पशुवैद्यकीय

 

सर्व पाळीव प्राणी उदा. कुत्रा, मांजर, पक्षी  व मोठे जनावर यांच्यावर उपचार केले जातात.

जनावरांना दाखल करून घेण्याची महानगरपालिकेकडे सुविधा उपलब्ध नाही.

ज्या व्यक्तीचा चावा घेतलेला आहे त्या व्यक्तीने पुढील उपचारासाठी वैद्यकिय अधिका-यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच चावलेला कुत्रा किंवा मांजर यांची पशुवैद्यकिय अधिकार्‍यांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे

भटक्या गाई/म्हशींना अपघाताच्या स्थितीत उपचारांची गरज भासल्यास म.न.पा. कोंडवाडा विभागामार्फत वाहनाची व्यवस्था होऊन शासकीय रूग्णालय येथे नेऊन आवश्यकतेप्रमाणे उपचार केले जातात.  गाई/म्हशींवर राज्य शासनामार्फत व्हेटरनरी पॉलिक्लिनिक  येथे कार्यरत असलेल्या आय.पी.डी. केंद्रावर उपचार केले जातात. पत्ताः- व्हेटरनरी पॉलिक्लिनिक स्पायसर कॉलेज समोर औंध, पुणे- 411007.

कोंडवाडा विभागास वाहन उपलब्ध करून देणेबाबत कळविता येईल. कोंडवाडा विभागाकडून शासनामार्फत व्हेटरनरी पॉलिक्लिनिक औंध येथे फक्त मोठी जनावरे पाठविण्याची व्यवस्था होवू शकते. कोंडवाडा संपर्कक्र. 020-25282810  तसेच पुणे व पिंपरी चिंचवड येथे काम करणार्‍या काही स्वयंसेवी संस्था याबाबत मदत करू शकतात.  सदर स्वयंसेवी संस्थांचे दुरध्वनी क्रमांक पशुवैकिय विभागाकडे उपलब्ध आहेत.

पुणे मनपाचा स्वतःचा पशुवैकिय दवाखाना नाही तथापि पुणे शहरात पुढीलप्रमाणे पशुवैकिय दवाखाने आहेत.

1. ब्ल्यू क्रॉस सोसायटी ऑफ पुणे- केशवनगर, मुंढवा पुणे, दुरध्वनी क्रः-020-65266491.

2. व्हेटरनरी पॉलिक्लिनिक, स्पायसर कॉलेज समोर औंध, पुणे-411007, दुरध्वनी क्रः- 020-25692968

महानरगरपालिकेकडून कुत्रा पाळण्यासाठी परवाना दिला जातो.  त्यासाठी

1. संबंधित प्राण्यांची पासपोर्ट आकाराची 3 छायाचित्रे
2. रेबीजचे लसीकरण केले असल्याच्या प्रमाणपत्राची प्रत
3. निवासाचा पुरावा.
4. दहा वर्षासाठी नोंदणी शुल्क र.रू. 50/- प्रमाणे र.रु.500/-अ‍ॅडव्हान्स  स्विकारण्यात येतो.  तथापि दरवर्षी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
5. दहा वर्षानंतर नोंदणी शुल्क रु.50/- प्रमाणे रू.250/अ‍ॅडव्हान्स फी  स्विकारण्यात येते. तथापि दरवर्षी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.

 

पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याची कार्यवाही सुरू आहे.  सध्या पाळीव प्राणी मृत झाल्यास दूरध्वनी क्र.9689931903 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

महापालिकेमार्फत अशी सेवा सध्या उपलब्ध नाही. परंतु अशासकीय संस्थेच्या मदतीने अशी सेवा उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित आहे. परंतु अशा सुविधेसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

 

म.न.पा. च्या स्मशानभुमीत पाळीव प्राण्यांचे दफन करणे बंधनकारक असणार नाही.  दफन करण्यासाठी जागा उपलब्ध असल्यास दफन करता येऊ  शकते.

मधमाशाचे पोळे काढण्याची /हलविण्याची कामे खाजगी तज्ज्ञांद्वारे करण्यात येतात.  त्यांचे संपर्क क्रमांक कात्रज प्राणी संग्रहालय किंवा सर्पोद्यान कार्यालयाकडे मिळू शकतात.

 

वन विभागामार्फत यावर कारवाई केली जाते.  याबाबत आवश्यक सूचना सर्पोद्यानामार्फत प्राप्त होऊ शकतील. काही खबरदारीचे उपाय नागरिकांची अशावेळी करावेत.  वानर व माकडांना खापदार्थ देऊ  नयेत.  त्यांना डिवचू नये व दगड मारू नयेत. याबाबत आवश्यक सूचना सर्व स्थानिक नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना द्याव्यात.

यासाठी आपण संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे अथवा दुरध्वनी क्र.9689931706 तक्रार करु शकता.

 

संतती नियमिन शस्त्रक्रिया केल्यानंतर भटकी कुत्री ज्या विभागातून पकडण्यात आली होती त्याच विभागात सोडावीत असा केंद्र शासनाचा नियम आहे.

सर्पोद्यानातील कर्मचारी व शहरातील सर्पमित्र हे सापांच्या प्रजाती ओळखू शकतात.

पाळीव प्राण्यांना संर्पदंश झाल्यास Anti Snake Venom उपलब्ध आहे.  पिंपरी येथील हाफकिन इन्स्टिटयूमध्ये वैकिय अधिका-यांच्या मागणीनूसार Anti Snake Venom मिळू शकते.

साप पकडण्याचे काम करणा-या सर्पमित्रांचे दूरध्वनी क्रमांक कात्रज येथील सर्पोद्यानामध्ये उपलब्ध आहेत.