स्वेटर, कंपास पेटी, लेखन साहित्य इ.

प्रथम शाळा सोडल्याचा दाखला मिळणेसाठी साध्या कागदावर माहिती भरून मोफत दाखला मिळविता येतो.

१. सावित्रीबाई फुले उपस्थिती भत्ता, (इ. ५ वी ते ७ वी च्या सर्व मुली)

२. अनूसुचित जाती, जमाती या संवर्गातील बालकांना उपस्थिती भत्ता. (इ. १ ली ते ७ वी च्या सर्व मुले व मुली)

 

३. शिष्यवृत्ती इ.

सध्या शाळेत शिकत असलेल्या विदयार्थ्यांबाबतच अधिकृत कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे आणि नमुन्यातील अर्ज शालेय मुख्याध्यापकांकडे सादर करून त्याचे शिफारशीने संबंधित प्रशासकीय अधिकारी यांचे मार्फत नियमाने बदल करण्यात येतो.

मनपा शाळेच्या संबंधित कार्यक्षेत्रातील शिक्षण मंडळ कार्यालयात आणि खाजगी शाळेच्या बाबत शालेय मुख्याध्यापक यांचेकडे विहित नमुन्यात अर्ज करावा.

संबंधित मुख्याध्यापक, संस्था प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी शिक्षण मंडळ, प्राथमिक शिक्षण अधिकारी,जिल्हा परिषद, पुणे इ.

वरील माहिती http://csrforschools.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

सध्या पुणे महानगरपालिकेतर्फे ४३ माध्यमिक विद्यालये चालविली जातात.

व्यवस्थापन

मराठी

उर्दू

इंग्रजी

आयटीआय

तंत्र

महाविद्यालय

एकुण

अनुदानित

१५

१९

विनाअनुदानित

संस्थांमार्फत

संस्थेमार्फत प्रस्तावित

१२

एकूण

२५

११

४३

 

 

सप्टेंबर २०१७ च्या स्थितीनुसार

एकूण विद्यार्थी संख्या- १२०७४
एकूण शिक्षक - २३४
एकूण शिक्षकेतर कर्मचारी - ९९
आयटीआय प्रशिक्षक ८
तंत्रशाळा शिक्षक - १४

विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

 

१) प्रवेश अर्ज

२) पूर्वीच्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला

३ ) मागील इयत्तेची गुणपत्रिका

महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते.

होय, शैक्षणिक वर्ष २०१४ पासून मराठी माध्यम सर्व अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववीपासून हिंदी या विषयाऐवजी मल्टी स्किल व रिटेल तसेच ऑटोमोबाईल हे व्यावसायिक शिक्षणाचे विषय शिकविले जातात.

१. क्रमिक पुस्तके  २. गणवेश  ३. मोफत बसपास ४. महानगरपालिका हद्दीत पीएमपीएमलतर्फे मोफत शैक्षणिक सहली ५. इ. दहावीसाठी २१ अपेक्षित प्रश्नसंच ६. मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन, सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन व डिस्पोजल मशीन  ७. लसीकरण (रुबेला)  ८. इ. आठवी व नववीसाठी टॅब इत्यादी सुविधा मोफत पुरविल्या जातात. 

 

पुणे महानगरपालिकेच्या सर्व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पी.एम.पी.एम.एल चा मोफत बसपास दिला जातो. पुणे शहरातील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांकडून बसपास साठी २५ % रक्कम भरून घेण्यात येते व ७५ % रक्कम पुणे महानगरपालिकेकडून पी.एम.पी.एम.एल ला देण्यात येते.

पुणे महानगरपालिका संचलित माध्यमिक विद्यालयातील जे विद्यार्थी इ. १० वी मध्ये ८५% पेक्षा अधिक व इ. १२ वी मध्ये ८०% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना कै. शारदाबाई पवार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ५१०००/- रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.

होय,  पुणे महानगरपालिका नागरवस्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. 

 

 

ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे. त्या शाळेमध्येच शाळा सोडल्याचा दाखला मिळेल.

विद्यार्थ्यांना चालू वर्षाचा दाखला हवा असेल तर शुल्क आकारले जात नाही. परंतु चालू वर्षापूर्वीच्या शैक्षणिक वर्षापासून मागच्या कालावधीचा दाखला हवा असेल तर प्रति वर्षी १ रुपया याप्रमाणे शुल्क आकरण्यात येते व दाखला फी ५ रूपये घेतले जाते.

ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे त्या शाळेमध्येच शाळा सोडल्याचा दुबार दाखला मिळेल. परंतु त्यासाठी १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र व प्रतिज्ञापत्र करून अर्जासोबत सादर करावे लागेल.त्यासाठी रूपये १०/- याप्रमाणे फी आकारली जाते.

चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहे तेथे विद्यार्थाला बोनाफाईड प्रमाणपत्र मिळेल. यासाठी त्या शाळेकडे कोणत्या कारणासाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे याबाबतचा अर्ज आणि ५ रुपये शुल्क भरावे लागते. 

विद्यार्थी जोपर्यंत विद्यालयात शिक्षण घेत आहे तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी रजिस्टर मधील नोंदणी मध्ये बदल माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्या लेखी परवानगीने केला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांने विहित नमुन्यातील अर्जासोबत पुरावे सादर केल्यानंतर मुख्याध्यापक यांच्यामार्फत सदर अर्ज शिफारशीसह माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांचेकडे सादर केला जातो.