बी.आर.टी

 

BRTS बस स्टेशनजवळ पादचारी मार्ग व इतर सुरक्षात्मक उपाय योजना केल्याने बस स्टेशन प्रवाशांसाठी सुरक्षित आहे तसेच वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) चा उपयोग करून क्रॉसिंग शक्य आहे. वॉर्डनच्या माध्यमातून प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

BRTS बस सेवेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत –

  1. वेगाने व आरामदायी प्रवास.

  2. बस सेवेच्या वेळा व मार्ग यांची माहिती बस प्रवाश्यांना उद्घोषणा करून व Digital Boardद्वारे प्रदर्शित करण्यात येईल.

  3. BRTSबस मध्ये Local Railway प्रमाणे आत जाने व बाहेर पडणे म्हणजे Level Boarding, Alighting करण्याची सुविधा असल्याने चढउतार करण्यासाठी पायर्‍यांची गरज नाही.

  4. बसमध्ये तिकीट काढावे लागत नाही, बस थांब्यावरच तिकीट दिले जाते.

  5. Intelligent Transport System (ITS), Off. Board ticket, Automatic door system (स्व्यंचलीत दरवाजे) इ. आधुनिक बाबींचा समावेश असणार आहे.

BRTSसेवेची प्रस्तावित लांबी एकूण १६ कि.मी असून ती खालील रस्त्यांवर नियोजित आहे.

 

  1. संगमवाडी – विश्रांतवाडी रस्ता (७ कि.मी)

  2. येरवडा – वाघोली रस्ता (९ कि.मी)

यामागे सार्वजनिक बस सेवेस प्राधान्य देण्याचीभूमिका आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूसवाहतुकीसअसणारे सर्व व्यत्यय कमी करणे व बस प्रवासाचा एकूण वेळ कमी करण्यासाठी BRTS मार्गिका रस्त्याच्या मध्यभागी घेतली आहे. संपूर्ण जगभर BRTS साठी मार्गिका (lane) रस्त्याचा मध्यभागी आहे

BRTS च्या बस प्रवासाचे तिकीट दर सध्या PMPML च्या इतर प्रवासाच्या तिकीट दरा इतकेच राहणार आहेत

सध्या BRTS करिता A/C बसेस नाहीत. परंतु, प्रवाश्यांची मागणी विचारात घेऊन भविष्यात A/C घेण्यात येतील.

अंध अपंग व्यक्तींना BRTS बस प्रवास सुकर होण्यासाठीच्या सर्व सुविधा केलेल्या असल्यामुळे त्यांना BRTS बस ने अधिक सुलभतेने प्रवास करता येईल.

नाही. दोन्ही शहरांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती त्या त्या महानगरपालिकेकडून केली जात आहे. तथापि BRTS बससेवेचे संचलन PMPML मार्फत एकत्रितरित्या केले जाणार आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची BRTS एकच आहे.

 

अहमदाबाद, राजकोट, इंदोर इ. शहरात BRTS बस सेवा यशस्वी झाली आहे.

 

BRTS बस मार्गामुळे बदल होणार आहेत. तथापि, प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

इंद्रधनुष्य पीएमपी वेगवान बस सेवा नाव आहे

मुख्य कार्यकारी अधिकारी पीएमपी बीआरटीएस मस्तक आहे Dy.CEO बीआरटीएस ऑपरेशन्स नंतर शोधत आहे.

BRTS म्हणजे BusRapidTransitSystem (जलद बस वाहतूक व्यवस्था).सदरची BRTS योजना JnNURM अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. 

पुणे व पिंपरी चिंचवड विभागामध्ये काही ठिकाणी देण्यात आलेली आहे.

BRTS बस चे वेळापत्रक व मार्गावरील बस थांबे इ. माहिती PMPML च्या www.pmpml.org या website

     वर उपलब्ध आहे. तसेच, BRTS बस थांब्यांवर LCD डिसप्ले मध्ये येणार्‍या बस ची माहिती मिळेल.