अतिक्रमण

पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक रस्ता/पदपथांवरील अनधिकृत व्यवसायिकांची तसेच रस्त्यालगतच्या मिळकतधारकांनी त्यांचे इमारतीच्या सार्इड मार्जिनमधील अतिक्रमणे किंवा त्यांनी रस्ता/पदपथांवर केलेले अतिक्रमणे ही अनधिकृत व्यवसायिकांची अतिक्रमणे समजली जातात.

पुणे महानगरपालिकेकडून ज्यांना रस्ता/पदपथालगत व्यवसायासाठी अधिकृत लेखी परवानगी किंवा तसे परवाना पत्र दिले असेल व ते सर्व महानगरपालिकेच्या अटी, शर्तींचे पालन करत असतील अशा व्यवसायिकांना अधिकृत परवानाधारक समजले जाते.

होय. परवानाधारकास प्रथम समज देऊन व समज देऊनही त्यांनी परवान्यातील अटी/शर्तींचे पालन न केल्यास त्यांचे परवाने निलंबित करून तद्‍नंतर त्यांचे व्यवसाय साधने/माल/साहित्य  कारवार्इत जप्त करणे, परवाना रद्द करणे इ.बाबींनुसार कायदेशीर मार्गाने मान्य धोरणाअंतर्गत कार्यवाही केली जाते.

पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक रस्ता/पदपथांवर अनधिकृतपणे अतिक्रमणे करणाऱ्यांबाबत संबंधित भागातील महानगरपालिकेच्या महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे ( क्षेत्रिय कार्यालयाकडे) लेखी/दूरध्वनी/र्इ-मेलवर सविस्तर माहिती व पत्त्यासह तक्रार करावी.

तक्रार अर्जातील नमूद अतिक्रमणाबाबतची समक्ष पाहणी करून त्यानुसार अतिक्रमणाच्या प्रकारानुसार त्यांचेवर कारवार्इ करून साहित्य जप्त करणे किंवा प्रथम समज देऊन कायदेशीर कारवार्इ करणे हे ठरविले जाते. अर्ज दिनांकापासून अतिक्रमणाच्या प्रकारानुसार अंदाजे ७ ते १५ दिवसाचे आत तक्रार अर्जावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

नाही. महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडून देखील अशा सार्वजनिक रस्ता/पदपथांवर आढळणाऱ्या अनधिकृत सर्व अतिक्रमणांवर अतिक्रमण निर्मुलन पथकांद्वारे नियमित कारवाया केल्या जातात.

वारंवार अतिक्रमणे करणाऱ्यांवर संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडून अतिक्रमण निर्मुलन पथकांद्वारे त्यांचे माल/साहित्य जप्त करून ते लवकर न सोडणे, संबंधितांवर प्रचलित मान्य धोरणाअंतर्गत इतर विभागांमार्फत उदा. महानगरपालिकेचे आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांचेमार्फत योग्य ती कारवार्इ करणेत येते.

अतिक्रमणे काढलेनंतर तेथे पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत याबाबत संबंधित क्षेत्रिय कार्यालय व त्यांचेकडील याकामी नियुक्तीस असणाऱ्या अधिकारी व सेवकांची  तसेच स्थानिक पोलीस विभाग यांची संयुक्त जबाबदारी असते.

अतिक्रमण निर्मुलन कारवार्इत अनधिकृत व्यवसायिकांचे जप्त माल/साहित्य संबंधित व्यवसायिकांनी रितसर मागणी अर्जाद्वारे मागणी केल्यास संबंधित क्षेत्रिय कार्यालयाचे शिफारसीनुसार त्यांचे माल/साहित्य सोडले जाते. मान्य धोरणानुसार महानगरपालिकेच्या ठरविलेल्या दरानुसार रिमूव्हल चार्जेस आकारून माल/साहित्य सोडले जाते.

महानगरपालिकेकडून मान्य धोरणातील ठरविणेत आलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या नागरिकांना व्यवसायास परवानगी मिळू शकते.

नाही. फेरीवाला धोरण-२०१४ चे मधील तरतुदीनुसार पूर्वीच्या अधिकृत स्टॉल परवाना नसलेल्या व नव्याने नोंदणीकृत झालेल्या व्यवसायिकांना पदपथावर क्त पथारी किंवा हातगाडी लावून व्यवसाय करावा लागेल. स्टॉल परस्पर ठेवून व्यवसाय करता येणार नाही.

नव्याने नोंदणीकृत झालेल्या व्यवसायिकांना त्यांचे व्यवसाय ठिकाणी नविन वीज जोडणी, पाणी नळजोड किंवा ड्रेनेज कनेक्शन इ. अधिकृत/अनधिकृतपणे घेता येणार नाहीत. व्यवसायिकांना महानगरपालिकेकडून पक्क्या स्वरूपात अधिकृतपणे गाळे किंवा ओटे मिळाल्यानंतरच वरील बाबी खात्याच्या परवानगीने घेता येर्इल.

नाही, परंतु अतिक्रमण विभागाने “खाद्यपदार्थ विक्री क्षेत्र’’ निश्चित करून त्यामधील पात्र व्यवसायिकांना काही अटी/शर्तीवर ठराविक ठिकाणांवर परवानगी मिळाल्यानंतर असे व्यवसाय करता येतील.

संबंधितास प्रथम समजपत्र देऊन/किंवा नविन धोरणाअंतर्गत नोटीस देऊन अशा व्यवसायिकांवर त्यांचे साहित्य जप्त करणे, परवाना निलंबित करणे इत्यादी कारवाया संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडून केल्या जातात.

संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय (क्षेत्रिय कार्यालय)

नाही. घेतल्यास महानगरपालिकेकडून “मंडप धोरण-२०१५’’ चे मध्ये मान्य झालेल्या दरानुसार दंडात्मक कारवार्इ केली जाते.

होय. संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडून प्रचलित धोरणातील नमूद बाबींनुसार संबंधितांवर कारवार्इ केली जाते.

होय, इमारत मालमसाला/राडारोडा रस्त्यावर अनधिकृतपणे टाकणाऱ्यांवर क्षेत्रिय कार्यालयामार्फत नोटीस बजावून दंडात्मक किंवा माल/साहित्य जप्तींची कारवार्इ केली जाते.

नाही. प्रचलित कार्यपद्धतीनुसार संबंधित वाहनांवर नोटीस बजावून मुदतीनंतर सदरचे --- वाहन जप्तीची महानगरपालिकेकडून कारवार्इ केली जाते.

महानगरपालिकेकडून ठरवून दिलेल्या ठिकांणाव्यतिरिक्त इतरत्र प्रकारांची देवाण-घेवाण करण्याचा व्यवसाय करता येणार नाही. केल्यास त्यांचेवर दंडात्मक किंवा वाहन जप्तीची कारवार्इ केली जाते.

होय, महानगरपालिका हद्दीत रस्ता/पदपथावर अनधिकृत धार्मिक स्थळे उभारल्यास/उभारलेले असल्यास त्यावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. त्यासाठी नागरिकांनी संबंधित क्षेत्रिय कार्यालयात तक्रार नोंदवावी अथवा महानगरपालिकेच्या   https://pmc.gov.in/en encroachment-department या संकेतस्थळावर किंवा PMC CARE वरही तक्रार नोंदवू शकतात. 

 

महानगरपालिका हद्दीतील ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार करावी. www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर स्थानिक पोलीस स्टेशन चे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत.

महानगरपालिकेच्या   https://pmc.gov.in/en encroachment-department या संकेतस्थळावर किंवा PMC CARE वर ही नागरिक तक्रार नोंदवू शकतात.