अग्निशमन दल

जेथे जीवित व वित्तहानी होऊ शकते व आपत्तीजनक परीस्थिती निर्माण होऊ शकते अशा ठिकाणी अग्निशामक दलाची मदत घेता येते . उदा. आग दुर्घटना घडल्यास, घरगुती गॅस सिलिंडरमधून (L.P.G.)   गॅसगळती झाल्यास, वायु गळती झाल्यास, व्यक्ती पाण्यात बुडाल्यास, पाण्यात अडकल्यास, वादळ- वा-याने झाड पडल्यास किंवा त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास, झाड धोकादायक असल्यास, पूर परिस्थिती निर्माण झाल्यास.

  • अग्निशामक सेवा.
  • आपत्ती- बचाव व सुटका सेवा.
  • आपत्ती -नियंत्रण व व्यवस्थापन सेवा.
  • कार्यक्रमांकरिता अग्निशामक वाहन स्टॅन्डबाय डयुटी. (शुल्क सेवा)  
  • अग्निशामक बचाव व सुटका प्रशिक्षणे.
  • (नि:शुल्क सेवा) उंच इमारत बांधकाम परवानगीसाठी ना हरकत प्रमाणपत्र. (शुल्क सेवा)

 

अग्निशमन दलाचे वतीने आग लागू नये या करीता काय काळजी घेतली पाहीजे, आग लागल्यानंतर ती प्राथमिक स्वरूपात कशी विझवावी, याकरीता उपलब्ध असणाऱ्या साधनांचा कसा वापर केला पाहिजे, दुर्घटनेच्या ठिकाणाहून बाहेर पडताना काय काळजी घेतली पाहीजे, अशा प्रकारचे प्रशिक्षण नागरीकांना देण्यात येते

सध्या याकामी कोणतीही फी आकारणी केली जात नाही.

1. आगीची तांत्रिक व्याख्या.

2. आग लागण्याची तांत्रिक कारणे व आगीचे वर्ग / प्रकार .

3. आग विझवण्याच्या तांत्रिक पद्धती.

4. आग विझवण्याची माध्यमे व साधने .

5. अग्निशमनासाठीची विविध उपकरणे, त्यांची रचना व वापर.

6. आग लागल्यास घ्यावयाची काळजी व दक्षता.

7. आगीपासून स्वत:चा व इतरांचा बचाव करण्याच्या पद्धती व उपाययोजना.

1. आग लागलेल्या ठिकाणाची नेमकी माहिती द्यावी आणि पत्ता व्यवस्थित सांगावा. जवळची खूण सांगावी.   

2. आगीच्या स्वरूपाविषयी माहिती दयावी. आपले नाव व फोन क्रमांक सांगावा.

3. शक्य असल्यास घटनास्थळी थांबावे. अग्निशमन वाहनास घटनास्थळ दाखवावे.

1. आपत्तीची व्याख्या व त्याबाबतची माहिती.

2. आपत्तीचे प्रकार.

3. आपत्ती घडण्याची सर्वसाधारण कारणे व त्यावरील उपाययोजना.

4. आपत्तीमध्ये स्वसंरक्षणाच्या पद्धती.

5. आपत्तीमध्ये वापरावयाची सुधारित व अद्ययावत साधने, उपकरणे व त्यांचा वापर.

6. आपत्ती टाळण्यासाठी सर्वसाधारण दक्षता.

आग लागल्याची खबर योग्य पद्धतीने फायर कंट्रोल रूमला द्या व आगीचे निश्चित ठिकाण त्यांना सांगा. जिथे आग लागलेली आहे अशा ठिकाणी अग्निशमन दलाच्या वाहनास व्यवस्थित, जलद व अचूक पोहोचता यावे याकरिता मुख्य रस्त्याच्या ठिकाणी येवून थांबा.  आगीचा बंब सायरन वाजवीत दुर्घटनेच्या ठिकाणी जात असताना त्यास रस्ता मोकळा करून द्या.

आपण आपत्कालीन दूरध्वनी क्र ह्न १०१ (टोल फ्री) वर संपर्क साधू शकता. महापालिकेंतर्गत असणार्याक अग्निशामक केंद्रांची माहिती व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे.

अ.क्र. अग्निशमन केंद्राचे नाव व पत्ता  टेलिफोन क्र.

१ मध्यवती अग्निशमन केंद्र,     १०१

           महात्मा फुले पेठ,टिंबर मार्केटजवळ, पुणे ४२ ०२० - २६४५१७०७

२ हडपसर अग्निशमन केंद्र,

हडपसर औद्योगिक वसाहत, हडपसर, पुणे ०२० - २६८७०२०७

३ दि. दयाराज राजगुरू अग्निशमन केंद्र,

हॉटेल लि मेरिडीयनशेजारी, पुणे स्टेशन, पुणे ०२० - ०६०५९२३०

४ येरवडा अग्निशमन केंद्र,

मनपा हॉटमिक्स प्लँटजवळ, येरवडा, पुणे ०२० - २६६९६४००

५ औंध अग्निशमन केंद्र,

ब्रेमेन चौक, बॉडी गेट, औंध, पुणे ०२० - २५८५१७८८

६ कसबा अग्निशमन केंद्र,

कसबा पेठ, सुर्या हॉस्पीटलजवळ, पुणे ०२० - २४५७८९५०

७ एरंडवणा अग्निशमन केंद्र,

पाडळे पॅलेसजवळ, हॉटेल निसर्गसमोर, नळस्टॉप चौक, एरंडवणा, पुणे ०२० - २५४६८३७३

८ प.पु.केशव बळीराम हेडगेवार (कोथरूड) अग्निशमन केंद्र,

पीएमटी स्टँडलगत, कोथरूड, पुणे. ०२० - २५३९०००२

९ सिंहगड रोड अग्निशमन केंद्र,

सनसिटी रोड, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे ०२० - २४३४५१५२

१० पाषाण अग्निशमन केंद्र,

संजय गांधी वसाहतीजवळ, एमआयडी कॉलनी, पाषाण, पुणे. ०२० - २०२५०९८५

११ कोंढवा अग्निशमन केंद्र,

एनआयबीएम रोडजवळ, कोंढवा खुर्द, पुणे.

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत अग्निशामक दलाकडून देण्यात येणाऱ्या विविध ना हरकत दाखल्यांची माहिती-:

अक्र

ना हरकत दाखल्याचा प्रकार

विहित नमुना / आवश्यक कागदपत्रे

फी संबंधी माहिती  

सेवा देणाऱ्या पदनिर्देशित अधिकाऱ्याचे पदनाम

प्रथम अपिलीय  अधिकारी पदनाम

द्वितीय अपिलीय अधिकारी पदनाम

प्रार्थमिक ना हरकत दाखला

१. संबंधित आर्किटेक्ट यांचे पत्र व चेकलिस्ट

२. इमारतीचे प्रस्तावित / मंजूर नकाशे

३. इमारतीचे नकाशे मंजूर असल्यास कमेंसमेंट सर्टिफिकेट

४. एस.आर.ए. स्कीम असल्यास एस.आर.ए. कमेंसमेंट सर्टिफिकेट.

फायर प्रीमियम, फायर इन्फ्रास्ट्रक्चर, फायर सेस, फायर सर्विस फी, वार्षिक फी  इ. ची प्रस्तावाप्रमाणे आवश्यकतेनुसार आकारणी करण्यात येते.  

स्तर१– सहायकविभागीय अधिकारीस्तर २ – मुख्य अग्निशमन अधिकारी

उपआयुक्त (समाजकल्याण)

अतिरिक्त महापालिका  आयुक्त ()

अंतिम ना हरकत दाखला

१. संबंधित आर्किटेक्ट यांचे पत्र व चेकलिस्ट

२. इमारतीचे मंजूर नकाशे

३. कमेंसमेंट सर्टिफिकेट

४. एस.आर.ए. स्कीम असल्यास एस.आर.ए. कमेंसमेंट सर्टिफिकेट

५. पूर्वीच्या ना हरकत दाखल्याची प्रत

६. पूर्वीच्या चलनांच्या छायाप्रती

७. आग प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या लायसन्स प्राप्त अभिकरणाचे प्रमाणपत्राची छायाप्रत व ‘अ’ प्रमाणपत्र.  

८. आग प्रतिबंधक उपाययोजना करिता वापरलेल्या साहित्याची तपासणी प्रमाणपत्रे.

९. विकसक /  सोसायटी यांचे अग्निशमन यंत्राना सुस्थितीत ठेवण्याबाबतचे हमीपत्र

फायर प्रीमियम, फायर इन्फ्रास्ट्रक्चर, फायर सेस, फायर सर्विस फी, वार्षिक फी  इ. ची प्रस्तावाप्रमाणे आवश्यकतेनुसार आकारणी करण्यात येते.  

स्तर १ – सहायक

विभागीय अधिकारी


स्तर २ – मुख्य अग्निशमन अधिकारीउपआयुक्त (समाजकल्याण)

अतिरिक्त महापालिका  आयुक्त ()

 

इमर्जन्सी नंबर ची माहिती : आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी आपल्या नजीक असणाऱ्या अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांना खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

 

अ. क्र.

अधिकाऱ्याचे नाव

पदनाम

अग्निशमन केंद्राचे ( परिसराचे ) नाव

भ्रमणध्वनी क्र.

श्री. प्रशांत दा. रणपिसे

मुख्य अग्निशमन अधिकारी

मध्यवर्ती अग्निशमन केंद्र

९६८९९३१९९१

श्री. सुनील तानाजी गिलबिले

विभागीय अग्निशमन अधिकारी

मध्यवर्ती अग्निशमन केंद्र ( नियंत्रण कक्ष )

९६८९९३००६८

श्री. दत्तात्रय ना. नागलकर

सहायक विभागीय अधिकारी

मध्यवर्ती अग्निशमन केंद्र ( नियंत्रण कक्ष )

९६८९९३००२८

श्री. रमेश बाबुराव गांगड

सहायक विभागीय अधिकारी

मध्यवर्ती अग्निशमन केंद्र ( नियंत्रण कक्ष )

९६८९९३००७०

श्री. विजय तुकाराम भिलारे

स्टेशन ड्युटी ऑफिसर

दि. दयाराम राजगुरू अग्निशमन केंद्र

९६८९९ ३००७४

श्री. साईबाबा बाळकृष्ण जिल्हेवार

स्टेशन ड्युटी ऑफिसर

औंध अग्निशमन केंद्र

९६८९९ ३००७५  

श्री. शिवाजी परशुराम चव्हाण

स्टेशन ड्युटी ऑफिसर

हडपसर अग्निशमन केंद्र

९६८९९ ३००७६  

श्री. गजानन श्रीपाद पाथरुडकर

स्टेशन ड्युटी ऑफिसर

प.पु.के.ब.हेडगेवार (कोथरूड) अग्निशमन केंद्र

९६८९९ ३००७४

श्री. राजेश दत्तात्रय जगताप

स्टेशन ड्युटी ऑफिसर

एरंडवणे अग्निशमन केंद्र

९६८९९ ३००७८

१०

श्री. प्रभाकर सुरेश उम्राटकर

स्टेशन ड्युटी ऑफिसर

सिंहगड रोड अग्निशमन केंद्र

९६८९९३०८२

११

श्री. समीर बशीर शेख

स्टेशन ड्युटी ऑफिसर

मध्यवर्ती अग्निशमन केंद्र ( नियंत्रण कक्ष )

९६८९९३०११९

१२

श्री. शिवाजी बाजीराव मेमाणे

स्टेशन ड्युटी ऑफिसर

पाषाण अग्निशमन केंद्र

९६८९९३०१०८

१३

श्री. संजय भीमराव रामटेके

स्टेशन ड्युटी ऑफिसर

कात्रज अग्निशमन केंद्र

९६८९९३०११६

१४

श्री. प्रकाश जगन्नाथ गोरे

स्टेशन ड्युटी ऑफिसर

मध्यवर्ती अग्निशमन केंद्र ( नियंत्रण कक्ष )

९६८९९३१३९२

१५

श्री. प्रमोद राजाराम सोनवणे

स्टेशन ड्युटी ऑफिसर

येरवडा अग्निशमन केंद्र

९६८९९३०१२१

१६

श्री. सुभाष आण्णा भिलारे  

सब ऑफिसर

मध्यवर्ती अग्निशमन केंद्र  

९७३०३०५८४८  

अग्निशमन दलाचे मुख्यालय असणाऱ्या मध्यवर्ती अग्निशमन केंद्रामधील प्रशासकीय कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा.

 

अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी त्याच्या प्रकारावर आणि संबंधीत व्यक्तींकडून कागदपत्रे व त्याबाबतच्या फी चा भरणा करणे या गोष्टींवर अवलंबून आहे. तथापि किमान ७ दिवसांचा व कमाल १५ दिवसांचा कालावधी याकरिता लागू शकतो.

इमारत बांधकामासाठी प्राथमिक / सुधारितप्राथमिक ना हरकत प्रमाणपत्र, इमारत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अग्निशमन व्यवस्था केल्याबाबतचे अंशत: अंतिम / अंतिम ना हरकत प्रमाणपत्र, हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट, खानावळ, केटरींग, बेकरी, सायबर कॅफे, इ. व्यवसायासाठी अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्र (नवीन व नूतनीकरण), रॉकेल साठा व विक्री,  पेट्रोल /डिझेल / सीएनजी वितरण स्टेशन, पेंट, थिनर, टर्पेंटार्इन, एल. पी. जी गॅस बँक इ. करीता प्राथमिक /अंतिम ना हरकत प्रमाणपत्र (नवीन व नूतनीकरण), कारखाना व कंपनी करीता प्राथमिक /अंतिम ना हरकत प्रमाणपत्र (नवीन व नूतनीकरण), सिनेमागृह/मल्टीप्लेक्स अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्र (नवीन व नूतनीकरण), विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजनासाठी ना हरकत प्रमाणपत्र आणि आग-वर्दीबाबतचा अहवाल.

अग्निशामक ना हरकत दाखला सेवाशुल्क हे वेगवेगळया ना हरकत दाखल्यांकरिता वेगवेगळे आहे.

Intern in the municipal service tax is not levied any kind of fire or other emergency fire accident happened. However, municipal service tax is levied haddibahera the fire. Municipal Limits and haddibahera are charged as follows: Token firefighters.

service name

haddimadhila charges

haddibaherila charges

extinguish the fire

Free

1. General fire - Rs.100 / - (up to 10 km)  

To Rs.200 / - (20 km)

Rs 300 / - (at 20 km) more (fuel effect and other charges after the woman)

2. The fire factories / warehouses -

 From Rs .1,000 / - (10 km)  

  Rs .2,000 / - (up to 20 km) more (fuel effect and other charges after the woman)

Deployed for fire fighting vehicle (hand method to fire dalakadila)

VIPs

4000 / -

8000 / -

Show, seminars and similar die

8000 / -

10,000 / -