नगररचना

संबंधित गावाच्या तलाठी कार्यालयात.

विकास योजनेतील आरक्षणाने जागा बाधित असल्यास एम.आर.टी.पी. अॅक्ट १९६६ चे कलम १२६ नुसार व विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूदीनुसार मोबदला खालीलपैकी एका पर्यायाद्वारे मिळू शकेल.

१) रोख स्वरुपात (तडजोडीने अथवा भूसंपादन कायद्यान्वये)

२) टी.डी.आर. द्वारे (एफ.एस.आय.च्या स्वरुपात)

विकास योजनेतील रस्ता/रस्तारुंदीच्या जागेचा एम.आर.टी.पी. अॅक्ट १९६६ चे कलम १२६ नुसार व विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूदीनुसार मोबदला खालीलपैकी एका पर्यायाद्वारे मिळू शकेल.

१) रोख स्वरुपात (तडजोडीने अथवा भूसंपादन कायद्यान्वये)

२) टी.डी.आर. द्वारे (एफ.एस.आय.च्या स्वरुपात)

३) वाढीव एफ.एस.आय. द्वारे (उर्वरित भूखंडावर अतिरिक्त एफ.एस.आय. अनुज्ञेय करुन)

र.रु. 100/- प्रति स.नं./गट नं. फी असून सेवा हमी कायदयानुसार दाखला कार्यालयीन ७ दिवसात मिळेल

विकास योजनेचा झोन दाखला, भाग नकाशासाठी अर्जासोबत ७/१२ उतारा/प्रॉपर्टी कार्ड जोडणे आवश्यक आहे.

महानगरपालिका मुख्य इमारत :- बांधकाम विकास विभाग, झोन क्र. ,,,

सावरकर भवन इमारत :- बांधकाम विकास विभाग, झोन क्र. 2, 3

शिवाजीराव ढेरे उद्योग भवन, टिळकरोड :- बांधकाम विकास विभाग, झोन क्र.

फी नाही व दाखला विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्र. 7.4 नुसार ७ दिवसात मिळेल.

पुणे महानगरपालिका हद्दीत पुणे महानगरपालिका व पुणे व पिंपरी चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण आहे.

होय. मंजूर विकास नियंत्रण नियमावलीतील कलम एन २.३ नुसार निव्वळ मिळकत क्षेत्राच्या जास्तीत जास्त ४० टक्के एफ.एस.आय. भूखंडधारकास त्याच मिळकतीवर वापरता येतो

पुणे महानगरपालिका नियोजन नियंत्रण क्षेत्रातील भुमापन कार्यालये

सन 1989 च्या शासन आदेशानुसार पूररेषा खालीलप्रमाणे आहेत.

1. निषेधक पूररेषा(Blue Line):- नदीचे दोन्ही तीरांवरील निषिध्द क्षेत्राची हद्‌द ठरविणा-या गावाजवळील अशा पूराच्या हिशोबाने जी पाण्याची पातळी समतल रेषांना त्या गावातील "निषेधक पूररेषा'' असे संबोधण्यात येते.(हे प्रत्यक्षात  ठरवितांना सरासरीने २५ वर्षातून एकदा या वारंवारीतेने येणारा पूरविसर्ग किंवा प्रस्थापित नदीपात्राच्या विसर्गक्षेत्राच्या दीडपट विसर्ग यातील जास्तीत विसर्ग वाहून नेण्यासाठी जे नदीचे पात्र व त्यालगतचे क्षेत्र आवश्यक असेल ते क्षेत्र "निषिध्द क्षेत्र' म्हणून ठरवावे. अशा क्षेत्राचा उपयोग फक्‍त मोकळया जमिनीच्या स्वरुपाने उदा.उद्याने, खेळाची मैदाने किंवा हलकी पिके घेणे (ज्या ठिकाणी घेण्याच्या हक्‍क पारंपारिक वापरामुळे प्रस्थापित झाला आहे अशा ठिकाणी) अशा सारख्या कारणांसाठीच केला जातो.)

2. नियंत्रक पूररेषा( Red Lines)- नदीचे दोन्ही तिरांवरील नियंत्रीत क्षेत्राची हद्‌द ठरविणा-या रेषांना  नियंत्रक पूररेषा म्हणून संबोधण्यात येते.(संकल्पित महत्तम पूर वाहून नेण्यासाठी जास्त वहनक्षेत्राची आवश्यकता लागेल. संकल्पित महत्तम पूर प्रवाह हा प्रकल्पांचे संकल्पनातील सांडव्यावरुन वाहणारा संकल्पित महत्तम पूरविसर्ग व धरणाखालील स्वतंत्र पाणलोट क्षेत्रातून तसाच अपेक्षित पूरविसर्ग यांचेमुळे येणारा एकत्रित पूरविसर्ग धरण्यात यावा. ज्या भागात धरण नसेल त्या भागात १०० वर्षातून एकदा या वारंवारिताचा पूरविसर्ग विचारात घेण्यात येतो.

होय.  तथापि सन 1989 च्या शासन आदेशानुसार नियंत्रित क्षेत्रामध्ये बांधकामाच्या तळमजल्याच्या जोत्याची पातळी ही लाल (नियंत्रक) पूररेषा नजिकचा पोहोच रस्ता याची पातळी यामधील जी पातळी वर असेल त्यापेक्षा 0.50 मी. वर असावी लागते.

नाही. नदी हद्द ते निळी पूररेषा यामधील क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असून अशा क्षेत्राचा उपयोग फक्त मोकळ्या जमिनीच्या स्वरुपाने उदा. उद्याने, खेळाची मैदाने किंवा हलकी पिके घेणे अशासारख्या कारणांसाठीच केला जावा, (ज्या ठिकाणी घेण्याच्या हक्क पारंपारिक वापरामुळे प्रस्थापित झाला आहे अशा ठिकाणी) असे महाराष्ट्र शासन, पाटबंधारे विभागाचे सन 1989 च्या परिपत्रकात नमूद आहे

जुनी हद्द प्रारुप विकास योजना भाग नकाशा .रु. 200/- नवीन हद्द प्रारुप विकास योजना .रु. 100/- प्रति .नं./सि..नं./फा.प्लॉट नं. याप्रमाणे भाग नकाशा सेवा हमी कायदयानुसार कार्यालयीन दिवसात मिळेल.

१) पुणे शहराच्या जुन्या हद्दीची विकास योजना दि. 5 जानेवारी 1987 रोजी मंजूर झाली.

२) मौजे सुतारवाडी (पाषाण) वाढीव हद्द विकास आराखडा सन 1992 मध्ये मंजूर झाली.

 

३) पुणे शहर नवीन हद्द (२३ गावे) क्षेत्राची विकास योजना दि. 17.5.2008, दि. 29.5.2009, दि. 2.3.2012, दि. 4.4.2012, दि. 30.8.2013, दि. 13.2.2014, दि. 5.8.2015 याप्रमाणे टप्प्याटप्प्याने भागश: मंजूर झाली.

पुणे महानगरपालिकेची स्थापना दि. 15.2.1950 रोजी झाली.

पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ खालीलप्रमाणे झाली आहे

१) दि. 11.9.1997 रोजीच्या अधिसूचनेन्वये एकूण ३८ गावे समाविष्ट करण्यात आली. त्यापैकी 15 पूर्ण व ५ अंशत: गावे दि. 17.11.2001 च्या अधिसूचनेन्वये वगळण्यात येऊन खालील गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाली. बाणेर, बालेवाडी, बावधन खु।।, कोथरुड, वारजे, शिवणे, हिंगणे खु।।, वडगाव बु।।, वडगाव खु।।, धायरी, आंबेगाव खु।।, आंबेगाव बु।।, धनकवडी, कात्रज, कोंढवा खु।।, कोंढवा बु।।, उंड्री, महंमदवाडी, हडपसर, वडगाव शेरी, खराडी, कळस, धानोरी.

दि. 21.12.2012 रोजीच्या अधिसूचनेन्वये मौजे येवलेवाडी गावाचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेचे एकूण क्षेत्र 250.64 चौ.कि.मी. आहे.

१) जुनी हद्द :- 146 चौ.कि.मी.

२) सन २००१ ची वाढीव हद्द :- 97.84 चौ.कि.मी.

३) सन २०१२ मध्ये समाविष्ट येवलेवाडी :- 6.8 चौ.कि.मी.

लोहगाव विमानतळ तांत्रिक क्षेत्रालगत 100 मी व बॉम्ब डम्प क्षेत्र 900 मी. HEMRL 500 यार्ड, R&D- 100 मी., एआरडीर्इ - 75 मी. इ. डिफेन्स क्षेत्राचे निकषाप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र ठरविण्यात येते.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम (एमआरटीपी अॅक्ट) 1966 चे अनुसार शहर विकासाचा व   नियोजनाचा पुढील २० वर्षांचा नियोजित आराखडा.

एमआरटीपी अॅक्ट 1966 चे कलम 38 नुसार २० वर्षे

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील विकास योजना विभागाकडे अर्ज करावा. याशिवाय https://pmc.gov.in/en या संकेतस्थळावर ऑनलार्इन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.

सदर नकाशे विकास योजना विभाग, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, पुणे ५ येथे मिळतील. तसेच महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/en या संकेतस्थळावर Development Plan शिर्षकाखाली अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

जुनी हद्द प्रारुप विकास योजना भाग नकाशा र.रु. 200/- व नवीन हद्द प्रारुप विकास योजना र.रु. 100/- प्रति स.नं./सि.स.नं./फा.प्लॉट नं. याप्रमाणे भाग नकाशा सेवा हमी कायदयानुसार कार्यालयीन ३ दिवसात मिळेल.

आपल्या मिळकतीची शासकीय मोजणी करुन घ्यावी व बांधकाम विकास विभाग झोन क्र. १ ते ७ महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये झोनिंगसाठी अर्ज करावा. म्हणजे आपल्या मिळकतीमधील विकास योजना प्रस्तावांची माहिती समजेल.

महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/en या संकेतस्थळावर Development Plan या शिर्षकाखाली विकास योजना प्रस्ताव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.