सांडपाणी

ड्रेनेज कनेक्शन/एन.ओ.सी. मिळणेसाठी मनपाकडील विहित नमुन्यातील अर्ज वेबसाईट https://pmc.gov.in/en वर ONLINE  उपलब्ध आहे.

ड्रेनेज विभागाची मान्यता (NOC) मिळणेसाठी मनपाकडील विहित नमुन्यातील अर्ज लायसन्स प्लंबर मार्फत सबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडे खालील कागदपत्रा सहित सादर करावा.

अ) प्लंबर लायसन्सची प्रत.

ब) चालू सहामाहीतील मालमत्ता पत्रक / सातबारा.

क) मालमत्ता कराची थकबाकी नसल्याचे नाहरकत पत्र.

ड) बांधकाम परवानगीचा मान्य नकाशा चार प्रती व कमेन्समेन्ट सटि॔फिकेट सत्य प्रत.

इ) नवीन ड्रेनेज कनेक्शन करण्यासाठीचा नकाशा व स्थळ दर्शक नकाशा.

 

फ) सहकारी गृहरचना संस्था असल्यास सोसायटीचे ना-हरकत पत्र.  

ड्रेनेज कनेक्शन मिळणेसाठी मनपाकडील विहित नमुन्यातील अर्ज https://pmc.gov.in/en  या वेबसाईट वर ONLINE उपलब्ध आहे. लायसन्स प्लंबर मार्फत हा अर्ज सबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडे खालील कागदपत्रा सहित (स्कॅन करून) सादर करावा.

 

ड्रेनेज कनेक्शन मिळण्यासाठी अनुक्रमांक ५ अन्वये कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित कनिष्ठ / शाखा अभियंता यांनी म.न.पा.चे लायसन्स प्लंबरमार्फत जागा पाहणी केल्यानंतर उप अभियंता यांच्याकडून परवानगी देण्यात येते.

 

ड्रेनेज कनेक्शन मिळणेसाठी मनपाकडील विहित नमुन्यातील अर्ज सबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडे सादर करावा.

 

संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या चलनाद्वारे मनपा कोषागारात जमा करावे.

 

अर्ज केल्यानंतर १५ दिवसात देण्यात येईल.

ड्रेनेज कनेक्शनसाठी खालीलप्रमाणे चार्जेस आहेत.

१.   ड्रेनेज कनेक्शन शुल्क र.रु.२२५

२. संपूर्ण निवासी वापरासाठी र.रु.१०००

३. व्यावसायिक वापरासाठी  र.रु.१००००

४. निवासी व व्यावसायिक (मिश्र) र.रु.५०००

५. इंडस्ट्रीअल / कंपनी  र.रु.२५०००

६. रस्ता खोदाई (डांबरी, कॉंक्रीट, दगडी फरशी, इंटरलोकिंग ब्लॉक, फुटपाथ) र.रु.२६०० प्रती रनिंग मीटर

७. माती मुरूम रस्ता खोदाई र.रु.७५० प्रती रनिंग मीटर

सेवा हमी कायद्या अंतर्गत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज केला असतानाही विहित केलेल्या कालावधीत सेवा न मिळाल्यास अथवा सेवा देण्याचे फेटाळले गेले असल्यास (विहित कालावधीत समाप्त झाल्याच्या दिनांकापासून किंवा सेवा देण्याचे फेटाळलेच्या आदेश प्राप्ती दिनांकापासून तीस दिवसाच्या आत) अधिसुचनेत नमूद केलेल्या अपिल प्राधिका-याकडे प्रथम अपिल दाखल करता येर्इल. प्रथम अपिल प्राधिका-याच्या आदेशा विरूध्द (आदेश प्राप्त झाल्याच्या  दिनांकापासून तीस दिवसांत) किंवा आदेश प्राप्त न झाल्यास प्रथम अपिल दाखल केलेल्याच्या दिनांकापासून 45 दिवसानंतर द्वितीय  अपिल करता येर्इल.

प्रथम व द्वितीय अपिल प्राधिका-यांचा तपशील पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/en या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

१) 450 मि.मी.व्यासापर्यंतच्या ड्रेनेजलाईन्सच्या देखभाल दुरूस्ती (चोकअपची) सबंधीत क्षेत्रिय कार्यालया मार्फत केली जाते.

२) 600 मि.मी व त्यापुढील व्यासाच्या तसेच नदीनाल्यातील मुख्य ड्रेनेजलाईनच्या देखभाल दुरूस्ती मलनिःसारण मुख्य कार्यालय मार्फत केली जाते. (जुनी कसबा पेठ क्षे.कार्यालय इमारत) दूरध्वनी क्रमांक ०२०२५५०८४५३

३) पुणे महानगरपालिकेची वेबसाईटवर (complaint.punecorporation.org) तसेच Twitter, Facebook,Whats up, google+ तक्रारी दाखल करणेसाठी सुविधा उपलब्ध आहेत.

ड्रेनेज कनेक्शन करण्यासाठी लायसन्स प्लंबरची माहिती https://pmc.gov.in/en या वेबसाईट वर ONLINE / मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभागात उपलब्ध आहे.

मुख्य अभियंता, पाणीपुरवठा मलनिस्सारण विभागाकडे हस्तलिखित अर्ज सादर करावा.

नवीन प्लंबिंग लायसेन्सच्या अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.

१. शैक्षणिक दाखले / प्रमाणपत्र

२. आधारकार्ड / पॅनकार्ड झेरोक्स

३. मागील बाजूस (Back ground) लाल कलर असलेले दोन फोटो

 

४. कामाचा अनुभवाच्या दोन प्रतीत दाखले

 

प्लंबिंग लायसेन्सचे नुतनीकरण दर १ वर्षाने करावे लागते.

प्लंबिंग लायसेन्सच्या नुतनीकरणासाठी मुख्य अभियंता, पाणीपुरवठा मलनिस्सारण विभागाकडे हस्तलिखित अर्ज सादर करावा.

प्लंबिंग लायसेन्सच्या नुतनीकरणासाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.

१. परवाना धारकाचा अर्ज  

२. मुदत संपलेल्या परवान्याची मुल प्रत  

३. मागील बाजूस (Back ground) लाल कलर असलेले दोन फोटो

४. रहिवासी पुरावा

५. चालू वर्षात केलेल्या कामांची यादी

मुख्य अभियंता, पाणीपुरवठा मलनिस्सारण विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या चलनाद्वारे मनपा कोषागारात जमा करावे.

 

प्लंबिंग लायसेन्सच्या नुतनीकरणासाठी वर्षाला र.रु.१५००  भरावे लागतात.

प्लंबिंग लायसेन्सच्या नुतनीकरणासाठी अर्ज केल्यानंतर १५  दिवसात नुतनीकरण करून मिळेल.

ड्रेनेज कनेक्शनसाठी संबंधित उप अभियंता यांनी मंजूर केलेल्या ड्रेनेज कनेक्शनच्या पूर्णत्वाचा दाखला जोडणे.