आरोग्य

पुणे महानगरपालिकेच्या सर्व प्रसुतिगृह येथे २४ तास, बाहय रुग्ण विभाग येथे सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.००, विश्रामबागवाडा मयत पास केंद्र येथे २४ तास व ससून सर्वोपचार रुग्णालय येथील मयत पास केंद्रावर २४ उपलब्ध होतात.

अंत्यविधीचा स्मशान परवानासाठीची (मयत पास)  आवश्यक कागदपत्रे –

1. रुग्णालयात मृत्यु झाल्यानंतर फॉर्म ४ डॉक्‍टर सर्टिफिकेटचा खालचा भाग व घरी मृत्यु असल्यास डॉक्‍टर सर्टिफिकेट फॉर्म ४ अ चा खालचा भागावर अंत्यविधीचा पास देण्यात येतो.
2. मयत व्यक्‍तीच्या नातेवाईकांचे ओळखपत्राची (फोटो आयडी) प्रत जोडणे आवश्यक  
3. सदरची सेवा खालील ठिकाणी उपलब्ध आहे.– 

अ.क्र

सोमवार ते शुक्रवार स. ९.००ते सायं.५.००

शनिवार स.९.००ते दु.१.००(सुट्टीचे दिवस वगळून)

अ क्र

२४ तास

कै. बाळाजी रखमाजी गायकवाड दवाखाना,लिंगायत स्मशान भुमी समोर, टिंबर मार्केट, गंज पेठ

२१

कै. मालती काची प्रसुतिगृह, गाडीखाना

गाडीखाना बस स्टॉप जवळ मंडई पुणे

कै. विजयाबाई शिर्के आरोग्य केंद्र, हिंगणे स्त्री शिक्षण संस्थे जवळ, कर्वेनगर  पुणे ४

२२

कै. मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतिगृह

निलायम टॉकिज जवळ सानेगुरुजीनगर आंबील ओढा

लायन्स क्लब दवाखाना, मित्रमंडळ सभागृहा समोर, मित्रमंडळ चौक, शिवदर्शन पर्वती पुणे

२३

औंध कुटी प्रसुतिगृह, परिहार चौक मनपा गार्डन जवळ औंध गाव

सिध्दार्थ दवाखाना विश्रांतवाडी, विश्रांतवाडी पोलीस चौकीसमोर आळंदी रोड

२४

कै. संजय गांधी प्रसूतिगृह, एलफिस्टन रोड किर्लोस्कर ऑईल कंपनी समोर बोपोडी गाव

कै. शिवशंकर पोटे दवाखाना, पद्‌मावती पंपींग स्टेशन शेजारी सातारा रोड सहकारनगर

२५

डॉ. दळवी पुणे मनपा प्रसूतिगृह, शिवाजीनगर एस.टी. स्टँड जवळ शिवाजी नगर

कै. दामोदर रावजी गलांडे पाटील दवाखाना

कल्याणी नगर, डॉन बॉस्को शाळेजवळ शास्त्रीनगर येरवडा

२६

कै. अण्णासाहेब मगर प्रसूतिगृह, मगर पट्टा हडपसर पुणे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दवाखाना

स.नं.९८ डायसप्लॉट

२७

डॉ. होमी जे. भाभा प्रसूतिगृह

दिप बंगला चौक वडारवाडी हेल्थ कॅम्प पुणे

कै. दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना, महंमदवाडी महंमद वाडी पुणे

२८

कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतिगृह

गुजराथ कॉलनीजवळ कोथरुड गाव

पुणे मनपा दवाखाना, वडगाव धायरी, वडगाव बस स्टॉप जवळ कर कार्यालयाच्या वर पुणे

२९

कै. सखाराम कुंडलीक कोद्रे प्रसूतिगृह

मुंढवा पोलीस चौकी समोर मुंढवा गाव पुणे

१०

पुणे मनपा दवाखाना, धनकवडी, प्रभाग क्र.७४ धनकवडी दवाखाना

३०

कै. सहदेव एकनाथ निम्हण प्रसूतिगृह,२१ पाषाण सर्कल भाजीमंडई जुना जकात नाक्याजवळ पाषाणगाव

११

पुणे मनपा दवाखाना, खराडी, गुलमोहर सोसायटी खराडी

३१

कै. चंदुमामा सोनवणे प्रसूतिगृह, सोनमार्ग सिनेमाजवळ टिंबर मार्केट समोर भवानी पेठ

१२

कै. पृथक बराटे दवाखाना, वारजे माळवाडी

गणपती माथा रामनगर वारजे माळवाडी

३२

कै. नामदेवराव शिवरकर प्रसूतिगृह, फातिमा नगर रोड शिवरकर रोड वानवडी गाव पुणे

१३

पुणे मनपा दवाखाना, कात्रज

३३

भारतरत्न राजीव गांधी रुग्णालय, पर्णकुटी पोलीस चौकी समोर येरवडा

१४

कै. थरकुडे दवाखाना, एरंडवणा, नळ स्टॉप चौक पाडाळे पॅलेस जवळ कर्वेरोड पुणे ४

३४

कै. सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह, पंचहौद मिशन खडकमाळ आळी गुरुवार पेठ

१५

कै. आनंदीबाई नरहर गाडगीळ दवाखाना, म्हात्रे पुलाजवळ दत्तवाडी पुणे

३५

कै. मिनाताई ठाकरे प्रसूतिगृह, मारुती मंदिरा शेजारी कोंढवा गाव

१६

ख्रि.रॉक एडवर्ड पॉल(बर्माशेल) दवाखाना, इंदिरानगर लोहगांव, पुणे

३६

कै. बाबुराव गेनबा शेवाळे दवाखाना, ४७ औंध रोड खडकी पुणे

१७

पुणे मनपा कळस दवाखाना, लक्ष्मी टाऊनशीप फेज २ जाधव वस्ती कळस

३७

कमला नेहरु प्रसूतिगृह, मंगळवार पेठ

१८

कै. अरविंद गणपत बारटक्के दवाखाना,

अतुल नगर वारजे माळवाडी

३८

डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालय

हॉटेल ली मेरेडियन शेजारी रेल्वे स्टेशन मागे पुणे

१९

प्रभाग  क्र.७२ बिबवेवाडी दवाखाना, प्रभाग क्र.७२ व्ही. आय.टी. कॉलेज समोर पुणे

३९

ससून मयत पास केंद्र

ससून सर्वोपचार रुग्णालय आवार पुणे स्टेशन जवळ

२०

वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ पुणे

सकाळी ७.०० ते रात्री ९.००

४०

विश्रामबाग वाडा मयत पास केंद्र,शनिपार जवळ

४१

धनकवडी क्षेत्रिय कार्यालय मयत पास केंद्र,

धनकवडी,पुणे

१) जन्म आणि मृत्यु नोंदणी अधिनियम,१९६९ व महाराष्ट्र जन्म आणि मृत्यु नोंदणी नियम २००० नुसार जन्म आणि मृत्यु घटना ज्या कार्यक्षेत्रात होईल त्याच कार्यक्षेत्रात करणे बंधनकारक आहे. (कलम-१(२))

२) जन्म आणि मृत्युच्या घटनांची नोंद घटना ज्या कार्यक्षेत्रात घडेल त्या निबंधकाकडे घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत करणे बंधनकारक, संबधीत रुग्णालय, संस्थां व विशिष्ट व्यक्‍तींची आहे. (कलम-८,९ व नियम ५(३))

३) जन्म आणि मृत्युची घटना घडल्यानंतर १ वर्षांनी नोंदणी करावयाची असेल तर कोर्ट आदेशान्वये मे.न्यायाधीश यांच्या लेखी कोर्ट आदेश दिल्यानंतर ती नोंदणी मे. कोर्टाने ज्या कार्यक्षेत्रात करण्याचे आदेश   देण्यात आलेले आहे अशा ठिकाणी नोंद करता येते. या नोंदणीसाठी रुपये १०/- विलंब शुल्क आकारुन करण्यात येते. (टिपः- त्याचप्रमाणे मे. कोर्ट आदेशामध्ये नमूद केलेला दंड ही आकारण्यात येतो.) (कलम-९(३))

१) जन्म-मृत्युची घटना घडल्यापासून घटना घडलेल्या संबंधीत रुग्णालय, संस्था अथवा विशिष्ट व्यक्‍ती यांचेकडून पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालयाकडील जन्म-मृत्यु नोंदणी विभाग, कसबा पेठ येथे नोंद उपलब्ध झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाचे ३ दिवसांत नोंद संगणकीकरण करण्यात येते. संगणकीकृत करण्यात आलेले जन्म-मृत्युचे प्रमाणपत्र पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयाकडील नागरी सुविधा केंद्र येथून वितरीत करण्यात येते.

२) जन्म आणि मुत्यु प्रमाणपत्र वितरीत करण्याची ठिकाणे

 

अ.क्र.

क्षेत्रिय कार्यालयाचे नाव

पत्ता

फोन क्रमांक

सहकार नगर (अरणेश्वर) क्षेत्रिय कार्यालय

सातारा रोड, स्वारगेट, पुणे ४११०४२

२५५०१४७९

औंध क्षेत्रिय कार्यालय

स्पायसर कॉलेज रोड, बे्रमन चौक, औंध, पुणे ४११०२७

२५५०७१५०

भवाना पेठ क्षेत्रिय कार्यालय

टिंबर मार्केट, स्वारगेट, पुणे ४११०४२

२५५०७२५०

बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय

सिटी प्राईड टॉकिज जवळ, सातारा रोड, पुणे ४११०३९

२५५०८७०७

धनकवडी गांव संपर्क कार्यालय

धनकवडी पोलीस चौकी जवळ, पुणे ४११०४३

२५५०१४७२

धायरी संपर्क कार्यालय

धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे ४११०४१

२५५०१४६९

ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालय

डी.पी.रोड, पुणे रेल्वे स्टेशन जवळ, रुबी हॉल हॉस्पिटल मागे, पुणे ४११००१

२५५०७३०७

घोले रोड क्षेत्रिय कार्यालय

जंगली महाराज रोड, घोले रोड, पुणे ४११००५

२५५०१५०७

हडपसर क्षेत्रिय कार्यालय

पुणे-सोलारापूर  रोड, हडपसर, पुणे ४११०४६

२५५०७४०७

१०

हिंगणे संपर्क कार्यालय

हिंगणे,  सिंहगड रोड, पुणे ४११०३८

२५५०१४७८

११

कर्वे रोडक्षेत्रिय कार्यालय

कर्वे रोड, डेक्कन, पुणे ४११००४

२५५०१६५४

१२

कात्रज क्षेत्रिय कार्यालय

कात्रज सर्पोानाच्या समोर, कात्रज, पुणे ४११०४३

२५५०८९०७

१३

कोंढवा वानवडी क्षेत्रिय कार्यालय

कात्रज कोंढवा रोड, पुणे ४११०३६

२५५०६२६७

१४

संगमवाडी क्षेत्रिय कार्यालय

पर्णकुटी, येरवडा, पुणे ४११००६

२५५०९११०

१५

टिळकरोड क्षेत्रिय कार्यालय

बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, टिळक रोड, स्वारगेट,  पुणे४११००४

२५५०८००७

१६

विश्रामबाग वाडा क्षेत्रिय कार्यालय

कन्या शाळा, शनिपार जवळ, पुणे ४११००३

२५५०७६०७

१७

विश्रांतवाडी संपर्क कार्यालय

एअर पोर्ट रोड, पुणे ४११००६

२५५०१४७६

१८

वडगांव बुद्रुक संपर्क कार्यालय

सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक पुणे-४११०४१

२५५०१४७१

१९

वडगाव शेरी संपर्क  कार्यालय

वडगांव शेरी, नगर रोड, पुणे४११००६

२५५०१४७४

२०

वारजे रोड क्षेत्रिय कार्यालय

कृष्णा हौसिंग सोसायटी, पुणे ४११०३८

२५५०७७०७

२१

येरवडा क्षेत्रिय कार्यालय

नगर रोड, आगाखान पॅलेस जवळ, पुणे ४११००६

२५५०९००७

२२

कोथरुड क्षेत्रिय कार्यालय

गोल्डन हिंद बिल्डींग, परांजपे शाळेमागे भेलकेनगर चौक, पुणे ४११०३८

-

२३

कोंढवा खुर्द  कार्यालय

गगन गॅलेक्सी सोसायटी समोर, कोंढवा रोड, पुणे  ४११०४२

२५५०१४७३

जन्म-मृत्युची घटना घडल्यापासून २१ दिवसांचे आत नोंदणी झाल्यास जन्म-मृत्यु प्रमाणपत्राची प्रथम प्रत  मोफत तद्‌नंतरच्या जन्म-मृत्युचे प्रमाणपत्राच्या प्रत्येक प्रतीस रु. १०/- आकारले जातात.

जन्म-मृत्युची नोंद नसल्यास जन्म-मृत्यु ची घटना ज्या ठिकाणी घडली आहे. त्याकरिता जन्म व मृत्यू झालेल्या ठिकाणाचा पुरावा सादर करुन संबंधित जन्म-मृत्यू नोंदणी विभाग कसबा पेठ येथील मा.निबंधक यांच्याकडून विहित नमुन्यातील नोंद आढळून येत नसल्याचे अनुपलब्धता प्रमाणपत्र (नमुना १०) देण्यात येते व त्यासोबत लागणारी विहित कागदपत्रे मा. कोर्ट यांचेकडे सादर करावे लागतात.

जन्म-मृत्युच्या नोंदीमध्ये लेखन प्रमादामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे हि जन्म-मृत्यु नोंदणी विभाग कसबा पेठ येथे मा. उपनिबंधक यांचेकडे सादर केल्यानंतर सदर दुरुस्ती प्रकरणे मा.निबंधक तथा वैद्यकिय अधिकारी, मुख्य इमारत, मा. निबंधक यांचाकडून दुरुस्ती पत्रावर स्वाक्षरी करण्यात येते. तद्‌नंतर जन्म-मृत्यु नोंदणी विभाग,मा.निबंधक तथा आरोग्य अधिकारी, पुणे मनपा यांचे मान्यतेने दुरूस्त करण्यात येते. तद्‌नंतर जन्म-मृत्युचे प्रमाणपत्र वर नमूद केलेल्या क्षेत्रिय कार्यालयांकडील नागरी सुविधा केंद्र येथून आवश्यक तितक्‍या दाखल्यांची आवश्यक ती फी भरल्यानंतर उपलब्ध होतात.

जन्म-मृत्यू दाखल्या मधील दुरुस्तीसाठी आवश्यक  कागदपत्रे खालीलप्रमाणे

1. अर्जदाराचे स्वाक्षरीचे स्वयंघोषित घोषणापत्र रु.10/- चा कोर्ट फी स्टॅम्प व 1 फोटो लावणे आवश्यक.
2. चुकीचा मुळ जन्म/मृत्यु संगणकीकृत दाखला सर्व  प्रती जोडणे आवश्यक.
3. ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म-मृत्यु घटना घडली त्या हॉस्पिटलच्या रजिस्टर रेकॉर्डला दुरुस्ती केल्याबाबतचे हॉस्पिटलचे सही शिक्क्यानिशी दुरुस्ती पत्र.
4. दोन प्रतिष्ठीत व्यक्तींचे  लेटर हेडवरील दुरुस्ती पत्र सही शिक्क्यानिशी.
5. रेशनकार्ड प्रत आवश्यक, पॅनकार्ड/इलेक्शनकार्ड  (मतदान कार्ड ओळखपत्र)  /पासपोर्ट च्या झेरॉक्स प्रती.   

जन्म नोंदणीत बाळाचे नाव समाविष्ट करणेबाबत आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे

1. बाळाचे नाव जन्म दाखल्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी बाळाचा जन्म सन 2000 पूर्वी झालेला असावा.
2. अर्जदार किंवा पालक यांनी जन्म-मृत्यु नोंदणी विभागाकडील छापील अर्ज भरणे व ओळखपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
3. पुणे महानगरपालिकेचा बाळाचे नाव नसलेला संगणकीकृत जन्म दाखल्याची मुळ (ओरिजनल) 1 प्रत जोडणे आवश्यक.
4. नावाच्या व जन्म तारखेच्या सत्यतेसाठी शासकिय पुरावा उदा. शाळा सोडल्याचा दाखला किंवा एस.एस.सी. (इ.10वी चे प्रमाणपत्र)प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक.
5. पॅनकार्ड/आधार कार्ड/मतदान कार्ड इत्यादी ओळखपत्रांच्या छायांकित प्रत जोडणे.
6. सर्व कागदपत्र सादर केल्यानंतर, त्या कागदपत्रांची सत्यता पडताळूण बाळाचे नाव संगणकावर नोंदविण्यात येईल.
7. 8 ते 10 दिवसांनंतर (कार्यालयीन सुट्टीचे दिवस  वगळूण) जवळच्या क्षेत्रिय कार्यालयातून जन्म दाखला काढून घेण्यात यावा.

सूचनाः- एकदा जन्म दाखल्यात नाव समाविष्ट केलेनंतर बाळाचे नावात कोणताही बदल होणार नाही.

टीप—1. जन्म दाखल्यात बाळाचे नाव नमुद करण्याबाबत ज्या नागरिकांच्या मुलाच्या जन्माची नावाशिवाय नोंदणी 1/1/2000 पूर्वी झालेली आहे व ज्यांच्या नोंदणीला 15 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. अशा सर्व नागरिकांना या संधीचा लाभ देण्यात येत आहे. यामध्ये सन 1969 पुर्वीच्या नोंदणीचा सुध्दा समावेश आहे. दिनांक 14/05/2020 या तारखे नंतर हा कालावधी कुठल्याही परिस्थित वाढवून मिळणार नाही याची नोंद घेण्यात यावी.

पुणे महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यु नोंदणी विभागकडे नोंद करण्यात आलेल्या जन्म-मृत्युच्या नोंदींचे संगणकीकरण मराठीतुन करण्यात येते. ज्या नागरीकांना जन्म-मृत्यु दाखल्यांची इंग्रजीमध्ये नोंद करणे आवश्यक आहे, अशा नागरीकांना पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाकडील जन्म-मृत्यु दाखले वितरीत करण्यात येणार्‍या ठिकाणी समक्ष जावून इंग्रजीमध्ये छापील अर्ज भरुन दिल्यानंतर जन्म-मृत्यु दाखले वितरित करण्यात येणार्‍या क्षेत्रिय कार्यालयाच्या स्तरावर इंग्रजीमध्ये संगणकावर नोंद करुन मिळेल. याची कृपया नोंद घ्यावी.

1 वैयक्तिक पातळीवर घ्यावयाची दक्षता – 

-पाण्याचे साठयावर घटट झाकण लावणे

-आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे,

-अंगणात गच्चीवर असलेल्या; पाणी साचु शकेल अशा तुटक्याफुटक्या वस्तु नष्ट करणे,

-घरांसमोर खडडा असल्यास बुजविणे,

-पाणी साचले असेल ते वाहते करणे, 

-मच्छरदाणीचा वापर करणे, 

-डास नियंत्रण औषधांचा वापर करणे, 

-सेप्टीक टँकच्या पाईपला जाळी बसविणे. 

2 पुणे मनपा स्तरावर घेण्यात येणारी प्रतिबंधात्मक कार्यवाही – 

-डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे, 

-किटकनाशक फवारणी व धुर फवारणी करण्यात येते, 

-डेंग्यू, मलेरिया व चिकनगुन्या साठी घरांचे सर्वेक्षण, ताप सर्वेक्षण करण्यात येते.तसेच ज्या भागात या आजाराचा रुग्ण आढळून येतो त्या भागातील घरांमध्ये किटकनाशक फवारणी व धूर  फवारणी करण्यात येते.

1.स्त्री व पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करुन घेणा-यास आर्थिक लाभ दिला जातो.
2.गर्भवती मातांचे वय 19 वर्षांच्या वर आहे व ती अनुसुचित जाती जमातीची व दारिद्रय रेषेखालील असेल व तिने किमान तीन वेळा गरोदरपणी तपासणी करुन घेतली आहे व तीची प्रसुती मनपाच्या रुग्णालयात झाली असेल अशा स्त्रीला जननी सुरक्षा योजनेअंतर्गंत आवश्यक कागदपत्रे असल्यास सात दिवसांत आर्थीक लाभ दिला जातो.