पाणीपुरवठा

पाणी मीटर नळजोड बंद करण्यास संबंधी कार्यालय  अर्ज देण्यात यावे ज्या  महिन्याचे मीटर पाणी पट्‌टी भरून कायमस्वरूपी नळजोड बंद करण्याचे आकार भरणे सदर नळजोड मुख्य जलवाहीनीवर बंद केल्यानंतर सदर पाणीपट्टी बील संगणकावर कमी करण्यात येते.

नळ कनेक्शन व्यासानूसार खर्च येतो. नळजोड प्रकारनुसार व रस्ता खादाईचे प्रकार व त्यांचे आकारनुसार खर्च येतो. याबाबत सविस्तर महिती (महापालिका सभा ठराव – सभा क्र. 78, ठराव क्र. 2277, दि. 04/2/15 ) नुसार आकारणी करण्यात येते याबाबत https://pmc.gov.in/en या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापि पाणी टंचाई असणा-या भागात सदर निकष लागू होत नाही. 

नवीन नळजोडकरिता करावयाचा अर्ज पुणे महानगरपालिका, तळमजला, कर संकलन विभागाशेजारी प्राप्त होतो व सदर अर्जाची किंमत र. रू. 10/ फक्त आहे. याबाबतची यादी https://pmc.gov.in/en या वेबसाईटवर उबलब्ध आहे. तसेच नागरिक rts.punecorporation.org या वेबसाईटवर देखील अर्ज करू शकतात.

अर्ज, मान्य नळजोड पुराव,मिळकत कर ना हरकत पत्र, इ. कागदपत्रे बदली नळजोडास आवश्यक आहे.

जलवाहीनी विकसनाच्या प्रस्तावाकरिता शुल्क आकारणी संदर्भात माहिती https://pmc.gov.in/en या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

( कार्यालय परिपत्रक जा.क्र. 4521, दि. 16/03/2015)

A) घरगुती वापरासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे -

1) नवीन नळजोडकरिता करावयाचाविहीत नमुन्यामधील अर्ज.

2) भोगवटापत्र/गुंठेवारी मान्यतेबाबत दाखला.

3) मान्य नकाशा.

4) मिळकत कर ना-हरकत पत्र.

5) जलवाहिनी विकसन शुल्क चलन / जलवाहिनी विकसन  ना हरकत पत्र.

6) वॉटर मीटर ना हरकत पत्र.

7) म.न.पा. लायसन्स्‌ प्राप्त प्लंबर चे लायसन्स्‌ ची झेरॉक्‍स प्रत

B) घरगुती वापरासाठी वैद्यकिय आधारावरील नळजोड करिता आवश्यक कागदपत्रे  अ. क्र. 1 ते 7 ची कागदपत्रे व वैद्यकिय दाखला.

1) रेशनकार्ड प्राप्त/आधारकार्ड/रहिवास पुरावा व इंडेक्‍स व उतारा सोसायटी/इतर रहिवासी यांचे ना हरकत पत्र व सदनिका करारनामा .

2) मिळकत करामधील पाणीपट्‌टी व नळजोडाचे मीटरप्रमाणे होणारी पाणीपट्‌टी दोन्ही म.न.पा. कोषागारात विना तक्रारी भ्ररणा करणार याबाबत नोटराईज्ड हमीपत्र.

C) बिगर घरगुती वापरासाठी आवश्यक कागदपत्रे  खालीलप्रमाणे अ. क्र. 1 ते 7 ची कागदपत्रे

1) शॉप अॅक्ट लायसेन्स्‌.

2)  इंडेक्स टू व दुकान खरेदीबाबत कागदपत्रे.

3) दुकान/कार्यालय भाडयाने घेतल्यास भाडे करार, मुळ मालकाचे संमतीपत्र मुळ मालकाचे पाणी बीलाबाबत हमीपत्र.

D) घरगुती वापरासाठी सोसायटी/अपार्टमेंट यांना जादा सुविधा नळजोड करिता आवश्यक कागदपत्रे  अ. क्र. 1 ते 7 ची कागदपत्रे, अ. क्र. 11 चे हमीपत्र

नविन नळजोडांचा व्यास सदनिकेच्या प्रमाणात ठविण्यात येतो. याबाबतचे निकष https://pmc.gov.in/en या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापि पाणी टंचाई असणा-या भागात सदर निकष लागू होत नाही.

1) बांधकाम सुरू करणेचा दाखला

2) मान्य नकाशा व ले आऊट  नकाशा.

3) मिळकत कर ना-हरकत पत्र.

4) 7/12 उतारा

5) मोजणी नकाशा

6) आर्किटेक्ट नेमणूक पत्र व प्रस्तावाकरिता अर्ज

7) म.न.पा. मान्य दरपत्रकानुसार जलवाहीनी विकसनाबाबतचे पुर्वगणकपत्रक.

मान्यताप्राप्त कंपनीचे व्यासनिहाय पाण्याचे मिटर बाजारात उपलब्ध् आहेत.

(1) European economic commission (EEC) मान्यताप्राप्त ही कंपन्याची नावे

अ) ITRON ब) ZENER क) ARAD ड) BELAN

(2) ISI MARK

 

अ) CHAMBAL ब) CAPSTAIN क) NELSON ड) KRANTI

बिलाची आकारणी फॉल्टी प्रमाणे केली असल्यास नवीन मीटर योग्य बिलाची रक्कम भरून बिल मिळालेल्या महिन्यात बनविण्यात यावे अन्यथा बिल भरणे बंधनकारक राहील.

बिल भरण्याची सुविधा ऑनलाईन http://watertax.punecorporation.org/ लिंकवर उपलब्ध आहे. सदर माहिती पाणी मीटरबिलावर उपलब्ध आहे. तसेच नागरी सुविधा केंद्रात आणि बँकेमध्ये ऑफलाईन पद्धतीने पाणीपट्‌टीचे बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

नळजोडणी पाणी मीटरचे द्विमासिक पध्दतीने दिले जातात.

https://pmc.gov.in/en या संकेत स्थळावर पाणीपट्‌टीचे दर उपलब्ध आहेत

अर्ज, मान्य नळजोड पुरावा, मिळकत कर ना हरकत पत्र, इ. कागदपत्रे व नळजोड दुरूस्तीसाठी नळजोडास आवश्यक आहे.

बिलातील अडचणी व तक्रार असल्यास कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी 10.00 ते 5.30 या वेळेत लष्कर पाणी पुरवठा मीटर (लष्कर हद्‌दीसाठी) व शहर विभागास, सावरकर भवन, स्वारगेट, एस.एन.डी.टी.विभागासाठी कर्वेरोड येथील कार्यालयास संपर्क करावे.

 

मीटर बिलाची दुरूस्ती नवीन मीटर बील आल्यानंतर चार महिन्यांचा खप विचारात घेवून केली जाते.

मनपाकडे मान्यताप्राप्त परवानाधारक प्लंबर आहेत. त्यांची यादी https://pmc.gov.in/en मनपा संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

मनपा परवानाधारक प्लंबर फी अकारणी कामाचे स्वरूप, पाईप व मटेरीयल,फिटींग मजुरी इ. बाबीवर आधरित असतो. याबाबत नळजोडाचे काम देण्यापूर्वी संबिधित प्लंबर कडून कामाचे दर निश्चित करून घ्यावे व नंतर प्लंबरची नेमणूक करावी.